Tuesday, 23 July 2013

युरोप


काही इतिहासकार मध्ययुगाचे वर्णन 'तमोयुग' असे करतात. परंतु खरे तर इतिहासातील कोणताही कालखंड पूर्णपणे अंधकारमय नसतो. मध्ययुगाचा सुरुवातीचा काळ हा मोठया र्‍हासाचा आणि प्रगतीच्या अभावाचा काळ होता. परंतु त्या तुलनेत मध्ययुगाचा उत्तरार्ध मात्र अनेक बाबतींत प्रकाशमान होता. मध्ययुगीन युरोपात राजकीय अस्थिरता होती. परंतु काळाच्या ओघात ही अस्थिरता कमी होत होत गेली आणि युरोपमध्ये काही बदल घडून आले. हा स्थित्यंतराचा कालखंड होता. या कालखंडातील बदलांमुळे आधुनिक युरोपचा पाया घातला गेला. या बदलांची चर्चा आता आपण करणार आहोत.

चर्च आणि राज्य :- संपूर्ण मध्ययुगाच्या काळात चर्च आणि राज्य या दैवी संस्था मानल्या जात असत. चर्चने क्ष्रिस्ती मानवाच्या आत्म्यावर तर राज्याने शरीरावर नियंत्रण ठेवणे अभिप्रेत होते.

मध्ययुगीन युरोपात चर्च ही एक अत्यंत प्रबळ अशी संस्था होती. चर्चच्या यंत्रणेचा पोप हा धार्मिक प्रमुख होता. तो सर्वोच्च धार्मिक अधिकारी होता. त्यांच्या अधिकाराखाली आर्च बिशप, बिशप, पॅरिश-प्रीस्ट इत्यादी इतर धार्मिक अधिकारी असत. चर्चची अधिकृत भाषा लॅटिन ही होती.

मध्ययुगास प्रारंभ होण्यापूर्वीच संपूर्ण युरोपखंडात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला होता. मध्ययुगात समाज जीवनावरील चर्चचा प्रभाव खूपच वाढला होता. चर्चचे युरोपच्या आर्थिक व राजकीय जीवनावरसुध्दा नियंत्रण होते. चर्चच्या प्रभावाचे एक कारण म्हणजे या संस्थेने केलेले शिक्षणाचे कार्य होय. खरेतर या काळात शिक्षण ही चर्चची मक्तेदारी होती. प्राचीन काळातीलज्ञम्प्;ानाच्या सर्व शाखा आणि ग्रीक व लॅटिन यांसारख्या प्राचीन भाषा यांचे संवर्धन चर्चच्या माध्यमातून झाले. चर्चने या काळात युरोपचे सांस्कृतिक ऐक्य टिकविण्याचे आणि त्याला बळकटी आणण्याचे कार्य केले.

चर्चची स्वत:ची कायदेव्यवस्था होती. तसेच तिची अंमलबजावणी करणारी स्वतंत्र धार्मिक न्यायालये असत. धर्मसंस्थेची अवज्ञम्प्;ा करणार्‍या व्यक्तीस धर्मबहिष्कृत करण्यात येत असे. त्यामुळे राजे आणि सामंतसुध्दा चर्चला घाबरत असत. प्रत्येक राजाच्या दरबारात पोपचा दूत असे. राजसत्तेपेक्षा धर्मसंस्था श्रेष्ठ आहे असा चर्चचा दावा होता. चर्च आणि राज्या यांच्या अधिकार क्षेत्रांची सरमिसळ झाली होती. त्यामुळे काही वेळा धर्मसंस्था आणि राजसत्ता यांच्यामध्ये संघर्ष होत असे. १३ व्या शतकाच्या सुरुवातीला चर्चला प्रभाव कळसास पोहोचला होता.

चर्चच्या वाढत्या प्रभावाबरोबरच धर्मगुरुंचे नैतिक अध:पतन होऊ लागले. त्यांच्यात ऐहिक सुखोपभोगाची लालसा उत्पन्न झाली. अनेक वरिष्ठ धर्मगुरु उमराव घराण्यांमधून आले होते. त्यामुळे त्यांना कनिष्ठ वर्गाविषयी व धार्मिक कार्याविषयी आस्था नव्हती. म्हणून सर्वसामान्य जनतेत या धर्मगुरुंविषयी असंतोष वाढला. त्यातून मध्ययुगाच्या अखेरीस धर्मसुधारणेची चळवळ सुरु झाली. नवव्या पाठात आपण तिचा अभ्यास करणार आहोत.

मध्ययुगातील व्यापार व उदयोग :-मध्ययुगाच्या सुरुवातीस व्यापार व उदयोग यांच्या क्षेत्रात साचेबंदपणा आला होता. त्यांचे प्रमुख कारण म्हणजे या काळात असणारा रोख चलनाचा तुटवडा हे होते. सततच्या युद्धजन्य स्थितीमुळे प्रवास व दळणवळण धोक्याचे झाले होते. अनेक ठिकाणी सीमाशुल्क भरावे लागत असल्यामुळे व्यापार्‍यांना व्यापार परवडत नसे. चाचेगिरी वाढल्यामुळे जलमार्ग धोक्याचे झाले होते. अशा अनेक कारणांमुळे व्यापार व उदयोगास खीळ बसली. या काळात राज्यकाराभारातही सातत्याने बदल होत गेले. धर्मयुद्धांमुळे युरोपचा पौर्वात्य देशांशी संर्पक वाढला. पौर्वात्य वस्तंूची युरोपातील आवक पुन्हा वाढू लागली. व्यापारवाढीस चालना मिळाली. त्याचप्रमाणे अरबांच्या प्रगत व्यापारी संस्कृतीशी त्यांचा परिचय झाला.

नवीन शहरांचा उदय :-राजकीय अस्थैर्य आणि आर्थिक मंदीमुळे मध्ययुगाच्या सुरुवातीस अनेक समृद्ध शहरे ओस पडली. परंतु नंतर व्यापार वाढल्यामुळे व्हेनिस, जिनोआ, मिलान, फलॉरेन्स, मेन्झ, स्ट्रॉसबर्ग, हॅम्बुर्ग इत्यादी नवी शहरे उदयास आली. यांपैकी व्हेनिस व जिनोआ ही आंतरराष्ट्रीय व्यापाराची केंद्र बनली. त्या शहरांमधील प्रशासन स्वायत्त नगरराज्याप्रमाणे असून लोकशाहीप्रधान होते. त्यांच्यावर व्यापार्‍यांचे लोकशाही पध्दतीचे नियंत्रण होते. वाढत्या व्यापारी सवलतींमुळे कामगारांची संख्या वाढली. कष्टकरी वर्ग खेडयांमधून शहरांमध्ये स्थलांतरित होऊ लागला. त्याचा शहरातील सामाजिक जीवनावरही परिणाम झाला. यामुळे समाजाच्या नागरीकरणाची प्रक्रिया सुरु झाली.

मध्ययुगीन अर्थ व्यवस्था :- मध्ययुगीन अर्थ व्यवस्थेवर सामंतशाहीचा प्रभाव होता. जमीन हे संपत्तीचे प्रमुख साधन होते. सामंत हे प्रमुख जमीनदार होते. प्रत्यक्ष शेतीची कामे भूदास करीत असत. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक तेवढे धान्य देऊन उरलेले उत्पादन सामंत स्वत:जवळ ठेवीत असत. त्यामुळे समाजात गरीब व श्रीमंत असे दोन वर्ग निर्माण झाले. व्यापार आणि उदयोगास गती मिळाल्यावर कारागीर व व्यापारर्‍यांचा एक नवा वर्ग समाजात उदयास येऊ लागला.

व्यापार व उदयोगाचे नियंत्रण करण्यासाठी कारागीर व व्यापार्‍यांच्या श्रेणी असत. या श्रेणींना मध्ययुगीन अर्थव्यवस्थेत महत्वाचे स्थान होते. त्या व्यापार व उदयोगविषयक कामे करीत असत. शिवाय गरजू व्यक्तींना कर्जपुरवठाही करीत असत. काही श्रेणींच्या मदतीने शाळा चालविल्या जात असत. काही श्रेणी कलाकारांना आर्थिक मदतसुध्दा देत असत. मध्ययुगाच्या अखेरीस आर्थिक व्यवहारात चलनाचा वापर मोठया प्रमाणात सुरु झाला. 'डयुकाट' यांसारख्या चलनांना आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झाली होती. मोठया शहरांमध्ये व्यापारी पतपेढया स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यांच्यामार्फ़त हंुडया देण्याची व वटविण्याची व्यवस्था करण्यात येत असे.

मध्ययुगीन समाज व्यवस्था :- मध्ययुगीन युरोपीय समाजातील वरिष्ठ वर्गात धर्मगुरु व उमरावांचा समावेश होत असे. यांपैकी उमराव हे पद वंशपरंपरेने मिळत असे. उमराव वर्गास काही विशेष अधिकार असत. त्यात करमुक्तता आणि न्यायविषयक अधिकारांचा समावेश होत असे. उमरावांविरुध्द बंड करणे हा गुन्हा समजला जाई. समाजातील संपत्तीचा मोठा वाटा उमरावांच्या मालकीचा असे. उमराव आपला उच्च सामाजिक दर्जा राखण्यासाठी दरबारी रीतिरिवाज आणि डामडौल यांना विशेष महत्व देत.

वरिष्ठ धर्मगुरुंची जीवनपध्दती उमरावांसारखीच होती. कनिष्ठ धर्मगुरुंचे जीवन मात्र सर्वसामान्य जनतेप्रमाणे होते. बहुतेक सर्व धार्मिक कार्याचा भार कनिष्ठ धर्मगुरुंवर असे. वरिष्ठ धर्मगुरु व उमरावांखेरीज इतर सर्व व्यक्तींचा समावेश कनिष्ठ वर्गात होत असे. त्यातील बहुतांश लोक शेतकरी होते. बाकीचे लोक व्यापारी व इतर व्यावसायिक त्यांच्यावरच बहुतेक सर्व करांचे ओझे असे. याशिवाय भूदासांचा आणखी एक वर्ग युरोपीय समाजात होता. परंतु त्याला कोणतीही सामाजिक प्रतिष्ठा नव्हती.

भूदास पध्दती :- भूदास म्हणजे जमिनीशी कायमचा बांधलेला मजूर होय. त्याची गुलामाप्रमाणे विक्री होत नसे, परंतु त्याची अवस्था गुलामाप्रमाणेच होती.आपल्या धन्यासाठी रात्रंदिवस राबत राहणे हे त्याचे काम होते. भूदासांचे जीवन अत्यंत हलाखीचे होते. मध्ययुगाच्या सुरुवातीस ज्या वन्य जमातींच्या लोकांना रोमन साम्राज्यात स्थायिक होण्याची परवानगी देण्यात आली होती, त्यांपैकी काही वेठबिगार म्हणून राहिले तेव्हापासून भूदास पध्दती सर्व युरोपात पसरली.

पूर्वेकडील रोमन साम्राज्य :- रोमन सम्राट कॉन्स्टन्टाईन याने पूर्वेकडील बायझॅन्टियम तथा कॉन्स्टॅन्टिनोपल या शहरास रोमन साम्राज्याच्या दुसर्‍या राजधानीचा दर्जा दिला. तेव्हापासून कॉन्स्टॅन्टिनोपलचे राज्य बायझन्टाईन साम्राज्य किंवा पूर्वेकडील रोमन साम्राज्य म्हणुन ओळखले जाऊ लागले. प्राचीनग्रीक आणि मध्ययुगीन पौर्वात्य संस्क्ृतींचे मिश्रण असलेली एक नवी भिन्न संस्कृती या साम्राज्यात विकसित होत गली. नवव्या शतकात या साम्राज्याने वैभवाचे शिखर गाठले.मात्र दहाव्या शतकापासून त्याचा र्‍हास सुरु झाला. इ.स. १४५३ मध्ये ऑटोमन तंुकर्ांनी कॉन्स्टॅन्टिनोपल जिंकलीे. त्याचबरोबर बायझन्टाईन साम्राज्य नष्ट झाले.

मध्ययुगीन युरोपचा सांस्कृतिक वारसा :- मध्ययुगात युरोपच्या अर्वाचीन इतिहासातील अनेक संकल्पना व संस्थांचा पाया घातला गेला. कॉन्स्टॅन्टिनोपलमांर्गे पौर्वात्यज्ञान युरोपात पोहोचले आणि युरोपातलल प्रबोधनास चालना मिळाली. राष्ट्रवाद, देशभक्ती या तत्वांचा व प्रशासनाच्या क्षेत्रातील नवीन पदधतींचा वारसा युरोपने मध्ययुगाकडून उचलला. भांडवलशाही अर्थव्यवस्था, प्रभावी मध्यम वर्ग आणि धार्मिक सुधारणा इत्यादींचा उगम मध्ययुगात झाला.

मध्ययुगात युरोपमध्ये अनेक विदयापीठे उदयास आली. त्यांपैकी बोलेग्नो, सालेरेनो, पॅरिस, ऑक्सफर्ड आणि विटेनबर्ग ही विदयापीठे विशेष प्रसिदधीस आली. याच काळात मुद्रणकलेचा शोध लागला. त्यामुळे ज्ञानप्रसाराचे नवे माध्यम उपलब्ध झाले. शार्लमेनसारखे शासक व काही पोप यांसारख्या विदयाप्रेमींनी नव्या शिक्षणसंस्थांचा पाया घातला गेला. अर्वाचीन काळातील धर्मसंस्था, तत्वज्ञान,शिक्षण, शास्त्र, वाड:मय, कला, प्रशासन व्यवस्था यांचा उगम मध्ययुगातच झाला. पीटर अ‍ॅबेर्लॉड हा मध्ययुगातील एक श्रेष्ठ तत्वज्ञम्प्; होता थॉमस अ‍ॅक्विनास या तत्वज्ञ;म्प्;ााने श्रद्धा आणि बुद्धिवाद हे परस्परांशी विसंगत नाहीत असे प्रतिपादन केले. मध्ययुगीन तत्वज्ञम्प्;ांनी प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानाचे पुनरु ज्जीवन केले. नवीन शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण झाल्यामूळे नवीन वैज्ञानिक शोधही याच काळात लागले. त्याचप्रमाणे धाडसी खलाशांच्या पर्यटनातून नव्या भौगोलिक शोधांना प्रेरणा मिळाली. मध्ययुगाची अर्वाचीन युगास मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे आधुनिक युरोपीय भाषांचा विकास ही होय. यामुळे अनेक महान साहित्यिक युरोपला लाभले. मध्ययुगात प्राचीन रोमन, बायझन्टाईन, ख्रिश्चन तसेच वन्य जमातींच्या कला आणि स्थापत्याच्या संयोगातून एक नवीन कलाशैली विकसित झाली. कलेच्या या शैलीतून प्रबोधनकालीन कलेचा पाया घातला गेला.

राष्ट्र-राज्यांचा उदय :- प्राचीन रोमन काळातील राज्याची कल्पना आणि मध्ययुगीन सामंतशाहीच्या काळातील विकेंदि्रत राज्याची कल्पना या राजकीय प्रशासनाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने कुचकामी ठरल्या. मध्ययुगाच्या उत्तरार्धात एक नवी व्यवस्था आकाराला आली. ती 'राष्ट्र-राज्य' म्हणून ओळखली जाते. 'राज्य आणि 'राष्ट्र' या दोन्ही संज्ञम्प्;म्प्;ाांचे अर्थ वेगवेगळे आहेत. निश्चित सीमांनी युक्त असा भूप्रदेश , लोक , प्रशासन आणि सार्वभौतत्व या सर्वच घटकांमुळे 'राज्या'ची घडण होते. 'राष्ट्र' ही संकल्पना मात्र अधिक भावनिक आहे. समान सांस्कृतिक परंपरा, इतिहास, राजकीय आकांक्षा, समान भाषा आणि एकसंध भौगोलिक प्रदेश यांच्यामुळे जोडले जातात. ज्या राज्यातील लोकांमध्ये अशी एकात्मतेची प्रबळ भावना निर्माण होते, त्या राज्याला 'राष्ट्र-राज्य' म्हणून संबोधले जाते. सामंतशाहीचा र्‍हास, व्यापारवृद्धी, नव्या शहरांची वाढ आणि प्रादेशिक भाषांना आलेला जोम या घटकांमुहे मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादी भावना बळावली. त्यामुळे फ्रान्स, स्पेन, ऑस्टि्रया, इंग्लंड, रशिया यांसारखी राष्ट्र-राज्ये उदयाला आली.

अनियंत्रित राजेशाही :- युरोपातील राज्यांच्या आर्थिक विकासाला सामंतशाहीने खीळ घातली होती. त्यातून मुक्त होण्यासाठी राजे महसुलाच्या नवीन साधनांच्या शोधात होते. सामंतशाहीत व्यापार व वाहतुकीला फारच अपुरे संरक्षण दिले जात असे, तर राजेशाहीत हे संरक्षण अधिक चांगल्या प्रकारे दिले जाऊ लागले. साहजिकच व्यापार्‍यांनी राजाला पाठिंबा दिला. परस्परांच्या गरजा एकमेकींना पूरक असल्यामुळे राजे व व्यापारी एकत्र आले. अशा रीतीने युरोपात सामंतशाहीच्या प्रभावाला ग्रहण लागले आणि समर्थ केंद्रसत्ता उदयाला आल्या.

याच काळात युरोपमधील लोकसंख्या वाढली. तिच्या उपजीविकेसाठी केवळ शेतीपासून मिळणारे उत्पन्न पुरेरे नव्हेते. खेडयांमधील अतिरिक्त लोकसंख्या उपजीविकेच्या शोधात शहरांकडे वळू लागली. त्यामुळे राजाचे लष्करी मनुष्यबळ वाटू लागले, तर व्यापार्‍यांना अधिक मजूर पुरवठा होऊ लागला. या सर्व घटकांमुळे सामंतशाही अर्थ व्यवस्था आणि तिच्यावर आधारित समाज व्यवस्था ढासळू लागली.

मध्ययुगीन युरोपात उदयाला आलेली नवी शासन व्यवस्था 'निरंकुश राजेशाही' म्हणून ओळखली जाते. या पध्दतीत सर्व सज्ञ्ल्त्;ाा राजाच्या हाती केंद्रीत झालेली असते. त्याची सत्ता निरंकुश असते. यामुळेच फ्रान्सचा राजा १४वा लुई याने 'मी म्हणजेच राज्य' असे घोषित केले. डान्टेसारखा कवी, जॉन विक्लिफ व मार्टिन ल्यूथर हे धर्मसुधारक, थॉमस हॉब्ज व निकोलो मॅकियाव्हेली हे विचारवंत यांसारख्या प्रभावी व्यक्तींनी निरंकुश राजेशाहीला पाठिंबा दिला. राजा हा प्रत्यक्ष ईश्र्वराचाच दूत आहे असे सांगणारा 'ईश्र्वरदत्त राजसत्तेचा सिध्दांत' युरोपात प्रस्थापित झाला.

युरोपातील बहुतेक राजे कोणालाही उबाबदार नव्हते. जरी या राजांनी अनियंत्रित राज्य केले तरी त्यांनी आपली कर्तबगारी दाखविली. त्यांनी भव्यता आणि दिमाखदारपणा यांचे प्रदर्शन केले आणि विलासी जीवन आचरले. आपल्या लष्करी शक्तीच्या आणि प्रचंड वैभवाच्या जोरावर त्यांनी सर्वसामान्य लोकांना प्रभावित केले. बहुतेक राजे ज्ञान, साहित्य, कला यांचे आश्रयदाते होते. त्यांनी राज्याच्या वैभवासाठी व विकासासाठी निरनिराळया सुधारणा केल्या.

फ्रान्सचा राजा १४ वा लुई, स्पेनचा राजा दुसरा फिलिप, ऑस्ट्रियाची मारिया थेरेसा, प्रशियाचा फ्रेडि्रक दि ग्रेट, रशियाचा पीटर दि ग्रेट, इंग्लंडची राणी पहिली एलिझाबेथ अशी निरंकुश राजसत्तेच्या काळातील युरोपीय राज्यकत्र्यांची उदाहरणे प्रसिध्द आहेत. या राज्यकत्र्यांनी देशाच्या विकासाला चालना दिली आणि अप्रत्यक्षपणे आधुनिक युगाची पाश्र्र्वभूमी घडविली. परंतु राज्यव्यवस्थ्ेच्या काही मूलभूत उणिवांमुळे तिची जागा एका अधिक चांगल्या व्यवस्थेने घेतली. ही नवी व्यवस्था होती आधुनिक युगातील लोकशाही व्यवस्था.

1 comment: