Thursday, 18 July 2013
पहिले महायुध्द
आधुनिक जगाच्या इतिहासात पहिले महायुध्द ही अत्यंत महत्त्वाची घटना समजली जाते. हे महायुध्द सन १९१४ साली सुरू झाले आणि १९१८ साली संपुष्टात आले. पूर्वी कधी झाला नव्हता असा मानवाच्या जीविताचा व विज्ञ्ल्त्;ााचा संहार या युध्दात घडून आला. युरोपातील बाल्कन प्रदेशातील बोस्निया नावाच्या एका प्रांताच्या राजधानीच्या ठिकाणी ऑस्ट्रियाच्या युवराजाचा व युवराज्ञम्प्;ीचा खून झाला आणि पहिल्या महायुध्दाची ठिणगी पडली, या ठिणगीने युरोपात व पर्यायाने सर्व जगात महायुध्दाचा स्फोट घडवून आणला आणि जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्रे व देश या संघर्षात ओढले गेले. कारण युरोपियन राजकारणाच्या तळाशी होती.
पहिल्या महायुद्धाची कारणे
१. अतिरेकी राष्ट्रवाद :
एकोणिसाव्या शतकात युरोपात राष्ट्रवादी भावनेची खूपच वाढ होती. राष्ट्रवाद जेव्हा आक्रमक बनतो, तेव्हा त्याचे स्वरूप साम्राज्यवादी बनते.पहिल्या महायुध्दापूर्वी युरोपात जवळ जवळ सर्व राष्ट्रांमध्ये अशा प्रकारचा अतिरेकी राष्ट्रवाद उद्यास आला होता.
२. वसाहती मिळण्यासाठी स्पर्धा :
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि पहिल्या महायुध्दाच्या पूर्वी युरोपियन राष्ट्रांमध्ये जी साम्राज्यस्पर्धा चालली होती ती जागतिक परिस्थित स्फोटक करण्यात खरी जबाबदार होती. कच्च्या मालाचा पुरवठा करणार्या आणि पक्का माल विकत घेणार्या वसाहती अधिकाधिक मिळविण्यासाठी इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड, स्पेन, जर्मनी, इटली, रशिया इत्यादी राष्ट्रांत स्पर्धा सुरू होती. ज्या राष्ट्राकडे मोठमोठया वसाहती ते राष्ट्र समर्थ आणि श्रीमंत बनते, हे समीकरण पाहून जर्मनी व इटली ही राष्ट्रेही वसाहती मिळविण्याची धडपड करीत होती.
३. आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभाव :
आज जसे राष्ट्राराष्ट्रांमधील व्यवहार नियमित करणारे आंतरराष्ट्रीय कायदे आहेत, तसे ते पहिल्या महायुध्दापूर्वी नव्हते. प्रत्येक राष्ट्र स्वत: ला सार्वभौम आणि वाटेल तसे वागावयास मोकळे आहे. असे समजत असे. स्वाभाविकच आंतरराष्ट्रीय जगतात. 'बळी तो कान पिळी' हा न्याय प्रस्थापित झाला होता.
४. आंतरराष्ट्रीय राजकारणामधील गुप्तता :
बिस्मर्कच्या काळापासून आंतरराष्ट्रीय राजकारणात एक प्रकारची धास्ती आणि अस्वस्थता निर्माण झाली होती. युरोपातील प्रत्येक राष्ट्राला दुसर्या राष्ट्रांच्या सामर्थ्याची भीती वाटत होती. परिणामी युरोपियन राष्ट्रांमध्ये अनेक लष्करी करार घडून आले. हे लष्करी करार अत्यंत गुप्त राखले गेल्यामुळे तर आंतरराष्ट्रीय राजकारण अधिकच गढूळ आणि युध्दाच्या स्फोटाला अनुकूल बनले.
५. संघ-प्रतिसंघ योजना :
फ्रान्सच्या संभाव्य आक्रपणापासूनच जर्मनीचे संरक्षण करण्यासाठी बिस्मर्ाकने सन १८८२ साली जर्मनी, ऑस्टि्रया-हंगेरी आणि इटली या तीन राष्ट्रांचा एक करार-त्रिराष्ट्र मित्रकरार(टरप्ल्एि अल्ल्ािन्च्ए)घडवून आणला होता. फ्रान्स. इंग्लंड व रशिया ही राष्ट्रे परस्परांमधील हेवेदावे व शत्रुत्व विसरून जर्मनीच्या आक्रमण धोरणाविरुध्द एक झाली आणि सन १९०७ साली या राष्ट्रांचा त्रिमित्रसंघ(टरप्ल्एि श्र्न्त्एन्त्ए)अस्तित्वात आला. युरोपात हे संघ-प्रतिसंघ निर्माण झाले होते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात दोन लष्करी गटच तयार झाले होते. हे गट परस्पांविषयी संशयी असल्याने त्याच्या समजूतदारपणा निर्माण होणे अशक्य होते.
६. अतिरेकी लष्करीकरण :
राष्ट्रराष्ट्रांमधील भीती आणि संशय यामुळे युरोपात सर्वत्र लष्करीकरणाची जोरदार तयारी सुरू झाली होती. युरोपातील प्रत्येक राष्ट्र भूदल आणि आरमार यांची संख्या व सामर्थ्य वाढवू लागले होते.
७. युरोपातील लोकमत आणि वृत्तपत्रे :
पहिल्या महायुध्दापूर्वी युरोपातील वृत्तपत्रे अतिरेकी राष्ट्रवादाच्या आहारी जाऊन आपापल्या देशातील लोकमत युध्दात अनुकूल बनवत होती. प्रतिस्पर्धी राष्ट्रासंबंधी विकृती व अतिरंजित बातम्या देऊन वृत्तपत्रांनी आपल्या वाचकांच्या भावना भडकविण्याचा केलेला मोठा प्रयत्न युध्दात वातावरणानिर्मितीसाठी पोषक ठरला.
८. बाल्कन समस्या :
युरोपातील बाल्कन प्रदेशात अनेक राष्ट्रांचे गुंतागुंतीचे हितसंबंध निर्माण झाले होते. प्रामुख्याने ऑस्टि्रया व रशिया या दोन राष्ट्रांचे बाल्कन प्रदेशात आपापले वर्चस्व निर्माण करण्याची स्पर्धा सुरू होती. ऑस्ट्रियाने सन १९०८ साली हे दोन्ही प्रांत आपल्या साम्राज्यात विलीन करून टाकले, तेव्हा बाल्कनमधील समस्या अधिकच गंभीर बनली. हे दोन प्रांत स्लाव वांशिक असल्याने सर्बियाला ते हवे होते. या प्रकरणावरून ऑस्टि्रया व सर्बिया यांच्यातील वैमनस्य वाढत गेले आणि त्याचा स्फोट युध्दाच्या रूपाने झाला.
९. जर्मनी व फ्रान्स यांच्यामधील वितुष्ट :
सन १८७०-७१ च्या फ्रॅको-जर्मन युध्दात फ्रान्स पराभूत होऊन जर्मनीने त्याच्या कडून अल्सेस व लोरेने हे दोन फ्रेंच हिसकावून घेतले. त्यामुळे भावनावश फ्रेंच व्यथित व संतप्त झाले होते. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी त्यांनी जर्मनीविरोधी सूडाची भावना सतत प्रज्वलित ठेवली होती.
१० . कैसर विल्यमची महत्त्वांकाक्षा :
जर्मनीच्या सम्राटाची, कैसर विल्यम दुसरा याची महत्त्वाकांक्षा पहिल्या महायुध्दास बर्यास प्रमाणात कारणीभुत ठरली. इंग्लंडच्या श्रेष्ठ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या त्याला हेवा वाटत होता. असा दर्जा मिळवून सर्व जगात जर्मन राष्ट्र श्रेष्ठ आंतरराष्ट्रीय दर्जाचा त्याला हेवा वाटत होता. असा दर्जा मिळवून सर्व जगात जर्मन राष्ट्र. श्रेष्ठ व प्रबळ व्हावे ही त्याची महत्त्वाकांक्षा होती. ही महत्त्वाकांक्षा पुरी करायची तर इंग्लंडशी संघर्ष अपरिहार्य आहे, मग त्या संघर्षात जर्मनीचा पराभव झाला तरी चालेल, असे त्याचे मत होते.
११. तात्कालिन कारण :
२८ जून १९१४ रोजी ऑस्ट्रियाचा युवराज व युवराज्ञम्प्;म्प्;ााी यांच्या बोस्नियाच्या राजधानीत एका सर्बियन राष्ट्रवाद्याने केलेला खून हे पहिल्या महायुध्दाला निमित्त ठरले. हा खून सर्बियाच्या चिथावणीनेच झाला, अशी ऑस्ट्रियाने भुमिका घेऊन त्याने ४८ तासांच्या मुदतीचा एक निर्वानीचा खलिता सर्बियाकडे पाठविला. सर्बियाने सबुरीने वागण्याचा खूप प्रयत्न केला. पंरतु ऑस्ट्रियाच्या ताठर भूमिकेमुळे शेवटी सर्बियाशी त्याचे युध्द सुरू झाले (२८ जुलै १९१४).
युध्दाचा वणवा सर्वत्र पसरला :
बाल्कनमध्ये पडलेल्या या ठिणगीने फक्त ऑस्टि्रया-हंगेरी आणि सर्बिया यांच्या मध्येच युध्द न भडकता ते सर्व युरोपभर, नव्हे सर्व जगभर, पसरले. रशिया बाल्कनमधील स्लावांचा पाठीराखा व ऑस्ट्रियाचा कट्ट्र शत्रू होता. त्याने लष्करी हालचाली सुरू करता व ऑस्ट्रियाचा पाठीराखा जर्मनी याने रशियाविरुध्द युध्द पुकारले. फ्रान्स हा रशियाशी कराराने बध्द झाल्यामुळे जर्मनीने त्याच्याशीही युध्द पुकारले (३ ऑगस्ट १९१४). दरम्यान जर्मंनीने फ्रान्सवर हल्ला करण्यासाठी बेल्जियम या तटस्थ राष्ट्राच्या प्रदेशातून आपल्या फौजा घुसविल्या. जर्मनीने आंतरराष्ट्रीय कराराचा अशा प्रकारे भंग केल्याचे पाहून इंग्लंडने त्याच दिवशी त्याच्या विरुध्द युध्दात उडी घेतली (४ ऑगस्ट १९१४). इंग्लंडच्या सुरक्षितेसाठी बेल्जियमचे स्वातंत्र्य अबाधित राहणे आवश्यक आहे, असे ब्रिटिशांना वाटत होते. त्रिराष्ट्र मैत्री - करारान्वये इटली हा ऑस्टि्रया व जर्मनी यांच्या सहाय्यास जावयास हवा होता. परंतु तो स्वार्थी हेतूने वागला. प्रथम तटस्थ राहून शेवटी आपल्या जुन्या मित्रांविरुध्द फ्रान्स-इंग्लंड यांना तो मिळाला (सन १९१५). पश्चिम ऑस्ट्रियामधील इटालियन भाषिक प्रदेश प्राप्त करून घ्यायचा इटलीचा उद्देश होता. जपान हा इंग्लंडचा दोस्त त्याने पूर्वेकडे जर्मनी विरुध्द युध्द पुकारून जर्मन वसाहती ताब्यात घेण्याचा सपाटा लावला. युध्द चालू असताना युरोपातील व युरोपाबाहेरील अनेक देश या युध्दात ओढले गेले. जर्मन पाण्यबुडयांनी अमेरिकन जहाजांवर केलेल्या बेदरकार हल्ल्यांमुळे अमेरिकेनेही जर्मनीविरुध्द युध्द पुकारले (एप्रिल १९१७). अमेरिकेसारखी प्रबळ लष्करी शक्ती दोस्तांच्या बाजूने उभी राहिल्यामुळे युध्दामधील त्यांचे पारडे जड झाले.
पहिल्या महायुध्दाचे परिणाम :
१. जिवीत आणि वित्त यांची हानी :
या युध्दात पृथ्वीवरील मानवाची जीवित व वित्त हानी प्रचंड प्रमाणावर झाली. १० दशलक्ष सैनिक ठार झाले. युध्द चालू असताना रोज ६ हजार सैनिक ठार होत होते. या शिवाय २० दशलक्ष सैनिक अपंग अथवा जबर जखमी झाले. युध्द चालू असता दर तासाला १० दशलक्ष डॉलर्स संपत्तीचा चुराडा होत होता.
२. शस्त्रास्त्रांची वाढ :
या महायुध्दाच्या काळात जगातील युध्दखोर राष्ट्रांनी आपापल्या देशांतील शास्त्रज्ञम्प्;ांना व संशोधकांना युध्दसाहित्याच्या संशोधनाच्या कामाला जुपंले. अधिकाधिक मनुष्यसंहार करणारी शस्त्रे संशोधक तयार करू लागले.
३. सर्व समाज ढवळून निघाला :
या युध्दासारखे युध्द पूर्वी पृथ्वीतलावर केव्हाच खेळले गेले नव्हते. सतत पाच वर्षे जगातील अनेक युध्द- आघाडयांवर मनुष्यसंहार होत राहिला. लक्षावधी सैनिक ठार झालेच, परंतु त्यांच्या कुटुंबियाचे जीवनाही उद्ध्वस्त झाले. लाखोंच्या कपाळी अपंगत्व आले. लाखो घरांत निराशेचा अंधार पसरला. असे फक्त पराभूत राष्ट्रांतच झाले असे नाही, तर विजयी राष्ट्रांचे नागरिकही असेच होरपळून निघाले. हे युध्द सर्वस्पर्शी झाले.
४. युध्दप्रचार तंत्रचा विकास :
आपल्या बाजूच्या राष्ट्रांतील व जगातील लोकमत सतत आपल्या बाजूने राहावे यासाठी उभय पक्षांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यामुळे युध्दप्रचार हे एक तंत्र म्हणून उद्यास आले. या तंत्राचा वापर दोन्ही पक्षांनी बेजबाबदारपणे केला.
५. जर्मनीला मिळालेली शिक्षा आणि तिचे परिणाम :
व्हर्साचा तह दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवर लादलेला होता. तह स्वीकारा अन्यथा जर्मनीवर पुन्हा आक्रमण करण्यात येईल, अशी धमकी दिल्यावरच जर्मन सरकारने तो स्वीकारला होता. व्हर्सायच्या तहाने जर्मनीचा १|१० प्रदेश हिरावून घेण्यात आला. जर्मनीची अशी लांडगेतोड केल्यामुळे या तहाने फ्रान्सपेक्षाही छोटा देश बनला. तसेच जर्मनीचे जवळ जवळ सर्व व्यापारी व लष्करी आरमार विजयी राष्ट्रांनी हिसकावून घेतले.
या अपमानास्पद अटीमुळे जर्मनांची जगात मोठी अवहेलना झाली. त्यांच्या अर्थव्यवस्थेवे कंबरडे मोडले. त्यांचा लोकशाहिचा प्रयोग अयशस्वी झाला आणि जर्मन लोकशाहीच्या नाशातून हीटलरसारखा हुकुमशहा उद्यास आला.
६. इटलीची निराशा व तिचे परिणाम :
इटलीने जर्मनी-ऑस्टि्रया यांच्या गोटाचा त्याग करून दोस्तांच्या बाजूने या युध्दात उडी टाकली होती. इतर राष्ट्रांप्रमाणेच इटलीची मोठी जीवित व वित्त हानी झाली होती. पराभूत राष्ट्रांच्या वसाहतीपैकी इटलीला काहीही देण्यात आले नाही. पॅरिस परिषदेत इंग्लंड, फ्रान्स व अमेरिका या बडया राष्ट्रांच्या नेत्यांनी इटलीचा पंतप्रधान ऑरलॅंडो याची अवहेलनाच केली. परिणामी तो परिषदेतून मधूनच उठून गेला. या सर्वाचा परिणाम इटालियन समाजावर झाला. दोस्तांनी आपणास फसविले, ही भावना इटलीमध्ये दिवसेंदिवस वाढीस लागली. पॅरिस परिषदेमधील इटलीच्या अपयशाचे खापर इटालियन लोकांनी आपल्या सरकारवर फोडले व पुढे हे लोकशाहीवादी सरकार गडगडून त्याच्या जागी मुसोलिनी हा हुकुमशहा उद्यास आला. जर्मनीमधील हीटलर व इटली मधील मुसोलिनी यांचा उद्य म्हणजे पहिल्या महायुध्दाचे सर्वांत वाईट परिणाम होत.
७. एक बलाढय शक्ती म्हणून अमेरिकेचा उद्य :
पहिल्या महायुध्दाचा एक मोठा परिणाम म्हणजे जागतिक राजकारणात अमेरिकेचा एक बलाढय शक्ती म्हणून झालेला उद्य हा होय.
८. राष्ट्रसंघाची निर्मिती :
प्रचंड मनुष्यसंहार व वित्ताचा नाश हे महायुध्दाचे भयंकर परिणाम होत. अशा प्रकारचे युध्द पुन्हा खेळले जाऊ नये, राष्ट्राराष्ट्रांमधील मतभेद सामोपचाराने मिटविले जावेत व जग हे सुरक्षित राहावे, यासाठी प्रे. विल्सनच्या राजकीय तत्त्वज्ञानानुसार बडया राष्ट्रांनी राष्ट्रसंघाची निर्मिती केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Very informative article. I found this article as a short and well written description of the war played for 5 years. Thanks for the wonderful information.
ReplyDeleteThanks
ReplyDeleteits very nice information short but important
Nice
ReplyDelete