Tuesday, 23 July 2013
औद्योगिक क्रांती
कमी खर्चात अधिक वस्तुनिर्मिती करून अधिक नफा वाढविणे हया अर्थ-व्यवस्थेतून औद्योगिक क्रांती झाली. भांडवलात भर पडत गेली. सुमारे १७५० मध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली. वस्तुनिर्मितीसाठी माणसे व जनावरे यांचे बदली यंत्रांचा वापर होऊ लागल्यामुळे औद्योगिक क्रांतीने ''यंत्र युगा''लाच प्रारंभ झाला.
सन १७५० पूर्वी नांगर, हवा-पंप छपाई यंत्र, हातमाग अशी यंत्रे होती. विविध प्राचीन संस्कृती जुन्या यंत्रांना नवीन साज देण्यात प्रयत्नशील होत्या. परंतू १७५० नंतर वेगाने संशोधन होऊ लागले. लोकांच्या जीवनात अती वेगाने बदल होऊ लागला. लोकांच्या राहणीमानाबरोबर त्यांच्या वैचारिक दृष्टिकोणात परिवर्तन होऊ लागले.
कुशल कारागिरांच्या संघटनांमुळे ''घरगुती डेम्एस्त्च्'ि' उत्पादन होत असे. अठराव्या शतकात ''घरगुती'' व्यवहाराच्या जागी ''कारखानदारी''(फ्ाच्त्ेरय् श्य्स्त्एम्)आली. कारखान्यात उत्पादन होऊ लागले. साध्या अवजारांऐवजी यंत्रे आली. कारागिरांना एका छपराखाली आणून भांडवलदार गरजेप्रमाणे साधनपुरवठा करत. पक्का माल, कामगारांचा पगार या सर्व गोष्टींवर नियंत्रण भांडवलदारांचे असे. कारखानदारी पध्दतीतून औद्योगिक क्रांती झाली.
इंग्लंडमध्ये प्रारंभ :
आठराव्या शतकात सर्व प्रकारच्या (गुलामांसह) व्यापारात आणि संपत्ती संचयामध्ये इंग्लंडला प्रतिस्पर्धी नव्हता. सर्वदूर पसरालेल्या वसाहतीतून इंग्लंडला कच्चा माल मिळे. भू-दास पध्दत नष्ट झाल्यामुळे लोकांचा शेतजमिनीशी संबंध राहिला नाही; कोणतेही कष्टाचे काम करावयास माणसे मोकळी झाली होती.
अठराव्या शतकातील कुंपण, आवार आंदोलनामुळे (एन्च्ल्ेस्ुरए म्ेव्एम्एन्त्) बडे जमीनदार आपल्या मालकीच्या शेतजमिनीचे एकीकरण करू लागले. छोटे जमीनदार हाकलले गेले आणि शेती-विना बेकार शेतकर्यांची फौजच निर्माण झाली. कारखान्यात काम करण्यासाठी मजुरांचा तुटवडा नव्हता. सरकार स्थिर झाले. व्यापार्यांना राजकीय सत्ता मिळू लागली.
विशेषत्वाने लोखंड व कोळशाच्या खाणी इंग्लंडमध्ये विपुल होत्या. नावाबांधणीच्या उद्योगामुळे वाहतूक समस्या नव्हती.
इतर देशांच्या तुलनेने इंग्लंड देशाला ही अनुकूल परिस्थिती होती. वस्त्रोद्योग, शेती व वाहतूक या क्षेत्रात नवीन यंत्रांचे शोध लागले, नवीन तंत्रे आली (शोधांची माहिती अन्यत्र असल्यामुळे दिली नाही. शोध लक्षात घ्यावे.)
यांत्रिक युगामुळे पन्नास वर्षात इंग्लंड जगातील अग्रेसर औद्योगिक राष्ट्र बनले. सन १८३३ ते१८५५ या कालावधीत हिंदुस्थानमध्ये इंग्लंडचा कपडा ५० हजार किलोग्रॅम वरून २|| दशलक्ष किलोग्रॅमपर्यंत वधारला. कोळसा उत्पादन व निर्यात १५ दशलक्ष वरून ६४ दशलक्षावर गेले. भट्टीतील लोखंडाचे उत्पादन ६ लक्ष ९० हजार टनावरून तीन दशलक्षापर्यंत गेले.
राष्ट्राराष्ट्रातच चुरस :
१८५० पासून तीस-पस्तीस वर्षाच्या कालावधीत फ्रान्स, जर्मनी, रशिया, अमेरिका व जपान या देशांमध्ये औद्योगिक क्रांती होऊ लागली.
औद्योगिक क्रांतीचे परिणाम :-
१. सुख आणि समृध्दी :
औद्योगिक क्रांतीने मानवी जीवन सर्वस्वी बदलून टाकले. मोटारगाडी, रेल्वे, विमान, टेलिफोन, टेलिव्हिजन यांसारख्या साधनांनी क्रांतीपूर्व काळातील मानवाचे कष्ट कमी झाले.
२. कारखानदारीचा उद्य :
नवनव्या यंत्रांच्या शोधामुळे युरोपात चाललेले गृहोद्योग बंद पडले आणि घरी आपल्या कसबाने वस्तूंचे उत्पादन करणारा कारागीर आता कारखान्यात कामगार म्हणून राबू लागला. यंत्रावरील उद्योग चालविण्यासाठी आवश्यक असणारा पैसा कामगारांजवळ नव्हता. साहजिकच उद्योगपतींनी या संधीचा फायदा उठविला. त्यांनी धाडसाने भांडवल गुंतवून कारखाने उभारले. हजारो कामगार आपल्या नियंत्रणाखाली कामाला लावूण वस्तूंचे उत्पादन सुरू केले. लवकरच एका उद्योगातील नफा दुसर्या उद्योगात गुंतवीत गुंतवीत समाजात कारखानदारी ही शक्ती त्यांनी उद्यास आणली.
३. शहरांची वाढ :
औद्योगिक क्रांतीच्या काळात काही जुन्या शहरांची वाढ झाली तर काही नवी शहरे वसून ती वाढीस लागली. प्रथम कारखाना निघे नंतर कामगारांच्या वस्त्या तयार होत आणि पुढे तेथे हळूहळू अनेक लहान-मोठे व्यवसाय उभारले जात.
४. लोकसंख्या वाढली व ती शहरांकडे वळली :
औद्योगिक क्रांतीने शेतमालाचे व इतर वस्तूंचे उत्पादन वाढले. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक गुणकारी इलाजांनी समाजातील मृत्युचे प्रमाण घटले. स्वाभाविकच लोकसंख्या वाढू लागली. खेडयापाडयांतील व्यवसाय बंद पडल्याने कारागिरांची बेकारी वाढली. शेतावरही लोकांची उपजीविका चालेना. तेव्हा कामासाठी लोक शहराकडे वळले.
५. शहरांतील कामगारांची दैन्यावस्था :
खेडयातून कामगार शहरात आल्यावर जागेची टंचाई, अशुध्द हवा आणि गर्दी या समस्यांना त्याला तोंड द्यावे लागले. कारखान्याभोवती कामगारांच्या वसत्या पूर्वनियोजन न करता वाढत असत. घरमालकांनी कमीत कमी जागेवर कमीत कमी पैशात घरे बांधलेले असत. त्यामुळे कामगार वस्तीत गलिच्छ व कोंद्रट वातावरण निर्माण होई. अरुंद रस्ते, घाणीचे ढीग, त्यातून येणारी दुर्गंधी,डोक्यावरील हवेत गिरण्यांचा धुर आणि राहावयास खुराडया सारखी घरे यामुळे कामगारच्या आरोग्यावर विघातक परिणाम होई.
६. कामगारांवरील अत्याचार :
कारखाने फार अस्वच्छ असत. कोंद्रट हवेत व अपुर्या प्रकाशात कामगार काम करीत असे. अशा कारखान्यात त्यांची जबर पिळवणूक केली जाई. कामाच्या ठिकाणी त्याच्यावर कडक शिस्तीचा बडगा सारखा उगारलेले असे. स्त्रिया व लहान मुले यांना अमानुष रीतीने वागविले जाई पुरूष कामगारांपेक्षा स्त्री कामगारांना किंवा मुलांना कमी पगार दिला जाई
७. वस्तुनिर्मितीचा आनंद नष्ट झाला :
औद्योगिक क्रांतीने उद्यास आलेल्या कारखानदारीत कामगार हा जणू एक यंत्राचा भाग बनला. श्रमविभागणीच्या तत्त्वानुसार वस्तूच्या निर्मितीमधील एखादा भागच तो वर्षानुवर्षे करीत असे. ठरावीक साचाच्या या कामामुळे त्याच्यावर मानसशास्त्रीय गंभीर परिणाम होत असे. शिवाय एखाद्री वस्तू पूर्णपणे आपण तयार केली, असा जो पूर्वी त्याला आंनद होत असे, तो या कारखाना पध्दतीत नाहीसा झाला. त्याचे जीवन नीरस व यंत्रासारखे झाले.
८. राष्ट्रांचे परावलंबन वाढले :
क्रांतीपूर्व काळात जगातील राष्ट्रे फारशी परावलंबी नसत; परंतु इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी यांसारख्या राष्ट्रांत कारखानदारीचा उद्य झाल्यावर त्यांना अनेक तर्हेचा माल बाहेरून आयात करावा लागू लागला. हे खरे की, ही राष्ट्रे प्रचंड प्रमाणात तयार माल निर्यात करीत असत; परंतु त्याचबरोबर अनेक जीवनावश्यक गोष्टींबाबत त्यांना दुसर्या देशांवर अवलंबून राहावे लागे. अशा परिस्थितीत एखाद्री राजकीय क्रांती अथवा युध्द सुरू झाल्यास अशा आयात-निर्यातीच्या व्यापार्यास धोका उत्पन्न होई व त्यावर अवलंबून असणारे उद्योग धंदेही धोक्यात येत.
९. भांडवलशाहिचा उद्य आणि विकास :
कारखान्यांची स्थापना करणे व ते कार्यक्षमतेने चालविणे, हे सामान्य कामगारांच्या आवाक्यातील काम नव्हते. साहजिकच युरोपियन समाजात अस्तित्वात असलेला उद्योगपती व व्यापारी वर्ग हाच आता कारखानदार वर्ग बनला. परिणामी युरोपियन राष्ट्रांमध्ये बडया भांडवलदारांचा एक प्रबळ वर्ग निर्माण झाला.
१०. युरोपियन साम्राज्यवादास चालना :
औद्योगिक क्रांतीच्या दुसर्या पर्वात, विशेषत: सन १८८० ते १९१० या कालखंडात युरोपियन साम्राज्यवादास मोठी चालना मिळाली. मागील तीनशे वर्षात युरोपियन साम्राज्यवादीची जेवढी वाढ झाली होती त्याहुन अधिक वाढ या तीस वर्षात झाली. या प्रचंड वाढीमागे औद्योगिक क्रांतीची शक्तीच काम करीत होती. कोळसा व लोखंड यासारखी खनिजे आणि इतर कच्चा माल ही या कारखानदारीची मुख्य गरज होती. तसेच तिच्यातून तयार होणार्या प्रचंड पक्का मालास हमखास बाजारपेठा या औद्योगिक गरजेतून युरोपाबाहेरील प्रदेशांवर वर्चस्व स्थापन करण्याची युरोपियन राष्ट्रांंची साम्राज्यवादी स्पर्धा दिवसेंदिवस अधिक तीव्र बनत गेली. एवढे मोठे आफि्रका खंड, पण अवघ्या तीस वर्षात ते पूर्णपणे युरोपियन साम्राज्यवादाच्या वर्चस्वाखाली गेले. अशा तीव्र साम्राज्य स्पर्धेतून अतिरेकी लष्करीकरण व युध्दे अटळ ठरली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
खूप चं माहिती मिळते या ब्लोग वर
ReplyDelete