Tuesday, 23 July 2013
जीवसृष्टीचा उगम
पृथ्वीची उत्पत्ती सुमारे ५ अब्ज वर्षापूर्वी झाली. पृथ्वीवर जीवनाची सुरूवात कशी व केव्हा झाली याविषयी शास्त्रज्ञमध्ये एकमत नाही. विविध शास्त्रज्ञम्प्;ांनी विविध मते मांडली आहेत. पृथ्वी हा सुरूवातीस विविध वायुंनी बनलेला तत्प गोळा होता. क्रमाक्रमाने पृथ्वी थंड होत गेली. पृथ्वीवर निर्माण झालेली वैशिष्टयपूर्ण स्थिर परिस्थिती ही जीवसृष्टीच्या उगमाची पहिली पायरी समजली जाते.
जीवसृष्टीचा उगम पृथ्वीवरच झाला हेच खरे. भूशास्त्रज्ञम्प्;ांच्या मते सुमारे २ अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर जीवांचा उगम होण्यास योग्य असे वातावरण होते, या प्रकारचे वातावरण आता अस्तित्वात नाही. हाल्देन (इंग्रज) आणि ओपारिन (रशियन) या दोन शास्त्रज्ञम्प्;ांनी जीवांच्या उत्पतीविषयी प्रयोगावर आधारित प्रथम मते मांडली. त्यांच्या मते पृथ्वीवरील सुरूवातीचे वातावरण अमोनिया, मिथेन आणि बाष्पयुक्त होते. त्या वेळच्या महासागरांच्या पाण्यात अमोनिया, मिथेन तसेच विविध खजिने विरघळलेल्या अवस्थेत होती. जलाशयातील या पाण्यात विविध रासायनिक मूलद्रव्यांमध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन पहिला जीव निर्माण झाला. कार्बन अणूभोवतीचा प्रथम जीवाची उत्पत्ती झाली. कार्बनाच्या संयुगातून प्रथम सेंदि्रय द्रव्यांची निर्मिती झाली. मिथेन, आणि पाणी यंाच्या प्रक्रियेतूनर्शकरायुक्त कर्बोद्रके, कार्बन, हायड्रोजन, आणि ऑक्सिजन यांच्या प्रक्रियेतून प्रथम ग्लिसेरॉलसारखी संयुगे व नंतर फॅटची निर्मिती झाली. याच तीन मूलद्रव्यांबरोबर चौथे मूलद्रव्य नत्र एकत्र आल्याने प्रथिने आणि अमिनो आम्लांची निर्मिती झाली. सर्व सजीवांच्या शरीरात या पदार्थांचे रेणू महत्त्वाची भूमिका बजावतात. यानंतरची प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. पायरीमिडाइन्स आणि प्युराइन्स कार्बनची संयुगे र्शकरा आणि फॉस्फेट यांच्याशी रासायनिक प्रक्रियेने बांधली गेली. यातूनच न्यूक्लीओटाइडस्ची निर्मिती होते. न्यूक्लीओटाइडसची एकमेकांशी प्रक्रिया होऊन न्यूक्लीक आम्ले निर्माण होतात व शेवटी न्यूक्लीक आम्ले आणि प्रथिने यांच्यात रासायनिक प्रक्रिया होऊन न्यूक्लिओ प्रथिने निर्माण होतात. न्यूक्लिओ प्रथिने हे एक प्रकारचे गुंतागुतीचे संयुग असून त्याच्याभोवती जीवाची निर्मिती होण्याची शक्यता सर्वाधिक असते. या प्रक्रियेसाठी लागणारी ऊर्जा सुर्यप्रकाशासाठी अतिनील किरणे आणि ढगांमधील वारंवार निर्माण होणार्या विजेच्या आविष्कारातून मिळाली असली पाहिजे.
जीवसृष्टीच्या उगमासंदर्भात अनेक सिध्दांत आणि उत्त्पती मांडल्या गेल्या जीवाच्या उस्फूर्त निर्मितीच्या सिध्दांताप्रमाणे अगदी गुंतागुंतीचे जीवसुध्दा निर्जीव पदार्थापासून अचानक निर्माण झाले असावेत. कॉस्मोझोईक सिध्दांताप्रमाणे मूळ बीजकण विश्वाच्या दुरवरच्या भागातून पृथ्वीपर्यंत योगायोगानेच पोहोचले व त्यापासूनच जीवसृष्टी निर्माण झाली.
अतिसूक्ष्म रोगाणू किंवा विषाणू हे पृथ्वीवरील पहिले जीव असावेत. विषाणुतूनच प्राथमिक पेशिकांची निर्मिती झाली. पर्यावरणातील विविध द्रव्यांच्या साहाय्याने या प्राथमिक पेशीतूनच क्रमाक्रमाने आधुनिक पेशींची निर्मिती झाली असे मानले जाते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment