Tuesday, 23 July 2013

युरोप


काही इतिहासकार मध्ययुगाचे वर्णन 'तमोयुग' असे करतात. परंतु खरे तर इतिहासातील कोणताही कालखंड पूर्णपणे अंधकारमय नसतो. मध्ययुगाचा सुरुवातीचा काळ हा मोठया र्‍हासाचा आणि प्रगतीच्या अभावाचा काळ होता. परंतु त्या तुलनेत मध्ययुगाचा उत्तरार्ध मात्र अनेक बाबतींत प्रकाशमान होता. मध्ययुगीन युरोपात राजकीय अस्थिरता होती. परंतु काळाच्या ओघात ही अस्थिरता कमी होत होत गेली आणि युरोपमध्ये काही बदल घडून आले. हा स्थित्यंतराचा कालखंड होता. या कालखंडातील बदलांमुळे आधुनिक युरोपचा पाया घातला गेला. या बदलांची चर्चा आता आपण करणार आहोत.

चर्च आणि राज्य :- संपूर्ण मध्ययुगाच्या काळात चर्च आणि राज्य या दैवी संस्था मानल्या जात असत. चर्चने क्ष्रिस्ती मानवाच्या आत्म्यावर तर राज्याने शरीरावर नियंत्रण ठेवणे अभिप्रेत होते.

मध्ययुगीन युरोपात चर्च ही एक अत्यंत प्रबळ अशी संस्था होती. चर्चच्या यंत्रणेचा पोप हा धार्मिक प्रमुख होता. तो सर्वोच्च धार्मिक अधिकारी होता. त्यांच्या अधिकाराखाली आर्च बिशप, बिशप, पॅरिश-प्रीस्ट इत्यादी इतर धार्मिक अधिकारी असत. चर्चची अधिकृत भाषा लॅटिन ही होती.

मध्ययुगास प्रारंभ होण्यापूर्वीच संपूर्ण युरोपखंडात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला होता. मध्ययुगात समाज जीवनावरील चर्चचा प्रभाव खूपच वाढला होता. चर्चचे युरोपच्या आर्थिक व राजकीय जीवनावरसुध्दा नियंत्रण होते. चर्चच्या प्रभावाचे एक कारण म्हणजे या संस्थेने केलेले शिक्षणाचे कार्य होय. खरेतर या काळात शिक्षण ही चर्चची मक्तेदारी होती. प्राचीन काळातीलज्ञम्प्;ानाच्या सर्व शाखा आणि ग्रीक व लॅटिन यांसारख्या प्राचीन भाषा यांचे संवर्धन चर्चच्या माध्यमातून झाले. चर्चने या काळात युरोपचे सांस्कृतिक ऐक्य टिकविण्याचे आणि त्याला बळकटी आणण्याचे कार्य केले.

चर्चची स्वत:ची कायदेव्यवस्था होती. तसेच तिची अंमलबजावणी करणारी स्वतंत्र धार्मिक न्यायालये असत. धर्मसंस्थेची अवज्ञम्प्;ा करणार्‍या व्यक्तीस धर्मबहिष्कृत करण्यात येत असे. त्यामुळे राजे आणि सामंतसुध्दा चर्चला घाबरत असत. प्रत्येक राजाच्या दरबारात पोपचा दूत असे. राजसत्तेपेक्षा धर्मसंस्था श्रेष्ठ आहे असा चर्चचा दावा होता. चर्च आणि राज्या यांच्या अधिकार क्षेत्रांची सरमिसळ झाली होती. त्यामुळे काही वेळा धर्मसंस्था आणि राजसत्ता यांच्यामध्ये संघर्ष होत असे. १३ व्या शतकाच्या सुरुवातीला चर्चला प्रभाव कळसास पोहोचला होता.

चर्चच्या वाढत्या प्रभावाबरोबरच धर्मगुरुंचे नैतिक अध:पतन होऊ लागले. त्यांच्यात ऐहिक सुखोपभोगाची लालसा उत्पन्न झाली. अनेक वरिष्ठ धर्मगुरु उमराव घराण्यांमधून आले होते. त्यामुळे त्यांना कनिष्ठ वर्गाविषयी व धार्मिक कार्याविषयी आस्था नव्हती. म्हणून सर्वसामान्य जनतेत या धर्मगुरुंविषयी असंतोष वाढला. त्यातून मध्ययुगाच्या अखेरीस धर्मसुधारणेची चळवळ सुरु झाली. नवव्या पाठात आपण तिचा अभ्यास करणार आहोत.

मध्ययुगातील व्यापार व उदयोग :-मध्ययुगाच्या सुरुवातीस व्यापार व उदयोग यांच्या क्षेत्रात साचेबंदपणा आला होता. त्यांचे प्रमुख कारण म्हणजे या काळात असणारा रोख चलनाचा तुटवडा हे होते. सततच्या युद्धजन्य स्थितीमुळे प्रवास व दळणवळण धोक्याचे झाले होते. अनेक ठिकाणी सीमाशुल्क भरावे लागत असल्यामुळे व्यापार्‍यांना व्यापार परवडत नसे. चाचेगिरी वाढल्यामुळे जलमार्ग धोक्याचे झाले होते. अशा अनेक कारणांमुळे व्यापार व उदयोगास खीळ बसली. या काळात राज्यकाराभारातही सातत्याने बदल होत गेले. धर्मयुद्धांमुळे युरोपचा पौर्वात्य देशांशी संर्पक वाढला. पौर्वात्य वस्तंूची युरोपातील आवक पुन्हा वाढू लागली. व्यापारवाढीस चालना मिळाली. त्याचप्रमाणे अरबांच्या प्रगत व्यापारी संस्कृतीशी त्यांचा परिचय झाला.

नवीन शहरांचा उदय :-राजकीय अस्थैर्य आणि आर्थिक मंदीमुळे मध्ययुगाच्या सुरुवातीस अनेक समृद्ध शहरे ओस पडली. परंतु नंतर व्यापार वाढल्यामुळे व्हेनिस, जिनोआ, मिलान, फलॉरेन्स, मेन्झ, स्ट्रॉसबर्ग, हॅम्बुर्ग इत्यादी नवी शहरे उदयास आली. यांपैकी व्हेनिस व जिनोआ ही आंतरराष्ट्रीय व्यापाराची केंद्र बनली. त्या शहरांमधील प्रशासन स्वायत्त नगरराज्याप्रमाणे असून लोकशाहीप्रधान होते. त्यांच्यावर व्यापार्‍यांचे लोकशाही पध्दतीचे नियंत्रण होते. वाढत्या व्यापारी सवलतींमुळे कामगारांची संख्या वाढली. कष्टकरी वर्ग खेडयांमधून शहरांमध्ये स्थलांतरित होऊ लागला. त्याचा शहरातील सामाजिक जीवनावरही परिणाम झाला. यामुळे समाजाच्या नागरीकरणाची प्रक्रिया सुरु झाली.

मध्ययुगीन अर्थ व्यवस्था :- मध्ययुगीन अर्थ व्यवस्थेवर सामंतशाहीचा प्रभाव होता. जमीन हे संपत्तीचे प्रमुख साधन होते. सामंत हे प्रमुख जमीनदार होते. प्रत्यक्ष शेतीची कामे भूदास करीत असत. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक तेवढे धान्य देऊन उरलेले उत्पादन सामंत स्वत:जवळ ठेवीत असत. त्यामुळे समाजात गरीब व श्रीमंत असे दोन वर्ग निर्माण झाले. व्यापार आणि उदयोगास गती मिळाल्यावर कारागीर व व्यापारर्‍यांचा एक नवा वर्ग समाजात उदयास येऊ लागला.

व्यापार व उदयोगाचे नियंत्रण करण्यासाठी कारागीर व व्यापार्‍यांच्या श्रेणी असत. या श्रेणींना मध्ययुगीन अर्थव्यवस्थेत महत्वाचे स्थान होते. त्या व्यापार व उदयोगविषयक कामे करीत असत. शिवाय गरजू व्यक्तींना कर्जपुरवठाही करीत असत. काही श्रेणींच्या मदतीने शाळा चालविल्या जात असत. काही श्रेणी कलाकारांना आर्थिक मदतसुध्दा देत असत. मध्ययुगाच्या अखेरीस आर्थिक व्यवहारात चलनाचा वापर मोठया प्रमाणात सुरु झाला. 'डयुकाट' यांसारख्या चलनांना आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झाली होती. मोठया शहरांमध्ये व्यापारी पतपेढया स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यांच्यामार्फ़त हंुडया देण्याची व वटविण्याची व्यवस्था करण्यात येत असे.

मध्ययुगीन समाज व्यवस्था :- मध्ययुगीन युरोपीय समाजातील वरिष्ठ वर्गात धर्मगुरु व उमरावांचा समावेश होत असे. यांपैकी उमराव हे पद वंशपरंपरेने मिळत असे. उमराव वर्गास काही विशेष अधिकार असत. त्यात करमुक्तता आणि न्यायविषयक अधिकारांचा समावेश होत असे. उमरावांविरुध्द बंड करणे हा गुन्हा समजला जाई. समाजातील संपत्तीचा मोठा वाटा उमरावांच्या मालकीचा असे. उमराव आपला उच्च सामाजिक दर्जा राखण्यासाठी दरबारी रीतिरिवाज आणि डामडौल यांना विशेष महत्व देत.

वरिष्ठ धर्मगुरुंची जीवनपध्दती उमरावांसारखीच होती. कनिष्ठ धर्मगुरुंचे जीवन मात्र सर्वसामान्य जनतेप्रमाणे होते. बहुतेक सर्व धार्मिक कार्याचा भार कनिष्ठ धर्मगुरुंवर असे. वरिष्ठ धर्मगुरु व उमरावांखेरीज इतर सर्व व्यक्तींचा समावेश कनिष्ठ वर्गात होत असे. त्यातील बहुतांश लोक शेतकरी होते. बाकीचे लोक व्यापारी व इतर व्यावसायिक त्यांच्यावरच बहुतेक सर्व करांचे ओझे असे. याशिवाय भूदासांचा आणखी एक वर्ग युरोपीय समाजात होता. परंतु त्याला कोणतीही सामाजिक प्रतिष्ठा नव्हती.

भूदास पध्दती :- भूदास म्हणजे जमिनीशी कायमचा बांधलेला मजूर होय. त्याची गुलामाप्रमाणे विक्री होत नसे, परंतु त्याची अवस्था गुलामाप्रमाणेच होती.आपल्या धन्यासाठी रात्रंदिवस राबत राहणे हे त्याचे काम होते. भूदासांचे जीवन अत्यंत हलाखीचे होते. मध्ययुगाच्या सुरुवातीस ज्या वन्य जमातींच्या लोकांना रोमन साम्राज्यात स्थायिक होण्याची परवानगी देण्यात आली होती, त्यांपैकी काही वेठबिगार म्हणून राहिले तेव्हापासून भूदास पध्दती सर्व युरोपात पसरली.

पूर्वेकडील रोमन साम्राज्य :- रोमन सम्राट कॉन्स्टन्टाईन याने पूर्वेकडील बायझॅन्टियम तथा कॉन्स्टॅन्टिनोपल या शहरास रोमन साम्राज्याच्या दुसर्‍या राजधानीचा दर्जा दिला. तेव्हापासून कॉन्स्टॅन्टिनोपलचे राज्य बायझन्टाईन साम्राज्य किंवा पूर्वेकडील रोमन साम्राज्य म्हणुन ओळखले जाऊ लागले. प्राचीनग्रीक आणि मध्ययुगीन पौर्वात्य संस्क्ृतींचे मिश्रण असलेली एक नवी भिन्न संस्कृती या साम्राज्यात विकसित होत गली. नवव्या शतकात या साम्राज्याने वैभवाचे शिखर गाठले.मात्र दहाव्या शतकापासून त्याचा र्‍हास सुरु झाला. इ.स. १४५३ मध्ये ऑटोमन तंुकर्ांनी कॉन्स्टॅन्टिनोपल जिंकलीे. त्याचबरोबर बायझन्टाईन साम्राज्य नष्ट झाले.

मध्ययुगीन युरोपचा सांस्कृतिक वारसा :- मध्ययुगात युरोपच्या अर्वाचीन इतिहासातील अनेक संकल्पना व संस्थांचा पाया घातला गेला. कॉन्स्टॅन्टिनोपलमांर्गे पौर्वात्यज्ञान युरोपात पोहोचले आणि युरोपातलल प्रबोधनास चालना मिळाली. राष्ट्रवाद, देशभक्ती या तत्वांचा व प्रशासनाच्या क्षेत्रातील नवीन पदधतींचा वारसा युरोपने मध्ययुगाकडून उचलला. भांडवलशाही अर्थव्यवस्था, प्रभावी मध्यम वर्ग आणि धार्मिक सुधारणा इत्यादींचा उगम मध्ययुगात झाला.

मध्ययुगात युरोपमध्ये अनेक विदयापीठे उदयास आली. त्यांपैकी बोलेग्नो, सालेरेनो, पॅरिस, ऑक्सफर्ड आणि विटेनबर्ग ही विदयापीठे विशेष प्रसिदधीस आली. याच काळात मुद्रणकलेचा शोध लागला. त्यामुळे ज्ञानप्रसाराचे नवे माध्यम उपलब्ध झाले. शार्लमेनसारखे शासक व काही पोप यांसारख्या विदयाप्रेमींनी नव्या शिक्षणसंस्थांचा पाया घातला गेला. अर्वाचीन काळातील धर्मसंस्था, तत्वज्ञान,शिक्षण, शास्त्र, वाड:मय, कला, प्रशासन व्यवस्था यांचा उगम मध्ययुगातच झाला. पीटर अ‍ॅबेर्लॉड हा मध्ययुगातील एक श्रेष्ठ तत्वज्ञम्प्; होता थॉमस अ‍ॅक्विनास या तत्वज्ञ;म्प्;ााने श्रद्धा आणि बुद्धिवाद हे परस्परांशी विसंगत नाहीत असे प्रतिपादन केले. मध्ययुगीन तत्वज्ञम्प्;ांनी प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानाचे पुनरु ज्जीवन केले. नवीन शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण झाल्यामूळे नवीन वैज्ञानिक शोधही याच काळात लागले. त्याचप्रमाणे धाडसी खलाशांच्या पर्यटनातून नव्या भौगोलिक शोधांना प्रेरणा मिळाली. मध्ययुगाची अर्वाचीन युगास मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे आधुनिक युरोपीय भाषांचा विकास ही होय. यामुळे अनेक महान साहित्यिक युरोपला लाभले. मध्ययुगात प्राचीन रोमन, बायझन्टाईन, ख्रिश्चन तसेच वन्य जमातींच्या कला आणि स्थापत्याच्या संयोगातून एक नवीन कलाशैली विकसित झाली. कलेच्या या शैलीतून प्रबोधनकालीन कलेचा पाया घातला गेला.

राष्ट्र-राज्यांचा उदय :- प्राचीन रोमन काळातील राज्याची कल्पना आणि मध्ययुगीन सामंतशाहीच्या काळातील विकेंदि्रत राज्याची कल्पना या राजकीय प्रशासनाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने कुचकामी ठरल्या. मध्ययुगाच्या उत्तरार्धात एक नवी व्यवस्था आकाराला आली. ती 'राष्ट्र-राज्य' म्हणून ओळखली जाते. 'राज्य आणि 'राष्ट्र' या दोन्ही संज्ञम्प्;म्प्;ाांचे अर्थ वेगवेगळे आहेत. निश्चित सीमांनी युक्त असा भूप्रदेश , लोक , प्रशासन आणि सार्वभौतत्व या सर्वच घटकांमुळे 'राज्या'ची घडण होते. 'राष्ट्र' ही संकल्पना मात्र अधिक भावनिक आहे. समान सांस्कृतिक परंपरा, इतिहास, राजकीय आकांक्षा, समान भाषा आणि एकसंध भौगोलिक प्रदेश यांच्यामुळे जोडले जातात. ज्या राज्यातील लोकांमध्ये अशी एकात्मतेची प्रबळ भावना निर्माण होते, त्या राज्याला 'राष्ट्र-राज्य' म्हणून संबोधले जाते. सामंतशाहीचा र्‍हास, व्यापारवृद्धी, नव्या शहरांची वाढ आणि प्रादेशिक भाषांना आलेला जोम या घटकांमुहे मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादी भावना बळावली. त्यामुळे फ्रान्स, स्पेन, ऑस्टि्रया, इंग्लंड, रशिया यांसारखी राष्ट्र-राज्ये उदयाला आली.

अनियंत्रित राजेशाही :- युरोपातील राज्यांच्या आर्थिक विकासाला सामंतशाहीने खीळ घातली होती. त्यातून मुक्त होण्यासाठी राजे महसुलाच्या नवीन साधनांच्या शोधात होते. सामंतशाहीत व्यापार व वाहतुकीला फारच अपुरे संरक्षण दिले जात असे, तर राजेशाहीत हे संरक्षण अधिक चांगल्या प्रकारे दिले जाऊ लागले. साहजिकच व्यापार्‍यांनी राजाला पाठिंबा दिला. परस्परांच्या गरजा एकमेकींना पूरक असल्यामुळे राजे व व्यापारी एकत्र आले. अशा रीतीने युरोपात सामंतशाहीच्या प्रभावाला ग्रहण लागले आणि समर्थ केंद्रसत्ता उदयाला आल्या.

याच काळात युरोपमधील लोकसंख्या वाढली. तिच्या उपजीविकेसाठी केवळ शेतीपासून मिळणारे उत्पन्न पुरेरे नव्हेते. खेडयांमधील अतिरिक्त लोकसंख्या उपजीविकेच्या शोधात शहरांकडे वळू लागली. त्यामुळे राजाचे लष्करी मनुष्यबळ वाटू लागले, तर व्यापार्‍यांना अधिक मजूर पुरवठा होऊ लागला. या सर्व घटकांमुळे सामंतशाही अर्थ व्यवस्था आणि तिच्यावर आधारित समाज व्यवस्था ढासळू लागली.

मध्ययुगीन युरोपात उदयाला आलेली नवी शासन व्यवस्था 'निरंकुश राजेशाही' म्हणून ओळखली जाते. या पध्दतीत सर्व सज्ञ्ल्त्;ाा राजाच्या हाती केंद्रीत झालेली असते. त्याची सत्ता निरंकुश असते. यामुळेच फ्रान्सचा राजा १४वा लुई याने 'मी म्हणजेच राज्य' असे घोषित केले. डान्टेसारखा कवी, जॉन विक्लिफ व मार्टिन ल्यूथर हे धर्मसुधारक, थॉमस हॉब्ज व निकोलो मॅकियाव्हेली हे विचारवंत यांसारख्या प्रभावी व्यक्तींनी निरंकुश राजेशाहीला पाठिंबा दिला. राजा हा प्रत्यक्ष ईश्र्वराचाच दूत आहे असे सांगणारा 'ईश्र्वरदत्त राजसत्तेचा सिध्दांत' युरोपात प्रस्थापित झाला.

युरोपातील बहुतेक राजे कोणालाही उबाबदार नव्हते. जरी या राजांनी अनियंत्रित राज्य केले तरी त्यांनी आपली कर्तबगारी दाखविली. त्यांनी भव्यता आणि दिमाखदारपणा यांचे प्रदर्शन केले आणि विलासी जीवन आचरले. आपल्या लष्करी शक्तीच्या आणि प्रचंड वैभवाच्या जोरावर त्यांनी सर्वसामान्य लोकांना प्रभावित केले. बहुतेक राजे ज्ञान, साहित्य, कला यांचे आश्रयदाते होते. त्यांनी राज्याच्या वैभवासाठी व विकासासाठी निरनिराळया सुधारणा केल्या.

फ्रान्सचा राजा १४ वा लुई, स्पेनचा राजा दुसरा फिलिप, ऑस्ट्रियाची मारिया थेरेसा, प्रशियाचा फ्रेडि्रक दि ग्रेट, रशियाचा पीटर दि ग्रेट, इंग्लंडची राणी पहिली एलिझाबेथ अशी निरंकुश राजसत्तेच्या काळातील युरोपीय राज्यकत्र्यांची उदाहरणे प्रसिध्द आहेत. या राज्यकत्र्यांनी देशाच्या विकासाला चालना दिली आणि अप्रत्यक्षपणे आधुनिक युगाची पाश्र्र्वभूमी घडविली. परंतु राज्यव्यवस्थ्ेच्या काही मूलभूत उणिवांमुळे तिची जागा एका अधिक चांगल्या व्यवस्थेने घेतली. ही नवी व्यवस्था होती आधुनिक युगातील लोकशाही व्यवस्था.

दुसरे महायुद्ध

दुसरे महायुध्द हे १९३९ ते १९४५ दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युध्द मुख्यत: युरोप व आशियामध्ये दोस्त राष्ट्रे (अल्ल्एिद फेरच्एस्) व अक्ष राष्ट्रे (अस् िप्ेद्धएरस्) यांच्या मध्ये झाले. दोस्त राष्ट्रांमध्येफ्रांस,रशिया,इंग्लंड, अमेरिका व इतर राष्ट्रांचा समावेश होता, तर अक्ष राष्ट्रांमध्ये जर्मनी,इटली व जपान हे देश होते. जवळ जवळ ७० देशांचे सैन्य यात सहभागी झाले होते. या युध्दामध्ये सहा कोटीच्यावर जिवीत हानी झाली. मनुष्याच्या इतिहासातील ही सर्वात मोठी जिवीत हानी आहे. या युध्दामध्ये दोस्त राष्ट्रांचा विजय झाला. युरोप सप्टेंबर १,१९३९ रोजी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. जर्मनीचा नेता एडॉल्फ हिटलर व त्याच्या नाझी पक्षाने सोवियेत संघाशी त्यापूर्वी मैत्री-करार केला होता. त्यानुसार सोवियेत संघाने सप्टेंबर १७च्या दिवशी पूर्वेकडून पोलंडवर चाल केली. याला प्रत्युत्तर म्हणून युनायटेड किंग्डम व फ्रांसने सप्टेंबर ३ला जर्मनीविरुद्ध युद्ध जाहीर केले. सुरुवातीला हे युद्ध मुख्यत्त्वे सागरी युद्ध होते. काही महिन्यातच जर्मनीने पोलंड काबीज केले. त्यानंतर १९४०मध्ये जर्मन सैन्याने नॉर्वे,नेदरलॅंड्स,बेल्जियम व फ्रांस पादाक्रांत केले व १९४१मध्ये युगोस्लाव्हिया आणी ग्रीसचा पाडाव केला. इटलीने उत्तर आफ़्रिकेतील ब्रिटीश वसाहतींवर हल्ला केला. काही महिन्यांनी त्यांना जर्मन सैन्याची कुमक मिळाली.१९४१च्या मध्यापर्यंत जर्मनीने बहुतांश पश्चिम युरोप आपल्या टाचेखाली आणले होते परंतु युनायटेड किंग्डम जिंकणे त्यांना जमले नाही. याचे मुख्य कारण होते रॉयल एर र्फो व रॉयल नेव्हीने दिलेली कडवी झुंज. आता हिटलर सोवियेत संघावर उलटला व जून २२,१९४१ रोजी त्याने अचानक सोवियेत संघावर चाल केली.ऑपरेशन बार्बारोसा या सांकेतिक नावाने योजलेल्या या मोहिमेत जर्मनीला सुरुवातीला भरभरुन यश मिळाले. १९४१ शेवटीशेवटी जर्मन सैन्याने मॉस्कोपर्यंत धडक मारली परंतु येथे ही मोहीम अडकून पडली. सोवियेत सैन्याने कडवा प्रतिकार करीत जर्मनीचा रेटा मोडून काढला. पुढे सोवियेत सैन्याने स्टालिनग्राडला वेढा घालुन बसलेल्या जर्मनीच्या सहाव्या सैन्यालाच प्रतिवेढा घालुन पूर्ण सैन्याला युद्धबंदी बनवले.कुर्सकच्या युद्धात सोवियेत सैन्याने जर्मनीचा प्रतिकार मोडून काढला वलेनिनग्राडचा वेढा उठवला. जर्मन सैन्याने अखेर माघार घेतली.लाल सैन्याने त्यांचा बर्लिनपर्यंत पाठलाग केला. बर्लिनमध्ये जर्मन सैन्याने व सामान्य नागरिकांनी घराघरातून सोवियेत सैन्याला झुंज दिली परंतु प्रचंड प्रमाणात मिळत असलेल्या कुमकीच्या जोरावर सोवियेत सैन्याने बर्लिन जिंकले. याच सुमारास (एप्रिल ३०,१९४५ रोजी) हिटलरने आपल्या भूमिगत बंकरमध्ये आत्महत्त्या केली. इकडे पाश्चिमात्य दोस्त राष्ट्रांनी १९४३मध्ये इटलीवर चाल केली. १९४४मध्ये त्यांनी नॉर्मंडीच्या किनार्‍यावर हल्ला केला व फ्रांसला जर्मन आधिपत्यातून मुक्त केले. जर्मनीने चढवलेल्या प्रतिहल्ल्याला र्‍हाईन नदीच्या किनार्‍यावर बॅटल ऑफ द बल्ज नावाने प्रसिद्ध लढाईत दोस्त राष्ट्रांनी जबरदस्त उत्तर दिले व येथून आगेकूच करीत त्यांनी जर्मनी गाठले आणी एल्ब नदीच्या किनार्‍यावर पूर्वेकडून चालून आलेल्या सोवियेत सैन्याशी संधान बांधले. यावेळी जर्मनीच्या उरल्यासुरल्या सैन्याने शरणागती पत्करली व हार मान्य केली. युरोपमध्ये चाललेल्या या धुमश्चक्रीदरम्यान जर्मन राष्ट्राकडून चालविण्यात आलेल्या वंशहत्येत ६०,००,००० ज्यू व्यक्तिंचा बळी गेला. याला ज्यूंचे शरकाण अथवा हॉलोकॉस्ट म्हणण्यात येते. आशिया व प्रशांत महासागर युरोपमध्ये युद्धाला तोंड फुटण्यापूर्वी जपानने जुलै ७, १९३७ रोजी चीनवर आक्रमण केले. जपानचा रोख चीनमधून पूर्व आणि आग्नेय आशियावर स्वारी करीत एकएक देश जिंकायचा होता. यात मिळालेल्या यशानंतर जपानने डिसेंबर ७,१९४१च्या दिवशी अनेक राष्ट्रांवर एकाच वेळी हल्ला केला. याच दिवशी पर्ल हार्बर येथे अमेरिकेच्या नौदलावरही हल्ला चढवला गेला. याला प्रत्युत्तर म्हणुन अमेरिकेने युद्धात उतरण्याचे निश्चित केले. पुढील सहा महिने जपानला घवघवीत यश मिळाले पण कॉरल समुद्राच्या लढाईत अमेरिकन नौसैन्याने त्यांचा प्रतिकार केला व मिडवेच्या लढाईत जपानने हार पत्करली. यात जपानच्या चार विमानवाहू नौका बुडवुन अमेरिकेने जपानी नौसैन्याचा कणाच मोडला. येथून दोस्त राष्ट्रांनी जपानवर प्रतिहल्ला चढवला व मिल्ने बे व ग्वादालकॅनालच्या लढाईत त्यांनी विजय मिळवला. नैऋत्य प्रशांत महासागरातमध्ये विजयी ठरलेल्या दोस्त राष्ट्रांनी मग प्रशांत महासागराच्या मध्य भागावर रोख धरून मोहीम काढली. यात जपानी सैन्याने त्यांचा कडवा प्रतिकार केला. या मोहीमेदरम्यान फिलिपाईन समुद्राची लढाई,लेयटे गल्फची लढाई,इवो जिमा व ओकिनावाची लढाई, इ. अनेक भयानक सागरी युद्धे खेळली गेली. या दरम्यान अमेरिकन पाणबुड्यांनी जपानकडे जाणारी रसद तोडण्यात यश मिळवले. याने जपानची आर्थिकदृष्ट्या कुचंबणा होउ लागली. १९४५मध्ये दोस्त राष्ट्रांच्या वायुदलाने जपानवर अनेक वादळी हल्ले चढवले. मुख्यत्त्वे नागरी वस्त्या व कारखान्यांवर झालेल्या या हल्ल्यांनी जपानची युद्धप्रवण राहण्याची शक्ति कमी झाली. अखेर ऑगस्ट ६, इ.स. १९४५ रोजी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर परमाणु बॉम्ब टाकला. ऑगस्ट ९ला अमेरिकेने नागासाकी शहरावर असाच हल्ला केला व जोपर्यंत जपान शरण येत नाही तोपर्यंत एक एक करीत जपानी शहरे बेचिराख करण्याची धमकी दिली. जपानने ऑगस्ट १५, १९४५ रोजी बिनशर्त शरणागती पत्करली व दुसर्‍या महायुद्धाचा अधिकृतरीत्या अंत झाला. पर्यवसान या अतिभयानक युद्धात अंदाजे ६,२०,००,००० (सहा कोटी वीस लाख) व्यक्ती मरण पावल्या. हे म्हणजे जगाच्या त्यावळेसच्या लोकसंख्येचे २.५% होय. अर्थात, हा केवळ अंदाज आहे व प्रत्येक राष्ट्राचे अंदाज वेगवेगळे आहेत. युरोप आणि आशियामधील देशच्या देश यात बेचिराख झाले. त्यातून सावरायला त्यांना पुढील अनेक दशके घालवावी लागली. दुसर्‍या महायुद्धाचे राजकीय, सामाजिक, आर्थिक तसेच तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जगावर झालेले प्रभाव आजदेखील दिसून येतात. कारणे जर्मनीचे पोलंडवरील आक्रमण व जपानचे चीन, अमेरिका व ब्रिटीश आणि डच वसाहतींवरचे आक्रमण ही दुसर्‍या महायुद्धाची कारणे समजली जातात. जगाच्या दोन्ही बाजूच्या या घटनांचे कारण होते जर्मनी व जपानमधील हुकुमशाही सत्ताधीश व त्यांची जगज्जेते होण्याची महत्त्वाकांक्षा. जरी या दोन्ही सत्तांनी आपले पाय पसरवण्यास आधीच सुरुवात केली असली तरी दुसर्‍या महायुद्धाची अधिकृत सुरुवात झाली ती या झोंडशाहीला झालेल्या सशस्त्र विरोधाने. जर्मनीत नाझी पक्ष जरी लोकशाही मार्गाने सत्तेवर आला असला तरी एकदा हातात सत्ता आल्यावर पक्षाधिकार्‍यांनी जर्मनीतील लोकशाही व्यवस्थेची लक्तरे काढली. असे असून जर्मन जनतेने त्यांना पाठिंबा दिला कारण पहिल्या महायुद्धात पराभूत झाल्यावर त्यांना जर्मन स्वाभिमानाला जागे करणारे सरकार प्रथमत:च मिळालेले होते. पहिल्या महायुद्धात शरणागती पत्करताना व्हर्सायच्या तहातील २३१वे कलम जर्मन जनतेला असह्य झाले होते. या शिवाय साम्यवाद-विरोध आणि आर्थिक सुबत्ता व प्रगतीच्या वचनांना भुलुन जर्मनीने नाझी पक्षाला व पर्यायाने एडॉल्फ हिटलरला अमर्याद सत्ता बहाल केली. हिटलरने जर्मनीला आपल्या हक्काच्या समजल्या जाणार्‍या सगळया देशांना जर्मन सत्तेखाली आणण्याचे वचन दिले व त्यादृष्टीने पावलेही उचलली. नाझी पक्षाने (व स्वत: हिटलरनेही) हिटलरला जर्मनीचा तारणहार सल्याचे भासवले, व येथून एका भस्मासुराचा जन्म झाला. इकडे जपानमध्ये क्रिसॅंथेमम (जास्वंदी) वंशाच्या राजांचे राज्य असले तरी खरी सत्ता होती ती सैन्यातील अत्त्युच्च अधिकार्‍यांच्या टोळक्याकडे. जपानला जगातील महासत्ता करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. जपानने या नेतृत्त्वाखाली मांचुरियावर १९३१मध्ये व चीनवर १९३७मध्ये आक्रमण केले होते. यामागचे कारण होते ते चीन व मांचुरियातील नैसर्गिक संपत्ती बळकावून त्याद्वारे आपला प्रभाव अधिक मजबूत करणे. युनायटेड किंग्डम व अमेरिकेने या युद्धात जरी प्रत्यक्ष भाग घेतला नसला तरी त्यांनी चीनला आर्थिक व सैनिकी मदत केली. याशिवाय त्यांनी जपानविरुद्ध आर्थिक नाकेबंदी करीत जपानला मिळणारे खनिज तेल व इतर रसद कापली. यामुळे जपानला चीन व मांचुरियातील युद्ध जास्त काळ चालू ठेवणे अशक्य झाले व त्यांनी तेथून काढता पाय घेण्याची तयारी सुरू केली. आता जपानकडे उपाय होते म्हणजे चीनचा जिंकलेला प्रदेश परत करणे, खनिज तेल व इतर कच्च्या मालाची इतर पुरवठे शोधणे किंवा हे मिळवण्यासाठी अजून काही देश/प्रांत जिंकणे. आग्नेय आशियातील फिलिपाईन्स आणि डच, फ्रेंच व ब्रिटीश वसाहतींमधून या खनिजांचा मुबलक पुरवठा होता व हा भाग चीनमधून हल्ला करण्याच्या टप्प्यातही होता. जपानचा समज होता की आशियातील युरोपीय सत्ता युरोपमध्ये सुरू झालेल्या युद्धात गुंतल्या होत्या व आशियात लक्ष देण्याची त्यांना फुरसत नव्हती. सोवियेत संघ जर्मनीशी संधान बांधून असले तरी त्यांच्यात कुरबुर सुरूच होती आणि अमेरिका युद्ध करण्याआधी संधी्रकरार करण्याचा प्रयत्न करेल. ही परिस्थिती जपानने आग्नेय आशिया गिळंकृत करण्यास साजेशीच होती. हा अंदाज बांधून जपानने डच व ब्रिटीश वसाहतींवर आक्रमण केले व जगाच्या पूर्व भागातील युद्धाला तोंड फुटले. सुरुवातीला तटस्थ असलेल्या अमेरिकेने दोस्त राष्ट्रांना जर्मनीविरुद्ध आर्थिक मदत करणे चालूच ठेवले होते. त्याला खीळ घालण्यासाठी जपानने डिसेंबर ७, १९४१रोजी अमेरिकेच्या पर्ल हार्बर येथील नौसेना तळावर जबरदस्त हल्ला केला व तेथील आरमार उद्धवस्त केले. अमेरिकेला आता युद्धात उतरणे भागच होते. अशा प्रकारे अमेरिकेचा या युद्धात प्रवेश झाला. युद्धाची सुरुवात - इ.स. १९३९ १९३९च्या सुमारास जर्मनीने जाहीर केले होते की व्हर्सायच्या तहात गमावलेला सगळा प्रदेश जर्मनीने जिंकलाच पाहिजे. शिवाय, ज्या ज्या प्रदेशात जर्मनवंशीय व्यक्तींचे बहुमत असेल, ते प्रदेशही जर्मनीचेच भाग झाले पाहिजेत. जर्मनीच्या अधिकृत परराष्ट्र धोरणात म्हणले होते की पोलंड वचेकोस्लोव्हेकियातील काही प्रदेशात जर्मन बाहुल्य होते व तेथील जर्मनवंशीय व्यक्तींच्या हक्कांची पायमल्ली होत होती. त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी असे प्रदेश जर्मनीत असले पाहिजेत. युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान नेव्हिल चेम्बरलेन बरोबरच्या चर्चासत्रात हिटलरने अनेक पुरावे दाखवले ज्यानुसार जर्मनीच्या शेजारी राष्ट्रातील जर्मनवंशीय लोकांवर अत्याचार होत होते. या सबबीवर हिटलरने असे प्रदेश जर्मनीत समाविष्ट करण्याचा आग्रह धरला. हिटलरच्या या युक्तिवादाला जर्मन जनतेचा पूर्ण पाठिंबा होता. जर्मनीला पहिल्या महायुद्धात नामुष्की पत्करावी लागली होती. व्हर्सायच्या तहातील काही कलमे जर्मनीच्या आर्थिक व सैनिकी विकासाला जाचक होती. याच सुमारास जगभर आर्थिक मंदी सुरू होती, त्याचा प्रभाव जर्मनीवरही पडला होता. व्हर्सायच्या तहानुसार जर्मनीला सैन्य बाळगण्यावर कडक निर्बंध होते व प्रत्येक सैनिकी हालचालीबद्दल लीग ऑफ नेशन्स द्वारे परदेशी राजवटींना जबाब द्यावा लागत होता. तत: जर्मनीत गरीबी, बेकारी व असंतोषाचे लोण सर्वदूर पसरलेले होते. याचे भांडवल करून हिटलर व नाझी पक्षाने सत्ता मिळवली व हळूहळू लोकशाही व्यवस्थेत बदल करून अधिकाधिक हुकुमशाहीगत व्यवस्था जर्मनीत आली. नाझींनी जर्मनीला पटवून दिले की अनिर्बंध सत्तेशिवाय जर्मनीचा उद्धार कोणीही करू शकणार नाही. हळूहळू हिटलरने र्‍हाइनलॅंड वरुह प्रदेशात सैन्य उभारणीलाही सुरुवात केली. याशिवाय अश्या अनेक कृती केल्या ज्या व्हर्सायच्या तहाविरुद्ध होत्या परंतु जर्मन राष्ट्रहितकारक होत्या. याचा परिणाम जर्मन जनता हिटलरच्या मागे एकमुखाने उभी राहण्याचा झाला. हिटलर व नाझी पक्षाने याचे पूरेपूर फायदा घेतला. जर्मनवंशीयांवर अन्याय होत असल्याचे भासवून त्यांनी याकाळात अनेक इतरवंशीय व्यक्तींचे (रोमा जिप्सी,ज्यू, इ.) सर्रास शरकाण सुरू केले. युरोपीय देशांची अति-सहिष्णुता व युद्धापूर्वीचे मैत्री-करार जर्मनीत हे सुरू असताना ब्रिटीश व फ्रेंच सरकारने त्याविरुद्ध पावले उचलायच्या ऐवजी जर्मनीच्या तुष्टीकरणाचे धोरण अवलंबिले. त्यांना जर्मनीशी उघड संघर्ष टाळायचा होता कारण पहिले महायुद्ध संपून जेमतेम २० वर्षे होत होती. संपूर्ण युरोप त्यातून सावरत होता व अजून एक युद्ध झाल्यास युनायटेड किंग्डम व फ्रांसच नव्हे तर युरोपमधील प्रत्येक देशाला त्याची मोठी किंमत मोजावी लागली असती. त्यामुळे दोन्ही देशांनी जर्मनीला ढील देणेच पसंत केले. याचे पर्यवसान १९३८च्या म्युनिक करारात झाले. याआधी जर्मनीने चेकोस्लोव्हेकियातील काही प्रदेश बळकावले होते व अजून पुढे सरकण्याच्या तयारीत असताना फ्रांस व ब्रिटनने जर्मनीची ही आगळीक मान्य केली व चेकोस्लोव्हेकियाचे प्रदेश जर्मनीला देउन टाकले. चेम्बरलेनने जाहीर केले की म्युनिक करार हा आपल्या काळातील शांततेचेच प्रतीक आहे. मऊ लागल्यावर कोपराने खणल्यासारखे जर्मनीने मार्च १९३९मध्ये उरलेले चेकोस्लोव्हेकियासुद्धा बळकावले. जर्मनीच्या मनसूब्यांबद्दल भाषांतरांवरूनरमात राहिलेल्या दोस्त राष्ट्रांकडे नुसते बघत बसण्यापेक्षा काही गत्यंतर नव्हते. या व अशा छोट्या-मोठ्या चालींनंतर वर्षभरात युद्धाला तोंड फुटले. म्युनिक करार निष्फळ ठरल्यावर ब्रिटन फ्रांसना कळले की हिटलरच्या आश्वासनांवर विश्वास ठेवुन चालणार नव्हते व जर्मन महत्त्वाकांक्षा नुसते आसपासचे प्रदेश गिळंकृत करून थांबणार नव्हती. मे १९,१९३९ला पोलंड व फ्रांसने परस्पर-मैत्री करार केला व एकावर आक्रमण झाल्यास दुसर्‍याने मदतील धावून येण्याचे मान्य केले. ब्रिटन व पोलंडमध्ये असाच करार मार्चमध्ये झालेला होता. इकडे जर्मनी व सोवियेत संघाने ऑगस्ट २३, १९३९ला मोलोटोव्ह-रिबेनट्रप करारावर सह्या केल्या. या करारात जर्मनी सोवियेत संघाने युरोप जिंकून घेणे गृहित धरले होते व त्यानंतर युरोप आपापसात कसा वाटून घ्यायचा याची नोंद होती. तोपर्यंत दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांच्या सैनिकी कारवाईत दखल न देण्याचे कबूल केले व सोवियेत संघाकडून जर्मनीला खनिज तेल व इतर रसद पुरवण्याची तरतूद घातली. या कलमामुळे जर्मनीची उत्तर समुद्रातून येणार्‍या मालवाहतूकीवरील भिस्त कमी झाली. पहिल्या महायुद्धात हा वाहतूकमार्ग रोखून धरुन ब्रिटनने जर्मनीच्या नाकीतोंडी पाणी आणले होते. ही तरतूद झाल्यावर हिटलरची पोलंड व वेळप्रसंगी ब्रिटन व फ्रांसशीही युद्ध करण्याची तयारी झाली. पुढचे पाउल होते ती कुरापत काढणे. जर्मनीने जाहीर केले की डान्झिगच्या स्वतंत्र शहरात जर्मन व्यक्तींवर अन्याय होत आहे व याचा उपाय करण्यासाठी जर्मनी डान्झिग व पोलंडमधील अन्य शहरे जिंकून घेईल. हे पाहून पोलंड ने ऑगस्ट २५रोजी युनायटेड किंग्डमशी नव्याने मैत्री करार केला, पण त्याचा जर्मन बेतांवर काही प्रभाव पडला नाही. जर्मनी व सोवियेत संघाचे पोलंडवर आक्रमण सप्टेंबर १, १९३९रोजी जर्मनीने खोट्या पोलिश हल्ल्याची सबब सांगून पोलंडवर आक्रमण केले. युद्धोत्तर अहवालात कळून आले की पोलंडने केलेला जर्मन ठाण्यावरील तथाकथित हल्ला झालाच नव्हता.सप्टेंबर ३ला भारतासह युनायटेड किंग्डम व फ्रांसने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. काही दिवसातच कॅनडा, ऑस्ट्रेलिया व न्यू झीलॅंडनेही त्यांचा साथ देण्याचे जाहीर केले. फ्रांसने जरी युद्ध जाहीर केले असले तरी त्यांची हालचाल संथ होती.सार प्रांतात नावापुरती चढाई केल्यावर काही दिवसात तीसुद्धा सोडून दिली. युनायटेड किंग्डमला नौसेनेच्या कवायती करण्याशिवाय काही करणे शक्य नव्हते. इकडे जर्मनीने पोलिश सैन्याची वाताहत करीतसप्टेंबर ८ रोजी पोलंडची राजधानी वॉर्सोपर्यंत धडक मारली. सप्टेंबर १७ला सोवियेत संघाने मोलोटॉव्ह-रिबेनट्रप करारात ठरवल्याप्रमाणे पोलंडवर पूर्वेकडून चाल केली. पोलिश सैन्याला आता दुसरी आघाडी उघडणे भाग पडले व त्यामुळे आधीच खिळखिळी झालेली बचावाची फळी कोलमडली. पराभव अटळ दिसताना पोलंडच्या राष्ट्राध्यक्ष व सरसेनापतीने दुसर्‍याच दिवशी रोमेनियात पळ काढला. वॉर्सोतील सैन्याने महिनाभर तग धरली पण ऑक्टोबर १ रोजी जर्मन सैन्य शहरात घुसले. ४-५ दिवस घराघरातून युद्ध करुन ऑक्टोबर ६ला पोलिश सैन्याने हत्यारे खाली ठेवली. काही तुकड्या पळून शेजारील राष्ट्रांमध्ये गेल्या व तेथून त्यांनी भूमिगत सशस्त्र चळवळ उभारली. या चळवळीने युद्धाच्या अखेरच्या दिवसांत दोस्त राष्ट्रांची मोठी मदत केली. जरी राजधानी व जवळजवळ संपूर्ण देशाचा पाडाव झाला तरी पोलंडने अधिकृतरीत्या जर्मनीकडे शरणागती पत्करली नाही. खोटे युद्ध पोलंडच्या पाडावानंतर १९३९च्या हिवाळयात जर्मनीने आपली वाटचाल तात्पुरती थांबवली. परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी आपली बचावफळी पक्की केली व पुढील हल्ल्यांची योजना आखणे चालू ठेवले. इकडे ब्रिटन व फ्रांसने आपले बचावात्मक धोरण चालूच ठेवले.एप्रिल १९४०पर्यंत कोणीच काही मोठी हालचाल केली नाही. वृत्तपत्रांनी या कालावधीला खोटे युद्ध अथवा सिट्झक्रीग असे उपहासात्मक नाव दिले. अटलांटिकची लढाई पूर्व युरोपमध्ये लढाई सुरू होताच उत्तर अटलांटिक समद्रात जर्मन यु-बोटींनी दोस्त राष्ट्रांच्या व्यापारी जहाजांविरुद्ध कर्ारवाया सुरू केल्या. छुप्या पद्धतीने हल्ला करणार्‍या या पाणबुड्यांची संख्या जास्त नसली तरी ही कसर त्यांनी त्यांची कुशलता, हिंमत व नशीबाने भरुन काढली. ब्रिटीश विमानवाहू नौका एच.एम.एस. करेजस अशाच एका यु-बोटीला बळी पडली तर अजून एका यु-बोटीने एच.एम.एस. रॉयल ओक या युद्धनौकेला बंदरातून बाहेर पडण्याची संधी न देताच जलसमाधी दिली. युद्धाच्या पहिल्या चार महिन्यात यु-बोटींनी ११० जहाजे बुडवली व व्यापारी जहाजवटीवर भीतीचे सावट पसरवले. दक्षिण अटलांटिक समुद्रात जर्मन पॉकेट बॅटलशिप डमिरल ग्राफ स्पीने ९ ब्रिटीश व्यापारी नौका बुडवल्या. अखेर एच.एम.एस. अजॅक्स, एच.एम.एस. एक्झेटर व एच.एम.एन.झेड.एस. अकिलीस ने तिला माँटेव्हिडियोजवळ गाठले.रिव्हर प्लेटच्या लढाईत ग्राफ स्पीला पराभव अटळ दिसता तिच्या कप्तान हान्स लॅंग्सर्डॉफने समुद्राकडे प्रयाण केले व पकडले जाण्यापेक्षा स्वत:च ग्राफ स्पीला जलसमाधी दिली. दुसरे चीन-जपान युद्ध पूर्वेतील युद्ध युरोपच्या आधीच दोन वर्षे सुरू झाले होते. जपानने १९३१मध्ये मांचुरिया जिंकून तेथे तळ ठोकलेला होता. जुलै ७, १९३७ रोजी जपानने मांचुरियाची हद्द ओलांडून बिजींगवर (तेव्हाचे बिपींग) हल्ला चढवला. विद्युतवेगाने आगेकूच करीत जपानी सैन्य शांघायपर्यंत पोचले परंतु तेथे त्यांची प्रगती थांबली.डिसेंबर १९३७मध्ये शांघाय पडले व लगेचच राजधानीचे शहर नानजिंग (तेव्हाचे नानकिंग) ही जपानने जिंकले. चीनी सरकारने नानजिंगहून पळ काढून चाँगकिंग येथे कामचलाऊ राजधानी उभारली. नानजिंग जिंकल्यावर जपानी सैन्याने तेथील युद्धकैदी व नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले व एका महिन्यात सुमारे ३,००,००० व्यक्तींची कत्तल केली. दुसरे रशिया-जपान युद्ध जपान व मंगोलियाच्या सरहद्दीवर खाल्का नदी आहे. मांचुरियातील जपानी राजवटीनुसार ही मांचुरिया-मंगोलियाच्यामधील हद्द होती. मंगोलियाच्या मते हद्द नदीपलीकडे ३० किमी पूर्वेस होती. मे ८,१९३९ रोजी ७०० मोंगोल घोडेस्वार नदी पार करुन पूर्वेस आले. ते पाहताच मांचुरियन सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला. काही दिवसातच सोवियेत संघाने मंगोलिया व जपानने मांचुरियाच्या सैन्याच्या मदतीला आपले सैन्य पाठवले व तुंबळ युद्धास सुरुवात झाली. सप्टेंबरपर्यंत चालू असलेल्या या युद्धात १८,००० जपानी तर ९,००० सोवियेत-मंगोल सैनिक मृत्यू पावले. येथे सुरू असलेले युद्ध थांबले नाही व जर्मनीशी सुद्धा लढायची पाळी आली तर सोवियेत संघाला दोन्ही आघाड्या संभाळणे कठीण गेले होते. सोवियेत संघाने मोलोटॉव्ह-रिबेनट्रप करारावर सही करण्यामागे हेही एक कारण होते. सोवियेत संघाचे बाल्टिक देशांवर आक्रमण जर्मनी व सोवियेत संघात युद्धाच्या आधी झालेल्या मोलोटॉव्ह-रिबेनट्रप करारानुसार फिनलंडला सोवियेत संघाचे मांडलिक राष्ट्र ठरवण्यात आले होते. त्यानुसार सोवियेत संघाने नोव्हेंबर ३०,१९३९ रोजी फिनलंडवर हल्ला केला. येथुन सुरू झालेल्या युद्धाला हिवाळी युद्ध म्हणतात. सोवियेत संघाने फिनिश सैन्याच्या चौपट सैनिक पाठवले तरीही त्यांची पुरेशी प्रगती झाली नाही. फिनिश बचावाची फळी भक्कम होती व त्यांनी पहिला हल्ला रोखून धरला. हळूहळू लाल सैन्याने आपले हल्ले तिखट केले व फळी फोडण्यात यश मिळवले. फिनलंडने तहाची बोलणी सुरू केली व लेनिनग्राडला लागून असलेले व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे प्रदेश सोवियेत संघाला दिले. या अकारण सुरू केलेल्या युद्धाविरुद्ध जगातील इतर देशांनी विरोध दर्शविला व डिसेंबर १४ला सोवियेत संघाची लीग ऑफ नेशन्समधून हकालपट्टी झाली. यामुळे सोवियेत संघाला जणू अधिक आगळीक करण्याची मुभाच मिळाली. जून १९४०मध्ये त्यांनी लाटव्हिया, लिथुएनिया आणी एस्टोनियाचा पाडाव केला व तेथील सत्ताधारी व्यक्तींना सैबेरियातील गुलागमध्ये पाठवून दिले. याशिवाय सोवियेत संघाने रोमेनियाकडून बेसारेबिया व उत्तर बुकोव्हिना हे प्रांतही बळकावले. जर्मनीचे डेन्मार्क व नॉर्वेवर आक्रमण सोवियेत संघ व फिनलंडमधील हिवाळी युद्ध संपताना जर्मनीने एप्रिल ९, १९४०ला एकाच वेळी डेन्र्मा व नॉर्वेवर अ‍ॅपरेशन वेसेरुबंग या सांकेतिक नावाखाली मोहीम काढली. डेन्मर्ाकने लगेचच नांगी टाकली पण नॉर्वेने प्रतिकार केला. युनायटेड किंग्डमने नॉर्वेवर चढाई करण्याचा बेत आखलेलाच होता. त्यांनी आपले सैनिक उत्तर नॉर्वेत उतरवले पण जूनपर्यंत जर्मन सैन्य वरचढ ठरले व दोस्त राष्ट्रांनी नॉर्वेतून काढता पाय घेतला. नॉर्वेच्या सैन्याने शरणागती पत्करली व जवळजवळ संपूर्ण नॉर्वे जर्मनीच्या ताब्यात आले. नॉर्वेचा राजा आपल्या कुटुंबियांसह लंडनला पळून गेला. नॉर्वेचा सागरी किनारा हातात आल्यावर जर्मनीने तेथे हवाई व नौसेनेचे तळ उभारले व र्आकटिक समुद्रातून होणार्‍या पुढील मोहीमेची तयारी सुरू केली. जर्मनीचे फ्रांस व 'खालच्या देशांवर' आक्रमण लक्झेम्र्ब, बेल्जियम व नेदरलॅंड्स हे समुद्रसपाटीपासून समतल व काही प्रदेशात समुद्राच्या पातळीच्याही खाली आहेत म्हणून त्यांना लो कन्ट्रीज अथवा खालचे देश असे म्हणतात. मे १०,१९४० रोजी जर्मनीने या तीनही देश व शिवाय फ्रांसवर हल्ला केला. या घटनेने खोटे युद्ध संपले व खरे युद्ध परत सुरू झाले. जर्मनीला रोखण्यासाठी ब्रिटीश एक्स्पिडिशनरी र्फो व फ्रेंच सैन्य उत्तर बेल्जियममध्ये घुसले. दक्षिणेत फ्रांसने मॅजिनो लाईनवर आपली बचावफळी तयार केलेली होती. तेथे जर्मन सैन्याला अडवून ठेवून उत्तरेत गनिमी काव्याने जर्मनीशी लढायचे असा त्यांचा बेत होता पण जर्मनीने ब्लिट्झक्रीग अथवा विद्युतवेगी युद्धाचा अत्युत्तम नमूना दाखवत फ्रेंच व ब्रिटीश सैन्याचा धुव्वा उडवला. इकडे लुफ्तवाफेने नेदरलॅंड्सच्या रॉटरडॅम शहरावर बॉम्बफेक करून शहराचा विनाश केला. हल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात वेह्रमाख्टची (जर्मन सेना) पॅन्झरग्रुप फोन क्लाइस्ट ही तुकडी सुसाट आर्देन्नेस पार करुन गेली. दोस्त राष्ट्रांचा अंदाज होता की दाट जंगल असलेला हा प्रदेश यांत्रिकी व रणगाड्यांना पार करणे अशक्य होते. हा अंदाज चुकीचा ठरवत जर्मन सैन्याने सेदान येथे येउन धडकले. सेदानचे रक्षण करणारे सैन्यदल हे फ्रेंच सैन्याचे नेहमीचे सैनिक नव्हते. येथे हल्ला होण्याची शक्यता कमी असल्याकारणाने येथे कुमक जास्त नव्हती. वेह्रमाख्टने सहजगत्या बचावाची फळी फोडली आणी पश्चिमेकडे आगेकूच करीत थेट इंग्लिश चॅनेल पर्यंत जाउन पोचले. जर्मन सैन्याच्या दुसरे सैन्याने बेल्जियम, लक्झेम्बर्ग व नेदरलॅंड्सचा सहजगत्या पाडाव केला. आता दोस्तराष्ट्रांचे सैन्य दुभागले गेले व उत्तर फ्रांस व खालच्या देशातले सैनिक जर्मन सैन्याच्या कचाट्यात सापडले. त्यांच्या समोर आता आत्मसमर्पण करणे किंवा पळ काढणे हेच पर्याय होते.ऑपरेशन डायनॅमो या मोहीमेंतर्गत ३,३८,००० दोस्त सैनिकांनाडंर्ककहून उचलण्यात आले. युद्धनौका, होड्या, व मिळेल त्या तरंगणार्‍या वाहनातून या सैनिकांनी इंग्लंड गाठले. जून १०ला इटली जर्मनीच्या बाजूने युद्धात उतरले व फ्रांसच्या दक्षिणेकडून त्यांनी हल्ला केला. जर्मन सैन्याने फ्रांसमध्ये अनिर्बंध कूच सुरू ठेवली व जवळजवळ सगळे फ्रांस आपल्या टाचेखाली आणले. जून २२,१९४० रोजी फ्रांसने शस्त्रसंधीची याचना केली व शरणागती पत्करली. जर्मन सैन्याने पॅरिसमध्ये तळ ठोकला व आग्नेय फ्रांसमध्ये विची फ्रांस हे नावापुरते स्वतंत्र परंतु खरेतर जर्मनधार्जिणे सरकार बसवले. अशाप्रकारे बॅटल ऑफ फ्रांस ही एकतर्फी लढाई जर्मनीने जिंकून युरोपमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले. बॅटल ऑफ ब्रिटन फ्रांसवरची मोहीम विजयी होत असताना जर्मनीने युनायटेड किंग्डमवर ऑपरेशन सी लायन या नावाच्या मोहीमेची आखणी सुरू केली. ब्रिटीश सैन्याने डंर्ककहून पळ काढताना बरीचशी हत्यारे, जड तोफा व रसद तेथेच टाकून दिली होती व त्यामुळे ब्रिटीश सैन्याची स्थिती अगदी केविलवाणी झाली होती. असे असता जर एक घणाघाती घाव घातला तर युनायटेड किंग्डमने गुडघे टेकले असते. पण ब्रिटनवर हल्ला करायचा तर त्यासाठी समुद्र पार करावा लागणार होता किंवा आरमारी वेढा घालावा लागला असता.रॉयल नेव्हीशी टक्कर देणे जर्मन आरमाराला शक्य नव्हते पण काही करून ब्रिटीश द्वीपांवर सैन्य उतरवता आले व त्याला हवेतून आधार देता आला तर विजय निश्चित होता. त्यासाठी आधी रॉयल एर फोर्सचा समाचार घेणे आवश्यक होते.लुफ्तवाफे व रॉयल एर फोर्सच्या या लढाईलाबॅटल ऑफ ब्रिटन म्हणतात. लुफ्तवाफेने सुरुवात केली ती रॉयल एर फोर्सच्या विमानतळ व रडारचा वेध घेउन. मोडक्यातोडक्या धावपट्ट्यांवरुनसुद्धा उड्डाणे भरुन आर.ए.एफ.च्या वैमानिकांनी त्यांचा प्रतिकार सुरू केला व धाव घेतली थेट बर्लिनकडे. राजधआनी बर्लिनवरील झालेल्या बॉम्बफेकीमुळे हिटलरचा संताप झाला व त्याने लंडन शहरावर हल्ले सुरू करण्याचे आदेश दिले.द ब्लिट्झ नावाने ओळखल्या जाणार्‍या या हल्ल्यांमध्ये लंडनचे अतोनात नुकसान झाले. आर.ए.एफ.ने आपल्या स्पिटफायर व हरिकेन विमानांनी कसेबसे का होईना हे हल्ले परतवून लावले व लुफ्तवाफेला हवेत वर्चस्व मिळू दिले नाही. इकडे समुद्रात रॉयल नेव्हीने जर्मन आरमाराला रोखून धरले व इंग्लंडवर चढाई करण्याचा कारण्याचा मनसूबा धुळीत मिळाला. आता युनायटेड किंग्डमचा नाद सोडून हिटलरने आपली नजर पूर्वेकडे वळवली. इटलीचे ग्रीसवर आक्रमण युद्धापूर्वीच इटलीने अल्बेनियावर चढाई केलेली होती. ऑक्टोबर २८, १९४० रोजी तेथून त्यांनी ग्रीसवर हल्ला केला. ग्रीक सैन्याने तिखट उत्तर दिले व पुढील दोन महिन्यात इटलीलाच मागे रेटत अल्बेनियाचा एक चतुर्थांश भाग काबीज केला. रॉयल नेव्हीने ग्रीसच्या मदतीला येउन इटलीच्या आरमाराविरुद्ध कर्ारवाया सुरू केल्या. या धामधुमीत इटलीचे ५,३०,००० सैनिक अडकून पडले व त्यांची प्रगती खुंटली. दुसरे चीन-जपान युद्ध १९४०च्या सुमारास येथील युद्ध थंडावले होते. इस्तत: हल्ल्यात कोणत्याच बाजूला निर्णायक विजय मिळत नव्हता.अमेरिका जरी अधिकृतरीत्या तटस्थ असले तरी चीनला त्यांची भरघोस आर्थिक मदत होती, शिवाय चिनी वायुदलाच्या मदतीला काही अमेरिकन वैमानिकही पाठविण्यात आले होते. आग्नेय आशियातील युद्ध जुलै१९४०मध्ये फ्रेंच इंडो-चायनामध्ये आपल्याला लष्करी तळ उभारण्यासाठी जागा पाहिजे असल्याचे जपानने सूतोवाच केले.फ्रांस व इतर पाश्चिमात्य देशांनी अर्थातच ही मागणी धुडकावून लावली. अमेरिकेने १९११च्या जपान-अमेरिका व्यापारी करारातून अंग काढून घेतल्याचे जाहीर केले व जपानला युद्धसामग्री निर्यात करण्यावर बंदी घातली. जपानने सप्टेंबर २२ रोजी जपानी सैन्याने उत्तर फ्रेंच इंडो-चायना वर चाल केली. उत्तर आफ़्रिकेचे रणांगण फ्रेंच आरमाराने नांगी टाकल्यावर भमध्य समुद्रातील वर्चस्वासाठी रॉयल नेव्ही व इटालियन आरमारात चढाओढ सुरू झाली. रॉयल नेव्हीने आपल्या जिब्राल्टर, माल्टा व इजिप्तच्या अलेक्झांडि्रया बंदरातील तळांवरुन कारवाया सुरू ठेवल्या. ऑगस्टमध्ये इटालियन सैन्याने ब्रिटीश सोमालीलॅंड जिंकले व पुढील महिन्यात लिब्यामधून इजिप्तमधील ब्रिटीश सैन्यावर हल्ला केला. इटलीचा बेत होता सुएझ कालवा जिंकायचा. असे झाल्यावर भारत व इंग्लंडमधील नौकानयन बंद पडले असते व इंग्लंडला मिळणारी रसद व पैसा कमी होउन युद्धातील जोर कमी झाला असता. या हल्ल्याला ब्रिटीश,ऑस्ट्रेलियन व भारतीय फौजांनी ऑपरेशन कंपास या मोहीमेत प्रत्युत्तर दिले व कालवा ब्रिटीश हातातच ठेवला. जर्मनीने आपली आफि्रका कॉर्पस नावाने नंतर ख्यातनाम झालेली रणगाड्यांची सेना जनरल इर्विन रोमेलच्या नेतृत्त्वाखाली लिब्यात उतरवली. लेंड लीझ फ्रांसमध्ये प्रयत्नांची शर्थ करताना युनायटेड किंग्डमचे लश्करी बळ रोडावले होते. भारत व इतर वसाहतींतून अमाप संपत्ती ओढूनसुद्धा राष्ट्र आता भिकेला लागण्याची चिन्हे होती. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टने अमेरिकन कॉॅंग्रेसला पटवून दिले की अमेरिकेने जर ब्रिटीश साम्राज्याला मदत नाही केली तर युद्ध अमेरिकेच्या दाराशी येण्यास वेळ लागणार नाही. कॉॅंग्रेसने युद्धात उतरण्यास नकार दिला परंतु युनायटेड किंग्डम व ३७ इतर दोस्त राष्ट्रांना ५,००,००,००,००० (पाच अब्ज) अमेरिकन डॉलरचे युद्धसाहित्य व इतर रसद पुरवण्याचे मान्य केले. यातील ३,४०,००,००,००० डॉलर हे युनायटेड किंग्डमसाठी राखीव होते. अमेरिकन कॉॅंग्रेसचा हा ठराव लेंड लीझ नावाने ओळखण्यात येतो. कॅनडाने देखील ४,७०,००,००,००० (चार अब्ज सत्तर कोटी) अमेरिकन डॉलरचे साहित्य युनायटेड किंग्डमला पाठवले. जर्मनीचे ग्रीस, क्रीट व युगोस्लाव्हियावर आक्रमण मार्च २८ला रॉयल नेव्हीने इटालियन आरमाराशी भमध्य समुद्रात केप माटापानजवळ झुंज घेतली. जवळजवळ एकतर्फी झालेल्या या लढाईत इटालियन आरमाराने तीन विनाशिका व पाच क्रुझर गमावल्या. रॉयल नेव्हीची दोन विमाने खर्ची पडली. पांगळया झालेल्या इटालियन आरमाराची ग्रीसमध्ये समुद्रमार्गे सैनिक पोचवण्याची कुवत कमी झाली. एप्रिल ६, १९४१ रोजी जर्मनी, इटली,हंगेरी व बल्गेरियाच्या सैन्यांनी युगोस्लाव्हियावर चढाई केली. नाममात्र प्रतिकार मोडून काढत हे आक्रमक १० दिवसांत राजधानीपर्यंत पोचले व शरण आलेल्या युगोस्लाव्हियात त्यांनी अक्ष-धार्जिणे सरकार बसवले. जरी युगोस्लाव्ह सैन्याने लढा दिला नसला तरी तेथील नागरिकांनी दोन भूमिगत सशस्त्र चळवळी उभारल्या. या दोन्हींनी अक्ष राष्ट्रांबरोबर एकमेकांवरही हल्ले सुरू ठेवले. याच दिवशी (एप्रिल ६) जर्मनीने बल्गेरियातून ग्रीसवर हल्ला केला. इटलीला प्रखर लढा देणार्‍या ग्रीक सैन्याची कुवत जर्मनीच्या अफाट सैन्यापुढे कमी पडली व त्यांनी माघार घेतली. एप्रिल २७ला अथेन्सचा पाडाव होण्यापूर्वी युनायटेड किंग्डमने ५०,००० ग्रीक सैनिकांना उचलले. जरी ग्रीस पडले असले तरी जर्मनीचे सैन्य बरेच दक्षिणेला आले होते. परत आपल्या आघाडीवर जाण्यात त्यांचे जवळजवळ ६ आठवडे खर्ची पडले. याची जर्मनीला पुढे मोठी किंमत मोजावी लागणार होती. मे २०, १९४१ रोजी जर्मनीने आपल्या ७वी फ्लायगर डिव्हिजन व ५ माउंटन डिव्हिजन या युद्धकुशल तुकड्या क्रीटमध्ये उतरवल्या. ग्रीसमधून पराभूत होउन आलेल्या ११,००० ग्रीक सैनिक व २८,००० स्थानिक अर्धसैनिक दलांनी त्यांचा प्रतिकार केला. द्वीपावरील तीन विमानतळांवर लक्ष केंदि्रत केलेल्या जर्मन सैन्याचे पहिल्या दिवशी अतोनात नुकसान झाले पण मालेमे विमानतळ काबीज करण्यात त्यांना यश मिळाले. त्यानंतर यांनी विमानाद्वारे अधिक कुमक मागवली व लवकरच ग्रीक सैन्याचा बीमोड केला. जरी जर्मनीने ही लढाई जिंकली असली तरी ग्रीक सैन्याने हवाईहल्ल्याविरुद्ध दाखवलेल्या शौर्यामुळे हिटलरने हवाई हल्ले करणे बंद केले. जर्मनीचे सोवियेत संघावर आक्रमण जर्मनी व सोवियेत संघाने ऑगस्ट १९३९मध्ये मोलोटॉव्ह-रिबेनट्रप करार केला व त्यानंतर एकमेकांना युद्धात सहकार्य केले. तेव्हापासून १९४१च्या मध्यापर्यंत सोवियेत संघाने जर्मनीला युद्धसाहित्य, रसद, इ. साहाय्य केले. जून २२,१९४१ला जर्मनी सोवियेत संघावर उलटले. या दिवशी ऑपरेशन बार्बारोसा ही आधुनिक इतिहासातील मनुष्यबळाच्या बाबतीत सगळयात मोठी मोहीम सुरू झाली. जर्मनीने तीन सैन्यसमूह, अंदाजे ४०,००,००० सैनिक सोवियेत संघात घुसवले.लाल सैन्याला या व्यूहात्मक धक्क्यातून सावरायची संधी न देता ही टोळधाड रशियात विद्युतवेगाने शिरली. रशियन सैन्याच्या तुकड्यांना वेढा घालायचा व त्याचा घेरा आवळत आवळत शत्रूला नामशेष करायचे हा जर्मन सैन्याचा या लढायांमधील खाक्या होता. लाल सैन्याचे संपूर्ण पश्चिम सैन्य याप्रकारे नेस्तनाबूद झाले. अक्ष राष्ट्रांचे लक्ष विचलित करायला सोवियेत संघाने जून २५ला फिनलंडवर परत हल्ला केला व दुसरी आघाडी उघडली. असे असून सुद्धा जर्मनीला समोरासमोर टक्कर देता येत नाही हे पाहून सोवियेत सैन्याने दग्धभू(स्कॉर्चड अर्थ) व्यूह अंगिकारला. जर्मन सैन्य जेथे चढाई करणे अपेक्षित होते त्या भागातील कारखाने व इतर व्यवसाय होते तसे मोडले व भराभर युरल पर्वतांच्या पलीकडे नेउन जशीच्या तशी परत उभे केले. शेतातील उभी पिके जाळली, अन्नभांडार नष्ट केले व पूर्वेकडे माघार घेतली.नोव्हेंबर १९४१च्या सुमारास जर्मन सेना लेनिनग्राड, मॉस्को व रोस्तोव्हच्या वेशीवर येउन ठेपली. आता अतिकठीण असा रशियन हिवाळा सुरू झाला व पाच महिने अव्याहत चाललेली जर्मन आगेकूच ठप्प झाली. जर्मन सेनाधिकार्‍यांचा अंदाज होता की रशियातील थंडी सुरू व्हायच्या आतच जर्मन ब्लिट्झक्रीगपुढे रशिया गुडघे टेकेल व हिवाळयात युद्ध करण्या्ची गरजच उरणार नाही.ग्रीसमध्ये घालवलेले ६ आठवडे आता त्यांच्या अंगाशी येणार होते. जर्मन सेनेला स्थानिक रसद मिळणे दुरापास्तच होते. त्यांना पोलंड व जर्मनीतून युद्धसाहित्य, यंत्रसामग्री व अन्न-धान्यदेखील मागवावे लागत होते. कडाक्याच्या थंडीत हे सगळे घाडीवर पोचायला अनेक आठवडे लागत होते व जर्मन सैन्याची कुचंबणा व काही ठिकाणी तर उपासमार देखील होऊ लागली. इकडे या थंडीची सवय असलेल्या लाल सैन्याने आपली लश्करभरती चालूच ठेवली होती. जर्मन सैन्य मॉस्कोपासून हाकेच्या अंतरावर आले असता सोवियेत सैन्याने प्रतिहल्ले सुरू केले. आपली राजधानीच इरेला पडलेली पाहून त्यांनी केलेल्या या कडव्या हल्ल्यांनी आधीच अगतिक झालेले जर्मन सैन्य मागे हटले. सोवियेत रेटा इतका जबरदस्त होता की अक्ष सैन्याने काही दिवसातच १५०-२५० कि.मी. पीछेहाट केली. दुसर्‍या महायुद्धातील अक्ष राष्ट्रांची ही पहिली माघार होय. अटलांटिकचे युद्ध मे ९, १९४१ रोजी रॉयल नेव्हीची विनाशिका एच.एम.एस. बुलडॉगने एक जर्मन यु-बोट पकडली व त्यातून संपूर्णावस्थेत असलेले एनिग्मा यंत्र जप्त केले. जर्मनीचे कूटसंदेश समजण्यासाठी हे यंत्र अतिमहत्त्वाचे होते. मे २४ रोजी जर्मन युद्धनौका बिस्र्मा युद्धात उतरली. डेन्मर्कच्या अखातातील लढाईत बिस्मर्ाकने रॉयल नेव्हीचा मानदंड असलेली बॅटलक्रुझर एच.एम.एस. हूडला जलसमाधी दिली. चिडलेल्या रॉयल नेव्हीने बिस्मर्कचा शोध घेण्यासाठी युद्धनौकांचा तांडा सोडला. तीन दिवस सतत चाललेल्या या शोधाच्या अंती बिस्मार्क सापडली. हा लपाछपीचा खेळ २,७०० कि.मी. चालला. यात ब्रिटीश आरमाराच्या आठ युद्धनौका, दोन विमानवाहू नौका, अकरा क्रुझर, एकवीस विनाशिका व सहा पाणबुड्यांनी भाग घेतला होता.एच.एम.एस. र्आक रॉयल या विमानवाहू नौकेवरील विमानांनी बिस्मार्कवर टॉरपेडोने हल्ला केला. हल्ल्याने नुकसान फारसे झाले नाही पण बिस्मर्कचे सुकाणू अडकून बसले. दिशाहीन झालेल्या बिस्मर्ाकला मग इतर युद्धनौकांनी गाठले व बुडवले. अमेरिकेचे युद्धात पदार्पण हिटलरच्या सोवियेत संघावरील आक्रमणाची जपानला पूर्वकल्पना नव्हती. सोवियेत संघाला याची कुणकुण होती व एकाचवेळी दोन्हीकडून हल्ला होण्याचे टाळण्यासाठी सोवियेत संघाने जपानशी मैत्री करण्याचे ठरवले.एप्रिल १३,१९४१ रोजी सोवियेत-जपान तटस्थता करार करण्यात आला. यात सोवियेत संघाला पूर्वेकडून हल्ला न होण्याचे आश्वासन होते तर जपानला खात्री मिळाली की पश्चिमेकडून त्यांच्यावर हल्ला होणार नाही. जपानला आता आशिया-प्रशांत महासागरामधील युद्धावर लक्ष केंदि्रत करायला मोकळीक मिळाली. १९४१च्या ग्रीष्मात अमेरिका, युनायटेड किंग्डम व नेदरलॅंड्सने जपानला खनिजतेल विकण्यावर निर्बंध घातले. याने जपानची युद्ध चालू ठेवण्याची कुवत धोक्यात आली. जपानने होत्या त्या रसदीनिशी चीनमधील आगेकूच चालूच ठेवली. जपानचा बेत होता अमेरिकेवर अचानक धाड टाकून त्यांच्या आरमाराला निकामी करायचे व त्याच वेळी डच ईस्ट ईंडीझमध्ये घुसून तेथील तेलसाठे बळकावायचा. त्यानुसार डिसेंबर ७, इ.स. १९४१ रोजी जपानी आरमाराने अमेरिकेच्या हवाई प्रांतातील पर्ल हार्बर येथील आरमारी तळावर प्रचंड शक्तीनिशी हल्ला केला. या धाडीत अमेरिकेच्या आरमाराचे प्रचंड नुकसान झाले. सहा युद्धनौका बुडाल्या, दोन निकामी झाल्या व इतर अनेक नौकांचा विनाश झाला. या शिवाय नौका-दुरूस्ती केंद्र, रसद साठा व इतर अनेक व्यवसाय विनाश पावले. शेकडो सैनिक व नागरिक मृत्युमुखी पडले. अमेरिकेच्या सुदैवाने जपानी धाडीचे मुख्य लक्षलेल्या चार विमानवाहू नौका त्या वेळी कवायतींसाठी बाहेर पडलेल्या होत्या त्या वाचल्या व तळावरील इंधनसाठ्यालाही धक्का पोचला नाही. दुसर्‍या दिवशी अमेरिकेने जपानविरुद्ध युद्ध पुकारले. या हल्ल्यामुळे आत्तापर्यंत तटस्थ असलेले अमेरिकन जनमत पूर्णत: बदलले व या हल्ल्याचा वचपा काढण्याची मागणी होउ लागली. अमेरिकेने जपानविरुद्ध युद्ध पुकारताच जर्मनीने डिसेंबर ११ला अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले. हिटलरचा अंदाज होता की याने जर्मनीला जपानची सहानुभूती मिळेल व जपानकडून जर्मनीच्या सोवियेत संघावरील आक्रमणाला पाठिंबा मिळेल. परंतु जपान आपल्या सोवियेत संघाला दिलेल्या शब्दाला जागले व त्यांच्याविरुद्ध युद्धात भाग नाही घेतला. उलट, जर्मनीच्या या कृतीमुळे अमेरिकेतील युरोपमधल्या युद्धात भाग घेण्याविरुद्धचा उरलासुरला विरोधदेखील मावळला व युद्ध आता खरोखरचे जागतिक युद्ध झाले. जपानची आगेकूच त्याचवेळी डिसेंबर ८ रोजी (म्हणजे अमेरिकेतील डिसेंबर ७लाच) जपानने हाँगकाँगवर हल्ला केला व त्यानंतर लगेचच मलाया,फिलिपाईन्स,बॉर्नियो व बर्मावरही हल्ला केला. येथे त्यांना भारतीय, ब्रिटीश, ऑस्ट्रेलियन,केनेडीयन,अमेरिकन व न्यू इंग्लॅंडच्या सैन्याने कडवा प्रतिकार केला परंतु हे सगळे प्रदेश जपानने काही महिन्यातच काबीज केले.सिंगापूर बळकावताना जपानने हजारो ब्रिटीश व भारतीय सैनिकांना युद्धबंदी बनवले. चीनने अखेर जपानविरुद्ध अधिकृतरीत्या युद्ध पुकारले. जपानने प्रशांत महासागरातील रॉयल नेव्हीच्या तांड्यावर हल्ला चढवून एच.एम.एस. प्रिंस ऑफ वेल्स, एच.एम.एस. रिपल्स या युद्धनौका व त्यासोबत ८४० खलाश्यांना यमसदनी धाडले. याचा युनायटेड किंग्डमला मोठाच धक्का बसला. उत्तर आफि्रका व मध्यर्पू उत्तर आफ़्रिकेत उतरलेल्या फील्ड मार्शल रोमेलच्या सैन्याने पूर्वेकडे आगेकूच चालू ठेवली व टोब्रुक या बंदराला वेढा घातला.टोब्रुक सोडवायचे दोस्त राष्ट्रांचे दोन प्रयत्न निष्फळ झाले शेवटी ऑपरेशन क्रुसेडर या मोहीमेंतर्गत मोठ्या सैन्यानिशी हल्ल्याला उत्तर दिल्यावर रोमेलने टोब्रुकचा वेढा उठवला वा इतरत्र प्रयाण केले. एप्रिल-मे १९४१मध्ये युनायटेड किंग्डमने इराकवर हल्ला करुन इराक परत जिंकुन घेतले. जूनमध्ये दोस्त सैन्याने सिरिया व लेबेनॉन जिंकले. तटस्थ राहिलेल्या इराणवर सोवियेत संघ व यु.के.ने हल्ला केला व तेथील तेलसाठा बळकावला. इराणमधील तेलवाहिन्यातून सोवियेत संघाला खनिज तेलाचा मुबलक पुरवठा सुरू झाला. मध्य व पश्चिम युरोप मे १९४२मध्ये चेकोस्लोव्हेकियातील भूमिगत सशस्त्र चळवळीच्या सस्यांनी 'शेवटच्या उपायाचा' योजक राइनहार्ड हेडि्रख याचा खून केला. याचा वचपा काढण्यासाठी हिटलरने चेकोस्लोव्हेकियामधील लिडाइस हे गाव बेचिराख केले. ऑगस्टमध्ये केनेडीयन सैनिकांनी ऑपरेशन ज्युबिली नावाखाली फ्रांसच्या दियेपे गावाजवळ धाड घातली. ही मोहीम सपशेल फसली व अनेक सैनिक मृत्युमुखी पडले वा युद्धबंदी झाले पण यातून दोस्त सेनापतींनी धडे घेतले व ऑपरेशन र्टॉ व ऑपरेशन ओव्हरर्लॉडच्यावेळी ते गिरवले. शिशिर व वसंतातील सोवियेत हल्ले उत्तर युरोपमध्ये लाल सैन्याने जानेवारी ९ ते फेब्रुवारी ६च्या दरम्यान टोरोपेट्स-खोल्म मोहीम उघडुन अ‍ॅंडि्रयापोल व देम्यान्स्कजवळ जर्मन तुकड्यांना हरवले. याशिवाय खोल्म, वेलिझ व वेलिकी लुकीच्या आसपास जर्मन सैन्याला थोपवण्यात त्यांना यश मिळाले. दक्षिणेत मे महिन्यात सोवियेत सैन्याने जर्मनीच्या सहाव्या सैन्याविरुद्ध आघाडी उघडली. खार्कोव्हजवळ १७ दिवस चाललेल्या लढाईत २,००,०००पेक्षा जास्त लाल सैनिक मृत्यू पावले. ग्रीष्मातील अक्ष हल्ले जून २८ला अक्ष राष्ट्रांनी ऑपरेशन ब्लू ही मोहीम सुरू केली. जर्मन सैन्य आग्नेयेला डॉन नदी पासून व्होल्गा नदीपर्यंत कॉकेसस पर्वतांच्या दिशेने कूच करू लागली. सैन्यसमूह बी स्टालिनग्राड शहर जिंकायच्या अपेक्षेने निघाला. स्टालिनग्राड जिंकून जर्मन सैन्याची डावी आघाडी सुरक्षित होताच सैन्यसमूह ए दक्षिणेतील तेलसाठे जिंकून घेणार होता. ग्रीष्म संपता झालेल्या कॉकेससच्या लढाईत जर्मनीने हे तेलसाठे जिंकून घेतले. स्टालिनग्राड जर्मन सैन्यसमूह बी ऑगस्ट २३,१९४२ रोजी स्टालिनग्राडच्या उत्तरेला व्होल्गा नदीच्या किनारी येऊन पोचला. या सुमारास लुफ्तवाफेने केलेल्या बॉम्बफेकीत गावाच्या मध्यावर असलेल्या लाकडी इमारती व कारखाने उद्धवस्त झाले. महिन्याभरात उरलेसुरले उद्योग-धंदेही नष्ट झाले व शहराच्या पिछाडीस असलेले पूल व रस्तेसुद्धा जर्मन तोफखान्याच्या पल्ल्यात आले. आता स्टालिनग्राडला रसद/कुमक मिळणेही मुश्किल झाले. जर्मन सैन्याने आता शहरात धाडी घालणे सुरू केले. सोवियेत सैनिकांनी व स्टालिनग्राडच्या नागरिकांनी त्यांचा चौकाचौकातून व घराघरातून सामना केला. अत्यंत भयानक अशा हातोहात लढाया रोजच व्हायला लागल्या. हळूहळू रशियन हिवाळा जर्मन सैन्यालाही गारठू लागला पण लढाईची तीव्रता तितकीच राहिली. दमछाक व उपासमारीने दोन्हीकडील सैन्याला पछाडले. स्टालिनग्राडची स्थिती तर अगदीच केविलवाणी होती पण तरीही तेथील नागरिक जिद्दीने मुकाबला करीत राहिले. आता हिटलरही ईर्षेला पेटला. काही केल्या स्टालिनग्राड जिंकायचेच असे हुकुम त्याने सोडले. जर्मन सेनापतींनी व्यूहात्मक माघार घेऊन हिवाळयानंतर परत हल्ला करायचे सुचवले पण हिटलरने ते धुडकावून लावले. आता स्टालिनग्राडच्या लढाईत हिटलर बर्लिनमधून स्वत: व्यूह रचू लागला. जनरल फोन पॉलसने वैतागून नोव्हेंबरमध्ये शहरावर निर्वाणीचा हल्ला चढवला जर्मनीचे सहावे सैन्य स्टालिनग्राडमध्ये घुसले. त्यांनी शहराचा ९०% भाग काबीज केला. सोवियेत सैन्याने स्टालिनग्राडच्या बाहेर सैन्य गोळा करण्यास सुरुवात केलेली होती. जर्मन सैन्याचा मोठा भाग शहरात होता व तेथील हातोहात लढायां गुंतलेला होता. परिणामी त्यांच्या बाजू दुबळया पडल्या. ही संधी साधून सोवियेत सैन्याने ऑपरेशन युरेनस ही मोहीम सुरू केली व नोव्हेंबर १९ रोजी जर्मन सैन्याच्या दोन्ही बाजूने एल्गार केला. हा हल्ला परिणामकारक ठरला व जर्मन सैन्याचा प्रतिकार खचला. दोन्हीकडून आलेले सोवियेत सैन्य स्टालिनग्राडच्या नैऋत्येला कलाच शहराजवळ एकत्र झाले. परिणामी स्टालिनग्राडमध्ये घुसलेले सहावे जर्मन सैन्य आता चारही बाजूंनी वेढले गेले. अडकलेल्या जर्मन सैन्याने हिटलरकडे वेढा फोडून बाहेर पडण्याची (त्यायोगे स्टालिनग्राड परत सोवियेत सैन्याला देण्याची) परवानगी मागितली पण ती नाकारली गेली. हिटलरने सहाव्या सैन्याला स्टालिनग्राडमध्येच थांबायचा हुकुम सोडला व बाहेरुन सैन्य पाठवून वेढा फोडण्याचे आश्वासन दिले. त्यादरम्यान लुफ्तवाफेद्वारा रसद पुरवण्याचीही ग्वाही दिली. पण लुफ्तवाफेकडून होणारी मदत ही गरजेच्या एक षष्ठांशही नव्हती व लवकरच जर्मन सैन्याची गत महिन्याभरापूर्वीच्या स्टालिनग्राडच्या नागरिकांसारखीच झाली.लाल सैन्याला हिटलरच्या व्यूहाचा अंदाज होताच. त्यांनी मॉस्कोजवळ ऑपरेशन मार्च सुरू केले व मध्य सैन्यसमूहाची लांडगेतोड करण्यास सुरुवात केली. परिणामी जर्मनीला तेथून स्टालिनग्राडच्या मदतीला कुमक पाठवणे अशक्य झाले. मॉस्कोकडून कुमक येत नसल्याचे पाहून दक्षिण सैन्यस्मूहाच्या सेनापती फोन मॅनस्टीनने डिसेंबरमध्ये आपल्या सैन्यातून काही तुकड्या स्टालिनग्राडच्या मदतीला पाठवल्या पण स्टालिनग्राडपासून ५० कि.मी. अंतरावरील लढाईत त्यांचा पराभव झाला व त्यांनी माघार घेतली. स्टालिनग्राडमधील सहाव्या सैन्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. हिटलरला अजूनही स्टालिनग्राडमध्ये पराभव मान्य नव्हता. जानेवारीत त्याने जनरल पॉलसला फील्डमार्शलपदी पदोन्नती दिली. जर्मनीच्या इतिहासात एकाही फील्डमार्शलने शत्रूसमोर शरणागती पत्करली नव्हती तसेच एकही फील्डमार्शल शत्रूच्या हाती जिवंत लागलेला नव्हता. फोन पॉलसच्या पदोन्नतीतून हिटलर जणू काही फोन पॉलस व सहाव्या सैन्याला संदेशच देत होता की त्यांनी शरणागती पत्करणे हिटलरला मंजूर नव्हते. अपेक्षित होते ते मरेपर्यंत लढणे व हरल्यास मरणे. परंतु फोन पॉलसला हे पटले नाही. आपल्या सैन्याची दयनीय अवस्था पाहून त्याने फेब्रुवारी २ रोजी सोवियेत सैन्यासमोर शरणागती पत्करली. असलेल्या सैनिकांपैकी २२ जनरलांसह फक्त ९१,००० सैनिकांना जिवंतपणी युद्धबंदी केले गेले. यांपैकीसुद्धा केवळ ५,००० युद्धाच्या अंतापर्यंत जिवंत राहिले. अतिशय दारुण अशा या लढाईत दोन्ही पक्षांचे अपरिमित नुकसान झाले. दोन्हीकडचे मिळून २०,००,००० व्यक्ती मरण पावल्या. पैकी अक्ष राष्ट्रांचे ८,५०,००० सैनिक व उरलेले सोवियेत सैनिक व नागरिक होते. तोपर्यंतच्या जगाच्या इतिहासातील मृतांच्या आकड्याच्या दृष्टीने ही सगळया मोठी लढाई ठरली. नैऋत्य व मध्य प्रशांत महासागर जपानविरुद्ध युद्धाची तयारी करीत असताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टने अमेरिकेत राहणार्‍या जपानी, इटालियन व जर्मन वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात धाडण्याचा हुकुम सोडला. युद्ध संपेपर्यंत हे लोक हलाखीच्या अवस्थेत तुरुंगसदृश जागेत राहिले. त्यादरम्यान त्यांची संपत्ती सरकार व इतर नागरिकांनी बळकावली. एप्रिल १९४२मध्ये अमेरिकेने जपानवर पहिला हल्ला केला. टोक्योवरील बॉम्बफेकीने नुकसान जास्त झाले नसले तरी अमेरिकन जनतेच्या अंगावर मूठभर मांस चढले व जपानने आपले काही सैन्य व आरमार स्वत:च्या किनार्‍याजवळ परत बोलावले. मे मध्ये जपानी आरमाराने यू गिनीतील र्पोट मोरेस्बी शहरावर हल्ला केला. दोस्त राष्ट्रांच्या आरमाराने कॉरल समुद्राच्या लढाईत जपानला रोखले परंतु अमेरिकेची यु.एस.एस. लेक्झिंग्ट्न ही विमानवाहू नौका त्यात बळी पडली. कॉरल समुद्राची ही लढाई विमानवाहू नौकांची आमनेसामने झालेली पहिलीच लढाई होती. पुढच्या महिन्यात दोन्ही आरमारात पुन्हा टक्कर झाली ती मडवेच्या लढाईत. तोपर्यंत अमेरिकेच्या तंत्रज्ञम्प्;ांनी जपानी यामुळे त्यांना जपानी बेतांची पूरेपूर माहिती होती. अमेरिकेच्या बॉम्बफेकी विमानांनी जपानच्या चार विमानवाहू नौका बुडवल्या व जपानी आरमाराचा कणा मोडला. इतिहासकारांच्या मते ही लढाई युद्धातील निर्णायक क्षणांपैकी होती. येथून जपानच्या अनिर्बंध सत्ताप्रसाराला खीळ बसली. मेमध्ये न्यू गिनीवर समुद्रीमार्गाने केलेले आक्रमण फसल्यावर जपानने जुलैमध्ये जमिनीवरुन हल्ला केला. र्पोट मोरेस्बीच्या पश्चिमेस जंगलात जमा होऊन कोकोडा पायवाटेवरुन जपानी सैन्याने हल्ला केला. त्यावेळी र्पोट मोरेस्बीचा बचाव करण्याची जबाबदारी ऑस्ट्रेलियन सैन्यावर होती. ५,००० सैनिकांनी मिळेल त्या हत्यारांनिशी आपल्यापेक्षा बर्‍याच मोठ्या सैन्याचा यशस्वी प्रतिकार केला व जपानी सैन्याला मागे रेटले. यानंतर दोन्ही सैन्यांनी कुमक मागवली व सप्टेंबरमधील मिल्ने बेच्या लढाईनंतरही जानेवारी १९४३पर्यंत चकमकी होत राहिल्या पण दोस्त सैन्याने र्पोट मोरेस्बी शत्रूच्या हाती पडू दिले नाही. जपानी सेनेचा जमिनीवरील युद्धात हा प्रथम पराभव होता. ऑगस्ट ७ ला अमेरिकेचे मरीन सैनिक ग्वादालकॅनालच्या लढाईत उतरले.ग्वादालकॅनाल बेटावर वर्चस्व मिळवण्यासाठी झालेली ही लढाई सहा महिने चालली. यादरम्यान आसपासच्या समुद्रात अनेक आरमारी लढाया झाल्या त्यातील काही म्हणजे साव्हो बेटाची लढाई,केप रान्सची लढाई, ग्वादालकॅनालची आरमारी लढाई,तासाफरोंगाची लढाई, इ. चीन-जपान युद्ध पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर जपानने चीनवर नव्याने हल्ला केला. यावेळी त्यांचा रोख चांग्शा शहर जिंकण्यावर होता. जपानने १,२०,००० सैनिकांसह केलेल्याल्याला चीनने ३,००,००० सैनिकांनी प्रत्युत्तर दिले. दोन बाजूंनी चीनी सैन्याच्या कचाट्यात सापडलेल्या जपानने तेथून काढता ला. ईशान्य आफि्रका १९४२च्या सुरुवातीला दोस्त राष्ट्रांना आफ़्रिकेतील काही सैन्य पूर्वेच्या आघाडीवर पाठवावे लागले. याच वेळी जनरल रोमेलने लिब्यातील बेंगाझी शहर काबीज केले. त्यानंतर त्याने गझालाच्या लढाईत दोस्त सैन्याला हरवले व टोब्रुक जिंकून घेत दोस्त सैन्याची वाताहत केली. टोब्रुकला हजारो युद्धबंदी व मोठी रसद मिळवून रोमेलनेइजिप्तवर चढाई केली. इजिप्तमध्येअल अलामेनची पहिली लढाई जुलै १९४२मध्ये झाली. रोमेलने दोस्त सैन्याला मागे रेटतअलेक्झांडि्रया वसुएझपर्यंत ढकलले पण आता जर्मन सैन्याकडील इंधन व अन्नसाठाही ोता व कोपर्‍यात सापडलेल्या दोस्त सैन्याचा प्रतिकारही तिखट झाला होता. अल अलामेनच्याच जवळ दुसरी लढाई झाली ती ऑक्टोबर २३ वाखालीब्रिटीश आठव्या सैन्याने रोमेलला माघार घेण्यास भाग पाडले. रोमेलने आफि्रका कोरसह ्युनिसियात माघार घेतली वायव्य आफि्रका दोस्त राष्ट्रांनी नोव्हेंबर ८, १९४२ रोजी ऑपरेशन र्टॉ नावाची मोहीम सुरू केली. कॅसाब्लांका, ओरान व अल्जियर्समधून सैनिक घुसवून उत्तर आफि्रका जिंकण्याच्या बेताने उतरलेल्या या सैन्याला काही दिवसांनी बोने येथे उतरलेल्या सैनिकांची साथ मिळाली. हा सगळा जथा टयुनिसियातील रोमेलच्या सैन्यावर चाल करुन गेला. रस्त्यात विची फ्रांसच्या सैन्याने नाममात्र प्रतिकार केला पण शत्रूची संख्या व कुवत पाहून लगेचच हत्यारे खाली ठेवली. यामुळे चिडलेल्या हिटलरने विची फ्रांसवर हल्ला करुन तेथील नाममात्र सरकारसुद्धा पदच्युत केले व लष्करी कायदा लावला. आता टयुनिसियातील जर्मन व इटालियन सैन्य अल्जिरीया व लिब्याकडून चाल करुन येणार्‍या दोस्त सैन्याच्या कचाट्यात सापडले. रोमेलने ही कोंडी फोडण्यासाठी कॅसरीन पासच्या लढाईत अमेरिकन सैन्याला धूळ चारली व अक्ष सैन्याचा एक भाग सोडवला. पण उरलेल्या अक्ष सैन्याने लवकरच पराभव पत्करला. सोवियेत कारवाया स्टालिनग्राडच्या विजयानंतर लाल सैन्याने जर्मन सैन्याचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. मुख्यत्त्वेडॉन नदीच्या आसपासच्या या कारवायात सोवियेत सैन्याला सुरुवातीस यश मिळाले पण लवकरच जर्मनीने नव्या दमाने त्यांचा प्रतिकार केला व एकामागोमाग लढाया जिंकल्या. खार्कोव्ह शहर परत जर्मनीच्या हातात गेले. सोवियेत सैन्याने वर्षअखेर खार्कोव्ह परत मिळवले. सोवयेत सैन्याची चढती कमान पाहून हिटलरने आपल्या सैन्याला ड्नाइपर नदीपर्यंत माघार घेण्याची परवानगी दिली. सप्टेंबरपर्यंत ड्नाइपरच्या तीरावर बचावफळी तयार करण्यात आली पण लवकरच सोवियेत सैन्याने तेथून जवळच ड्नाइपर ओलांडली व एकामागोमाग शहरे काबीज करण्यास सुरुवात केली. झापोरोझ्ये व ड्नेप्रोपेट्रोव्ह्स्क नंतर लाल सैन्याने युक्रेनची राजधानी क्यीव्हकडे मोर्चा वळवला. नोव्हेंबरमध्ये क्यीव्हच्या दोन्ही बाजूंनी हल्ला करीत सोवियेत सैन्य शहरात दाखल झाले. डिसेंबर २४ला कोरोस्टेन जिंकून घेउन तेथून रेल्वेमार्गाच्या बाजूने चाल करीत सोवियेत व युक्रेनियन सैन्याने१९३९च्या सोवियेत-पोलंड सीमेपर्यंत धडक मारली. जर्मन कारवाया १९४३चा वसंत जर्मन आणी सोवियेत सैन्यांनी पुनर्बांधणीत घालवला. तयारी पूर्ण न झाल्यामुळे जर्मनीने आघाडी उघडणे लांबवले. अखेर जुलै ४च्या सुमारास वेह्रमाख्टने दुसर्‍या महायुद्धातील आपले सगळयात मोठे दल जमा केले आणी कुर्सक शहरावर चाल केली. याची कल्पना असलेल्या लाल सैन्याने येथे मातीचे कामचलाउ किल्ले उभारुन त्याआडून प्रतिकार केला. जर्मनीने रशियन व्यूहरचनेतील पान उचलून कुर्सकच्या उत्तर व दक्षिणेकडून एकदम चाल केली होती. त्यांचा बेत सोवियेत सैन्याच्या पिछाडीचा प्रदेश काबीज करुन स्टालिनग्राडप्रमाणे रशियाच्या ६० डिव्हिजन पकडण्याचा होता. उत्तरेकडून आलेल्या जर्मन सैन्याला फारशी प्रगती करता नाही आली पण दक्षिणेतून त्यांनी बरीच मजल मारली. वेढले जाण्याची शक्यता ओळखून सोवियेत सैन्याने आपली राखीव दलेसुद्धा आता युद्धात उतरवली. यावेळी झालेली कुर्सकची लढाई ही रणगाड्यांची युद्धातील सगळयात मोठी लढाई ठरली. प्रोखोरोव्ह्का शहराजवळ झालेल्या या लढाईत तिन्ही बाजूंनी होतीनव्हती ती सगळी शक्ती पणाला लावली. जर्मनीचे सैन्य गेली चार वर्षे अव्याहत लढत होते व त्यांच्याकडे राखीव असे सैन्य नव्हतेच. उलटपक्षी रशियाने आपले ताज्या दमाचे राखीव सैन्य रणात उतरवले होते. याची परिणती लवकरच दिसून आली. जर्मन हल्लेखोरांचा धुव्वा उडवत सोवियेत सैन्याने त्यांना युद्धाच्या सुरुवातीपेक्षा मागे रेटले. दोस्तांचे इटलीवर आक्रमण ऑगस्ट १९४३मध्ये रोमेलने कॅथेरीन पासच्या लढाईत दोस्त सैन्याला गुंगारा दिला होता पण टयुनिसियातील उरलेले अक्ष सैन्य फारसा प्रतिकार करु शकले नाही व २,५०,००० सैनिकांनी तेथे आत्मसमर्पण केले. यात इटलीच्या सैन्यदलातील बहुसंख्य सैनिक होते. दरम्यान जुलैमध्ये दोस्त राष्ट्रांनी ऑपरेशन हस्की मोहीमेंतर्गत सिसिलीवर चढाई केली व महिन्याभरात बेट जिंकून घेतले. शत्रू दाराशी येऊन टेपलेला बघताच इटलीतील बेनितो मुसोलिनीचे सरकार गडगडले. राजा व्हिक्टर इम्मॅन्युएल तिसर्‍याने मुसोलिनीला पदच्युत केले व ग्रेट फाशिस्ट काउन्सिलच्या संमतीने त्याला अटकही करवली. पीयेत्रो बॅदोग्लियोच्या नेतृत्त्वाखालील नवीन सरकारने युद्ध चालू ठेवण्याचे जाहीर केले पण एकीकडे दोस्त राष्ट्रांशी गुप्त वाटाघाटी सुरू केल्या. यात ठरल्याप्रमाणे दोस्तांनी सप्टेंबर ३ रोजी इटलीवर चढाई केली. चार-पाच दिवस नाममात्र प्रतिकार करुन इटलीने शरणागती पत्करली. राजा व त्याचे कुटुंब बॅदोग्लियोच्या सरकारसह रोमहून दक्षिणेला पळून गेले. नेतृत्त्वहीन इटालियन सैन्याने तुरळक लढाया केल्या पण लवकरच त्यांनीही शस्त्रे खाली ठेवली. हे पाहताच उत्तरेतून जर्मन सैन्य पुढे सरसावले व त्यांनी दोस्त सैन्याला रोमच्या दक्षिणेला गुस्ताव रेषेवर चार-पाच महिने रोखून धरले. जर्मनीने उत्तरेत सालोचे इटालियन समाजवादी प्रजासत्ताक या नावाखाली जर्मनधार्जिणे सरकार मुसोलिनीच्या हाती देउन बसवले. याचवेळी जर्मनीने युगोस्लाव्हियात आपले सैनिक पाठवून तेथील भूमिगत चळवळ चिरडण्याचा प्रयत्न केला. अटलांटिकची लढाई जर्मनीने आपल्या यु-बोटींनी दोस्त राष्ट्रांच्या आरमाराला गेली चार वर्षे सळो कि पळो केलेले होते. आता दोस्तांनी त्यांचे आरमारी व्यूह बदलले व यु-बोटींचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. १९४३मध्ये यु-बोटींना नौकांचे दोन तांडे बुडवण्यात यश आले पण शत्रूने अनेक यु-बोटीही बुडवल्या. जर्मनीत नवीन यु-बोटी तयार होणे जवळजवळ थंडावलेच होते. आपली संख्या कमी होत असलेली पाहून यु-बोटींनी खुल्या समुद्रात हल्ले करण्याचे सोडले व किनारार्‍याच्या जवळ राहून शिकार शोधणे पसंत केले. यु-बोटींचा धोका कमी होताच दोस्त आरमारांनी र्आकटिक समुद्रातून रशियाकडे रसद धाडण्यास पुन: सुरुवात केली. यामुळे सोवियेत संघाचे पारडे जड होणार असे दिसताच जर्मन आरमाराने आपला मोर्चा तिकडे वळवला.नॉर्थ केपच्या लढाईत रॉयल नेव्हीच्या एच.एम.एस. ड्युक ऑफ र्यॉ,एच.एम.एस. बेलफास्ट व इतर काही विनाशिकांनी मिळून जर्मनीची शेवटची बॅटल क्रुझर शार्नहॉर्सटला जलसमाधि दिली. मध्य व नैऋत्य प्रशांत महासागर दोस्त सैन्याने जानेवारी २ला न्यू गिनीतील बुना शहर जिंकले व र्पोट मोरेस्बीवरील जपानी टांगती तलवार दूर केली.जानेवारी २२ पर्यंत पुढे चाल करीत त्यांनी जपानी सैन्याचे पूर्व आणी पश्चिम न्यू गिनीमध्ये ये-जा करण्याचे मार्गही बंद केले. त्यामुळे दोन्हीकडच्या जपानी सैन्यांना हरवणे सोपे झाले. अमेरिकन सैन्याने फेब्रुवारी ९ला ग्वादालकॅनाल मुक्त केले व सोलोमन द्वीपांवर चढाई केली व वर्षअखेर तेही जिंकून घेतले. चीन-जपान युद्ध चीनच्या हुनान प्रांतातील चांग्डे शहरावर जपानने नोव्हेंबर २,१९४३ रोजी १,००,००० सैनिकांसह हल्ला केला. पुढील काही दिवसांत हे शहर जपान व चीनच्या हाती पडले पण अंती चीनने जपानी आक्रमकांना हुसकावून लावले व बाहेरुन मदत मिळेपर्यंत शहर लढवले. स्टालिनग्राडप्रमाणे चाललेल्या या युद्धात दोन्हीकडचे मिळून १,००,०००हून अधिक व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आग्नेय आशिया चीनमध्ये सम्राट च्यांग कै-शेकच्या नेतृत्त्वाखालील कॉमिन्टांग सैन्य आणी साम्यवादी माओ झेडॉॅंगच्या नेतृत्त्वाखालील चीनी सैन्य जपानी आक्रमणाचा सामना करीत असले तरी दोघांत एकवाक्यता नव्हती व एकमेकांत कुरबुरी सुरूच होत्या. इकडे ब्रिटनने दोन्ही सैन्यांना बर्मा रोड नावाने ओळखल्या जाणार्‍या घनदाट जंगल व कठीण पर्वत पार करीत असम पासून ब्रह्मदेश(आताचे म्यानमार)मार्गे रसद पुरवठा सुरू ठेवला होता. जपानने म्यानमार हस्तगत केल्यावर हा मार्ग बंद पडला. यावर उपाय म्हणून रॉयल एरफोर्सने ईशान्य भारतातील विमानतळांवरुन ही मदत सुरू ठेवली होती. जपानी सैन्य ब्रह्मदेशातून हटत नाही ही पाहिल्यावर ब्रिटनने चीनी सैन्याला अरुणाचल प्रदेशमार्गे भारतात आणले व अमेरिकन जनरल जोसेफ स्टिलवेलने त्यांना नवी तालीम व शस्त्रास्त्रे दिली. या चीनी सैन्याच्या पाठबळावर आता ब्रिटनने भारतातून चीनला जाण्यासाठी लेडो र्मा बांधण्याचे काम सुरू केले. शिशिर-वसंतातील सोवियेत कारवाया लाल सैन्याने जानेवारीत लेनिनग्राडचा वेढा उठवल्यावर जर्मनीने पद्धतशीरपणे माघार घेत तेथुन दक्षिणेला बचावफळी उभारली. त्या भागातील तळयांचा आधार घेत जर्मनीला ही आघाडी उभारण्यात यश आले पण त्या सुमारास जनरल हान्स-व्हॅलेन्टिन ह्युबचे पहिले पॅन्झर सैन्य दोन बाजूंनी चालून आलेल्या सोवियेत सैन्याच्या कचाट्यात सापडले. सात आठवड्यांनी त्यांनी आपली सुटका करुन घेतली पण बरेचसे जर्मन रणगाडे व तोफा शत्रूच्या हाती पडल्या. वसंत ऋतुत जर्मनीने युक्रेनमधूनही माघार घेतली पण त्यांच्या दक्षिण सैन्यसमूहातील सतरावे सैन्य बचावासाठी तेथे थांबले. वसंतअखेर लाल सैन्याच्या तिसर्‍या युक्रेनियन आघाडीने त्यावर हल्ला करून जर्मन सैन्याचा धुव्वा उडवला. रशियन सैन्याने या लढाईत काळया समुद्रापार माघार घेणार्‍या जर्मन सैन्याचा रस्ताही तोडला व २,५०,००० जर्मन व रोमेनियन सैनिकांना यमसदनी धाडले. याच सुमारास सोवियेत सैन्याने रोमेनियातील इयासी शहरावर चढाई केली. महिनाभर शहर लढवल्यावर जर्मन-रोमेनियन सैन्याने टारगुल फ्रुमोसच्या लढाईनंतर हार पत्करली व शहर सोवियेत सैन्याच्या हातात आले. यामुळे आता सोवियेत संघाला रोमेनियावर पुढील चाल करणे सोपे झाले. शत्रूची ही चाल पाहून हिटलरने अंदाज बांधला की हंगेरी पक्ष बदलून सोवियेत संघाला सामील होइल. हे टाळण्यासाठी जर्मनीने हंगेरीवर चढाई केली व आपले सैन्य देशभर पसरवले. उत्तरेत फेब्रुवारीत फिनलंडने स्टालिनशी तहाची बोलणी सुरू केली पण स्टालिनने पुढे केलेली तहाची कलमे त्यांना मंजूर नव्हती. जून ९ रोजी सोवियेत संघाने कारेलियन द्वीपकल्पावरुन चौथे आक्रमण केले व तीन महिन्यात फिनलंडला नमवून तह करणे भाग पाडले. इटली व मध्य युरोप इटलीने शरणागती पत्करल्यावर जर्मन सैन्याने इटालियन द्वीपकल्पाचा बचाव करण्याचे ठरवले व रोमच्या दक्षिणेस एपेनाइन पर्वतातून गुस्ताव रेषेवर बचावाची फळी उभारली. अनेक प्रयत्नांनंतरसुद्धा दोस्तांना ही फळी फोडता आली नाही. पर्यायाने त्यांनी त्यास वळसा घालण्याचा प्रयत्न केला. ऑपरेशन शिंगल नावाखाली केलेल्या या मोहिमेने आंझियो येथे जानेवारी २२,१९४४ रोजी समुद्रातून हल्ला केला खरा पण किनार्‍यावर उतरलेल्या सैन्याला लगेचच जर्मन सैन्याने वेढले व हाही प्रयत्न फसला. गुस्ताव रेषा पार करण्यासाठी बेचैन झालेल्या दोस्त सैन्याने परत समोरासमोरचे हल्ले सुरू केले.५२४ मध्ये उभारलेली माँते कॅसिनो येथील ख्रिश्चन साधूंची वस्ती अमेरिकन वायु सेनेने फेब्रुवारी १५ रोजी उद्धवस्त केली. त्यांचा असा समज झाला होता की या वस्तीत राहून जर्मन सैन्य त्यांच्या तोफखान्याला गुप्त बातम्या पुरवत होते. बेचिराख झालेल्या या वस्तीत जर्मन सैनिक फेब्रुवारी १७ला आले व त्यांनी आता तेथे ठाण मांडले. मे १८ पर्यंत चार वेळा दोस्त सैन्याने येथे हल्ले केले. यात २०,००० जर्मन तर ५४,००० दोस्त सैनिक मृत्युमुखी पडले. अखेर गुस्ताव रेषेवरची बचावाची जर्मन फळी फुटली व दोस्त सैन्याने उत्तरेकडे आगेकूच सुरू केली. जून ४ला हे सैनिक रोममध्ये पोचले तर ऑगस्टमध्ये फ्लोरेंसला. हेमंत ऋतूच्या सुमारास जर्मन सैन्याने टस्कनीतील एपेनाइन पर्वतातील गॉथिक रेषेवर पुन्हा जमवाजमव करून त्यांना रोखले युरोपमधील युद्धाचा एकंदर रागरंग बघून जर्मनीने मध्य युरोपमधून माघार घेतली व हंगेरीत आपल्या सैन्याची पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न सुरू केला. रोमेनियाने ऑगस्ट १९४४ दल बदलून जर्मनीवर युद्ध पुकारले. यामुळे युक्रेनमधून माघार घेणार्‍या जर्मन सैन्याला धोका निर्माण झाला. बल्गेरियाने सप्टेंबरमध्ये शरणागती पत्करली. बॉम्बहल्ले जून इ.स. १९४४मध्ये जर्मनीने सर्वप्रथम क्रुझ क्षेपणास्त्रांचा उपयोग युद्धात केला. व्ही-१ उडत्या बॉम्बनेयुनायटेड किंग्डमवर प्रत्यक्ष हल्ले होउ लागले. काही महिन्यांनी जर्मनीने ही कला अधिक विकसित केली व व्ही-२ हे द्रव-इंधन वापरणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे वापरण्यास सुरुवात केली. या हल्ल्यांना उत्तर व लुफ्तवाफेच्या कारवाया रोखण्यासाठी म्हणून अमेरिका, यु.के. व कॅनडाच्या वायुदलांनी व्यूहात्मक बॉम्ब फेकींनी सुरुवात केली. सुरुवातीला सरहद्दीवरच्या गावांवरील या धाडी हळूहळू जर्मनीच्या मुख्य शहरांपर्यंत पोचल्या. एअर चीफ मार्शल हॅरिसने आखणी केलेल्या या हल्ल्यांनी जर्मन प्रजा संत्रस्त होऊ लागली. हे ओळखून विन्स्टन चर्चिलने मग दहशतवादी धाडी मारण्याचे आदेश दिले. यात विमानांच्या अनेक स्क्वॉड्रन (५०० ते १,००० विमाने) एकाचवेळी अनेक दिशांनी एकाच शहरावर चाल करुन जायच्या व संपूर्ण शहरच्या शहर बेचिराख करण्याची योजना होती. हे पार पाडणारी विमाने अग्निजन्य बॉम्ब वापरुन आपली निशाणे संपूर्णत: उद्धवस्त करीत. अशा अनेक हल्ल्यांमध्ये विमानतळ, कारखाने, पाणबुड्यांची आश्रयस्थाने, रेल्वे-यार्ड, तेलसाठे तसेच व्ही-१ व व्ही-२ क्षेपणास्त्रांचे तळ नष्ट करण्याचा उद्देश होता. सहसा या हल्ल्यांमध्ये आसपासच्या नागरिक वस्त्याही बळी पडत. या टोळधाडींचा मुकाबला करण्यास आता लुफ्तवाफे कमी पडू लागली व उरलासुरला विरोधही मोडून काढणे दोस्त वायुसेनांना सोपे झाले. इ.स. १९४४च्या अंतापर्यंत पश्चिम आघाडीवर लुफ्तवाफेकडे फक्त तुरळक प्रमाणात विमानांच्या तुकड्या उरल्या होत्या. परिणामत: इ.स. १९४५च्या मध्यापर्यंत जर्मनीतील जवळजवळ सगळी मुख्य शहरे बेचिराख झालेली होती.

जीवसृष्टीचा उगम

पृथ्वीची उत्पत्ती सुमारे ५ अब्ज वर्षापूर्वी झाली. पृथ्वीवर जीवनाची सुरूवात कशी व केव्हा झाली याविषयी शास्त्रज्ञमध्ये एकमत नाही. विविध शास्त्रज्ञम्प्;ांनी विविध मते मांडली आहेत. पृथ्वी हा सुरूवातीस विविध वायुंनी बनलेला तत्प गोळा होता. क्रमाक्रमाने पृथ्वी थंड होत गेली. पृथ्वीवर निर्माण झालेली वैशिष्टयपूर्ण स्थिर परिस्थिती ही जीवसृष्टीच्या उगमाची पहिली पायरी समजली जाते. जीवसृष्टीचा उगम पृथ्वीवरच झाला हेच खरे. भूशास्त्रज्ञम्प्;ांच्या मते सुमारे २ अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर जीवांचा उगम होण्यास योग्य असे वातावरण होते, या प्रकारचे वातावरण आता अस्तित्वात नाही. हाल्देन (इंग्रज) आणि ओपारिन (रशियन) या दोन शास्त्रज्ञम्प्;ांनी जीवांच्या उत्पतीविषयी प्रयोगावर आधारित प्रथम मते मांडली. त्यांच्या मते पृथ्वीवरील सुरूवातीचे वातावरण अमोनिया, मिथेन आणि बाष्पयुक्त होते. त्या वेळच्या महासागरांच्या पाण्यात अमोनिया, मिथेन तसेच विविध खजिने विरघळलेल्या अवस्थेत होती. जलाशयातील या पाण्यात विविध रासायनिक मूलद्रव्यांमध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन पहिला जीव निर्माण झाला. कार्बन अणूभोवतीचा प्रथम जीवाची उत्पत्ती झाली. कार्बनाच्या संयुगातून प्रथम सेंदि्रय द्रव्यांची निर्मिती झाली. मिथेन, आणि पाणी यंाच्या प्रक्रियेतूनर्शकरायुक्त कर्बोद्रके, कार्बन, हायड्रोजन, आणि ऑक्सिजन यांच्या प्रक्रियेतून प्रथम ग्लिसेरॉलसारखी संयुगे व नंतर फॅटची निर्मिती झाली. याच तीन मूलद्रव्यांबरोबर चौथे मूलद्रव्य नत्र एकत्र आल्याने प्रथिने आणि अमिनो आम्लांची निर्मिती झाली. सर्व सजीवांच्या शरीरात या पदार्थांचे रेणू महत्त्वाची भूमिका बजावतात. यानंतरची प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. पायरीमिडाइन्स आणि प्युराइन्स कार्बनची संयुगे र्शकरा आणि फॉस्फेट यांच्याशी रासायनिक प्रक्रियेने बांधली गेली. यातूनच न्यूक्लीओटाइडस्ची निर्मिती होते. न्यूक्लीओटाइडसची एकमेकांशी प्रक्रिया होऊन न्यूक्लीक आम्ले निर्माण होतात व शेवटी न्यूक्लीक आम्ले आणि प्रथिने यांच्यात रासायनिक प्रक्रिया होऊन न्यूक्लिओ प्रथिने निर्माण होतात. न्यूक्लिओ प्रथिने हे एक प्रकारचे गुंतागुतीचे संयुग असून त्याच्याभोवती जीवाची निर्मिती होण्याची शक्यता सर्वाधिक असते. या प्रक्रियेसाठी लागणारी ऊर्जा सुर्यप्रकाशासाठी अतिनील किरणे आणि ढगांमधील वारंवार निर्माण होणार्‍या विजेच्या आविष्कारातून मिळाली असली पाहिजे. जीवसृष्टीच्या उगमासंदर्भात अनेक सिध्दांत आणि उत्त्पती मांडल्या गेल्या जीवाच्या उस्फूर्त निर्मितीच्या सिध्दांताप्रमाणे अगदी गुंतागुंतीचे जीवसुध्दा निर्जीव पदार्थापासून अचानक निर्माण झाले असावेत. कॉस्मोझोईक सिध्दांताप्रमाणे मूळ बीजकण विश्वाच्या दुरवरच्या भागातून पृथ्वीपर्यंत योगायोगानेच पोहोचले व त्यापासूनच जीवसृष्टी निर्माण झाली. अतिसूक्ष्म रोगाणू किंवा विषाणू हे पृथ्वीवरील पहिले जीव असावेत. विषाणुतूनच प्राथमिक पेशिकांची निर्मिती झाली. पर्यावरणातील विविध द्रव्यांच्या साहाय्याने या प्राथमिक पेशीतूनच क्रमाक्रमाने आधुनिक पेशींची निर्मिती झाली असे मानले जाते.

जग सन १९१९ ते दुसर्‍या महायुध्दापर्यंत

सन १९१८ मध्ये पहिले जागतिक महायुध्द संपुष्टात आले. सन १९३९ मध्ये दुसरे जागतिक महायुध्द सुरू झाले. पहिले महायुध्द मनुष्य आणि साहित्यसामग्रीच्या संदर्भात विध्वंसक ठरले. युध्द टाळण्याचे प्रयत्न झाले. परंतु वीस वर्षांच्या अल्पावधीनंतर युध्द घोंघावू लागले. दरम्यान युरोपमध्ये युध्दास अनुकूल अशा बर्‍याच घटना घडल्या. इटलीमध्ये फॅसीझम तर जर्मनीमध्ये नाझीझमचा उद्य झाला. सन १९२९-३३ या कालावधीत जागतिक आर्थिक मंदीची लाट आली. आशिया आणि आफि्रका खंडात स्वातंत्र्य आंदोलनांची जागृती व आंदोलनांचे प्रबळीकरण होऊ लागले. फॅसेस्ट संघटना: इटलीचा नेता मुसोलिनी याने २३ मार्च १९१९ रोजी मिलान येथे 'फॅसिस्ट संघटना' स्थापन केली. लॅंटिन भाषेतील फॅसेस या शब्दावरून इटालियन भाषेत फॅसिओ शब्द आला. 'फॉसे' या शब्दाचा अर्थ काठयांचे जुडगे. पर्यायी अर्थसत्तेच्या आकांक्षेने लोकांची एकजूट होय. मुख्य तत्त्व : राज्य म्हणजे सर्व काही आहे. नाझीबाद : जर्मनीत सन १९२१ मध्ये हीटलरने 'नॅशनल सोशलिस्ट जर्मन र्वकर्स पार्टी' हे एक दल स्थापन केले. हयाचे संक्षिप्त रूप 'नाझी' आहे. समाजातील सर्व संस्थापेक्षा राज्यसंस्था ही सर्वश्रेष्ठ संस्था आहे व राज्याची सत्ता सार्वभौम व अनियंत्रित असते. राज्यासाठी व्यक्ती असतात. सन १९२४ मध्ये 'माझा लढा' (माईन काम्फ) हे आत्मचरित्र लिहून हीटलरने पक्ष व त्याची उद्दिष्टे पुस्तकात नमूद केली आहेत. हा ग्रंथ नाझी पक्षाचे बायबलच आहे. सन १९२९ ची आर्थिक मंदी : उत्पादन घटल्यामुळे बाजारपेठेत वस्तूंची वाढ झाली नाही. जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रचंड दडपण आले. या आर्थिक मंदिने जर्मनीला ग्रासले होते. दिवाळीखोर, उपसमार यांचे थैमान चालू होते. न्यूर्यॉक शेअर बाजारात भाव गडगडले. या पार्श्वभूमीवर हीटलरचा नाझी पक्ष जोम धरू लागला. १९३० च्या निवडणुकीत राईशमध्ये (संसद/विधिमंडळ) नाझी पक्षाने बळ १२ वरून १०७ वर गेले. जर्मनीमधील लोकसत्ताक सरकारचे आसन डळमळीत झाले. ३० जानेवारी १९३३ रोजी हिंडेनबर्गने हीटलरला चॅन्सलर नेमले. न्यू डील : जागतिक आर्थिक मंदीमुळे अमेरिकेचीही दर्ुदशा झाली. निवडणुकीत डेमोकेटिक पक्षाचा विजय होऊन फ्रॅक्लीन डी. रूझवेल्ट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. आर्थिक पुनर्निर्माण आणि समाजकल्याण यासाठी त्यांनी जो कार्यक्रम वाढले. तरीही सन १९३९ मध्ये बेरोजगारांची संख्या नव्वद्र लाखांच्या घरात होती. मंदीच्या काळात जगातील काही भागात भूकबळी पडत होते, तर काही भागात गहू जाळावा लागला. प्रमुख घटना: (अ) स्वातंत्र्य आंदोलन : (१) तर्कस्थानात क्रांती झाली. राष्ट्रीय आंदोलनाने जेते राष्ट्रांचे वर्चस्व थोपविले. ग्रीस व रशियाच्या खालसा धोरणाला आळा घातला. समाजसुधारणा व आधुनिकीकरण केले. (२) चीनमध्ये चंग-कै-शेकच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय आंदोलन चालू होते. (३) सन १९१२ मध्ये स्थापन झालेल्या दक्षिण आफि्रकी संघाने आंदोलनाचे दृढीकरण केले. (४) सन १९२७ मध्ये इंडोनेशियात डच शासनाशी संघर्ष करण्यासाठी 'नॅशनल पार्टी' संघटित झाली. (५) कोरीया, ब्रह्यदेश, हिंदुस्थानादी देशांत स्वातंत्र्य चळवळींना जोर आला होता. (६) इंग्लंडमध्ये १९२९ मध्ये प्रथम मजूर पक्षाचे मंत्रिमंडळ आले. (आ) आक्रमणे : (१) जपानने मांचुरियावर आक्रमण केले. (१९३३) (२) इटलीने इथिओपियावर १९३५ मध्ये आक्रमण केले. (३) स्पेनमध्ये यादवी युध्द माजले. जर्मनी व इटली या देशांनी जनरल फ्रॅन्कोला पाठिंबा दिला होता. हुकुमशहा विरुध्द परजातंत्र असे युध्दाचे स्वरूप होते. सन १९३९ मध्ये फॅसिस्टांनी परजातंत्रावर विजय मिळविला. (४) १९३६ मध्ये हीटलरचे सैन्य र्‍हाइनलॅंडमध्ये शिरले. तुष्टीकरणाचे धोरण (ऋेल्च्य् िेफ छेन्च्ल्ाित्ेिन्) - तुष्टीकरण म्हणजे एका राष्ट्राचा बळी घेऊन आक्रमकांशी संगनमत करणे होय. तुष्टीकरणाच्या धोरणाने फॅसिस्टांचे बळ वाढले. दुसर्‍या महायुध्दाला प्रारंभ झाला. इंग्लंडचा पंतप्रधान चेंबर्लेन हयाच्या तुष्टीकरण नीतीमुळे जर्मनीचे फावले. १ सप्टेंबर १९३९ रोजी पोलंडमधील वॉर्सा शहरावर हल्ला झाला.

औद्योगिक क्रांती

कमी खर्चात अधिक वस्तुनिर्मिती करून अधिक नफा वाढविणे हया अर्थ-व्यवस्थेतून औद्योगिक क्रांती झाली. भांडवलात भर पडत गेली. सुमारे १७५० मध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली. वस्तुनिर्मितीसाठी माणसे व जनावरे यांचे बदली यंत्रांचा वापर होऊ लागल्यामुळे औद्योगिक क्रांतीने ''यंत्र युगा''लाच प्रारंभ झाला. सन १७५० पूर्वी नांगर, हवा-पंप छपाई यंत्र, हातमाग अशी यंत्रे होती. विविध प्राचीन संस्कृती जुन्या यंत्रांना नवीन साज देण्यात प्रयत्नशील होत्या. परंतू १७५० नंतर वेगाने संशोधन होऊ लागले. लोकांच्या जीवनात अती वेगाने बदल होऊ लागला. लोकांच्या राहणीमानाबरोबर त्यांच्या वैचारिक दृष्टिकोणात परिवर्तन होऊ लागले. कुशल कारागिरांच्या संघटनांमुळे ''घरगुती डेम्एस्त्च्'ि' उत्पादन होत असे. अठराव्या शतकात ''घरगुती'' व्यवहाराच्या जागी ''कारखानदारी''(फ्ाच्त्ेरय् श्य्स्त्एम्)आली. कारखान्यात उत्पादन होऊ लागले. साध्या अवजारांऐवजी यंत्रे आली. कारागिरांना एका छपराखाली आणून भांडवलदार गरजेप्रमाणे साधनपुरवठा करत. पक्का माल, कामगारांचा पगार या सर्व गोष्टींवर नियंत्रण भांडवलदारांचे असे. कारखानदारी पध्दतीतून औद्योगिक क्रांती झाली. इंग्लंडमध्ये प्रारंभ : आठराव्या शतकात सर्व प्रकारच्या (गुलामांसह) व्यापारात आणि संपत्ती संचयामध्ये इंग्लंडला प्रतिस्पर्धी नव्हता. सर्वदूर पसरालेल्या वसाहतीतून इंग्लंडला कच्चा माल मिळे. भू-दास पध्दत नष्ट झाल्यामुळे लोकांचा शेतजमिनीशी संबंध राहिला नाही; कोणतेही कष्टाचे काम करावयास माणसे मोकळी झाली होती. अठराव्या शतकातील कुंपण, आवार आंदोलनामुळे (एन्च्ल्ेस्ुरए म्ेव्एम्एन्त्) बडे जमीनदार आपल्या मालकीच्या शेतजमिनीचे एकीकरण करू लागले. छोटे जमीनदार हाकलले गेले आणि शेती-विना बेकार शेतकर्‍यांची फौजच निर्माण झाली. कारखान्यात काम करण्यासाठी मजुरांचा तुटवडा नव्हता. सरकार स्थिर झाले. व्यापार्‍यांना राजकीय सत्ता मिळू लागली. विशेषत्वाने लोखंड व कोळशाच्या खाणी इंग्लंडमध्ये विपुल होत्या. नावाबांधणीच्या उद्योगामुळे वाहतूक समस्या नव्हती. इतर देशांच्या तुलनेने इंग्लंड देशाला ही अनुकूल परिस्थिती होती. वस्त्रोद्योग, शेती व वाहतूक या क्षेत्रात नवीन यंत्रांचे शोध लागले, नवीन तंत्रे आली (शोधांची माहिती अन्यत्र असल्यामुळे दिली नाही. शोध लक्षात घ्यावे.) यांत्रिक युगामुळे पन्नास वर्षात इंग्लंड जगातील अग्रेसर औद्योगिक राष्ट्र बनले. सन १८३३ ते१८५५ या कालावधीत हिंदुस्थानमध्ये इंग्लंडचा कपडा ५० हजार किलोग्रॅम वरून २|| दशलक्ष किलोग्रॅमपर्यंत वधारला. कोळसा उत्पादन व निर्यात १५ दशलक्ष वरून ६४ दशलक्षावर गेले. भट्टीतील लोखंडाचे उत्पादन ६ लक्ष ९० हजार टनावरून तीन दशलक्षापर्यंत गेले. राष्ट्राराष्ट्रातच चुरस : १८५० पासून तीस-पस्तीस वर्षाच्या कालावधीत फ्रान्स, जर्मनी, रशिया, अमेरिका व जपान या देशांमध्ये औद्योगिक क्रांती होऊ लागली. औद्योगिक क्रांतीचे परिणाम :- १. सुख आणि समृध्दी : औद्योगिक क्रांतीने मानवी जीवन सर्वस्वी बदलून टाकले. मोटारगाडी, रेल्वे, विमान, टेलिफोन, टेलिव्हिजन यांसारख्या साधनांनी क्रांतीपूर्व काळातील मानवाचे कष्ट कमी झाले. २. कारखानदारीचा उद्य : नवनव्या यंत्रांच्या शोधामुळे युरोपात चाललेले गृहोद्योग बंद पडले आणि घरी आपल्या कसबाने वस्तूंचे उत्पादन करणारा कारागीर आता कारखान्यात कामगार म्हणून राबू लागला. यंत्रावरील उद्योग चालविण्यासाठी आवश्यक असणारा पैसा कामगारांजवळ नव्हता. साहजिकच उद्योगपतींनी या संधीचा फायदा उठविला. त्यांनी धाडसाने भांडवल गुंतवून कारखाने उभारले. हजारो कामगार आपल्या नियंत्रणाखाली कामाला लावूण वस्तूंचे उत्पादन सुरू केले. लवकरच एका उद्योगातील नफा दुसर्‍या उद्योगात गुंतवीत गुंतवीत समाजात कारखानदारी ही शक्ती त्यांनी उद्यास आणली. ३. शहरांची वाढ : औद्योगिक क्रांतीच्या काळात काही जुन्या शहरांची वाढ झाली तर काही नवी शहरे वसून ती वाढीस लागली. प्रथम कारखाना निघे नंतर कामगारांच्या वस्त्या तयार होत आणि पुढे तेथे हळूहळू अनेक लहान-मोठे व्यवसाय उभारले जात. ४. लोकसंख्या वाढली व ती शहरांकडे वळली : औद्योगिक क्रांतीने शेतमालाचे व इतर वस्तूंचे उत्पादन वाढले. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक गुणकारी इलाजांनी समाजातील मृत्युचे प्रमाण घटले. स्वाभाविकच लोकसंख्या वाढू लागली. खेडयापाडयांतील व्यवसाय बंद पडल्याने कारागिरांची बेकारी वाढली. शेतावरही लोकांची उपजीविका चालेना. तेव्हा कामासाठी लोक शहराकडे वळले. ५. शहरांतील कामगारांची दैन्यावस्था : खेडयातून कामगार शहरात आल्यावर जागेची टंचाई, अशुध्द हवा आणि गर्दी या समस्यांना त्याला तोंड द्यावे लागले. कारखान्याभोवती कामगारांच्या वसत्या पूर्वनियोजन न करता वाढत असत. घरमालकांनी कमीत कमी जागेवर कमीत कमी पैशात घरे बांधलेले असत. त्यामुळे कामगार वस्तीत गलिच्छ व कोंद्रट वातावरण निर्माण होई. अरुंद रस्ते, घाणीचे ढीग, त्यातून येणारी दुर्गंधी,डोक्यावरील हवेत गिरण्यांचा धुर आणि राहावयास खुराडया सारखी घरे यामुळे कामगारच्या आरोग्यावर विघातक परिणाम होई. ६. कामगारांवरील अत्याचार : कारखाने फार अस्वच्छ असत. कोंद्रट हवेत व अपुर्‍या प्रकाशात कामगार काम करीत असे. अशा कारखान्यात त्यांची जबर पिळवणूक केली जाई. कामाच्या ठिकाणी त्याच्यावर कडक शिस्तीचा बडगा सारखा उगारलेले असे. स्त्रिया व लहान मुले यांना अमानुष रीतीने वागविले जाई पुरूष कामगारांपेक्षा स्त्री कामगारांना किंवा मुलांना कमी पगार दिला जाई ७. वस्तुनिर्मितीचा आनंद नष्ट झाला : औद्योगिक क्रांतीने उद्यास आलेल्या कारखानदारीत कामगार हा जणू एक यंत्राचा भाग बनला. श्रमविभागणीच्या तत्त्वानुसार वस्तूच्या निर्मितीमधील एखादा भागच तो वर्षानुवर्षे करीत असे. ठरावीक साचाच्या या कामामुळे त्याच्यावर मानसशास्त्रीय गंभीर परिणाम होत असे. शिवाय एखाद्री वस्तू पूर्णपणे आपण तयार केली, असा जो पूर्वी त्याला आंनद होत असे, तो या कारखाना पध्दतीत नाहीसा झाला. त्याचे जीवन नीरस व यंत्रासारखे झाले. ८. राष्ट्रांचे परावलंबन वाढले : क्रांतीपूर्व काळात जगातील राष्ट्रे फारशी परावलंबी नसत; परंतु इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी यांसारख्या राष्ट्रांत कारखानदारीचा उद्य झाल्यावर त्यांना अनेक तर्‍हेचा माल बाहेरून आयात करावा लागू लागला. हे खरे की, ही राष्ट्रे प्रचंड प्रमाणात तयार माल निर्यात करीत असत; परंतु त्याचबरोबर अनेक जीवनावश्यक गोष्टींबाबत त्यांना दुसर्‍या देशांवर अवलंबून राहावे लागे. अशा परिस्थितीत एखाद्री राजकीय क्रांती अथवा युध्द सुरू झाल्यास अशा आयात-निर्यातीच्या व्यापार्‍यास धोका उत्पन्न होई व त्यावर अवलंबून असणारे उद्योग धंदेही धोक्यात येत. ९. भांडवलशाहिचा उद्य आणि विकास : कारखान्यांची स्थापना करणे व ते कार्यक्षमतेने चालविणे, हे सामान्य कामगारांच्या आवाक्यातील काम नव्हते. साहजिकच युरोपियन समाजात अस्तित्वात असलेला उद्योगपती व व्यापारी वर्ग हाच आता कारखानदार वर्ग बनला. परिणामी युरोपियन राष्ट्रांमध्ये बडया भांडवलदारांचा एक प्रबळ वर्ग निर्माण झाला. १०. युरोपियन साम्राज्यवादास चालना : औद्योगिक क्रांतीच्या दुसर्‍या पर्वात, विशेषत: सन १८८० ते १९१० या कालखंडात युरोपियन साम्राज्यवादास मोठी चालना मिळाली. मागील तीनशे वर्षात युरोपियन साम्राज्यवादीची जेवढी वाढ झाली होती त्याहुन अधिक वाढ या तीस वर्षात झाली. या प्रचंड वाढीमागे औद्योगिक क्रांतीची शक्तीच काम करीत होती. कोळसा व लोखंड यासारखी खनिजे आणि इतर कच्चा माल ही या कारखानदारीची मुख्य गरज होती. तसेच तिच्यातून तयार होणार्‍या प्रचंड पक्का मालास हमखास बाजारपेठा या औद्योगिक गरजेतून युरोपाबाहेरील प्रदेशांवर वर्चस्व स्थापन करण्याची युरोपियन राष्ट्रांंची साम्राज्यवादी स्पर्धा दिवसेंदिवस अधिक तीव्र बनत गेली. एवढे मोठे आफि्रका खंड, पण अवघ्या तीस वर्षात ते पूर्णपणे युरोपियन साम्राज्यवादाच्या वर्चस्वाखाली गेले. अशा तीव्र साम्राज्य स्पर्धेतून अतिरेकी लष्करीकरण व युध्दे अटळ ठरली.

Thursday, 18 July 2013

पहिले महायुध्द

आधुनिक जगाच्या इतिहासात पहिले महायुध्द ही अत्यंत महत्त्वाची घटना समजली जाते. हे महायुध्द सन १९१४ साली सुरू झाले आणि १९१८ साली संपुष्टात आले. पूर्वी कधी झाला नव्हता असा मानवाच्या जीविताचा व विज्ञ्ल्त्;ााचा संहार या युध्दात घडून आला. युरोपातील बाल्कन प्रदेशातील बोस्निया नावाच्या एका प्रांताच्या राजधानीच्या ठिकाणी ऑस्ट्रियाच्या युवराजाचा व युवराज्ञम्प्;ीचा खून झाला आणि पहिल्या महायुध्दाची ठिणगी पडली, या ठिणगीने युरोपात व पर्यायाने सर्व जगात महायुध्दाचा स्फोट घडवून आणला आणि जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्रे व देश या संघर्षात ओढले गेले. कारण युरोपियन राजकारणाच्या तळाशी होती. पहिल्या महायुद्धाची कारणे १. अतिरेकी राष्ट्रवाद : एकोणिसाव्या शतकात युरोपात राष्ट्रवादी भावनेची खूपच वाढ होती. राष्ट्रवाद जेव्हा आक्रमक बनतो, तेव्हा त्याचे स्वरूप साम्राज्यवादी बनते.पहिल्या महायुध्दापूर्वी युरोपात जवळ जवळ सर्व राष्ट्रांमध्ये अशा प्रकारचा अतिरेकी राष्ट्रवाद उद्यास आला होता. २. वसाहती मिळण्यासाठी स्पर्धा : एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि पहिल्या महायुध्दाच्या पूर्वी युरोपियन राष्ट्रांमध्ये जी साम्राज्यस्पर्धा चालली होती ती जागतिक परिस्थित स्फोटक करण्यात खरी जबाबदार होती. कच्च्या मालाचा पुरवठा करणार्‍या आणि पक्का माल विकत घेणार्‍या वसाहती अधिकाधिक मिळविण्यासाठी इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड, स्पेन, जर्मनी, इटली, रशिया इत्यादी राष्ट्रांत स्पर्धा सुरू होती. ज्या राष्ट्राकडे मोठमोठया वसाहती ते राष्ट्र समर्थ आणि श्रीमंत बनते, हे समीकरण पाहून जर्मनी व इटली ही राष्ट्रेही वसाहती मिळविण्याची धडपड करीत होती. ३. आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभाव : आज जसे राष्ट्राराष्ट्रांमधील व्यवहार नियमित करणारे आंतरराष्ट्रीय कायदे आहेत, तसे ते पहिल्या महायुध्दापूर्वी नव्हते. प्रत्येक राष्ट्र स्वत: ला सार्वभौम आणि वाटेल तसे वागावयास मोकळे आहे. असे समजत असे. स्वाभाविकच आंतरराष्ट्रीय जगतात. 'बळी तो कान पिळी' हा न्याय प्रस्थापित झाला होता. ४. आंतरराष्ट्रीय राजकारणामधील गुप्तता : बिस्मर्कच्या काळापासून आंतरराष्ट्रीय राजकारणात एक प्रकारची धास्ती आणि अस्वस्थता निर्माण झाली होती. युरोपातील प्रत्येक राष्ट्राला दुसर्‍या राष्ट्रांच्या सामर्थ्याची भीती वाटत होती. परिणामी युरोपियन राष्ट्रांमध्ये अनेक लष्करी करार घडून आले. हे लष्करी करार अत्यंत गुप्त राखले गेल्यामुळे तर आंतरराष्ट्रीय राजकारण अधिकच गढूळ आणि युध्दाच्या स्फोटाला अनुकूल बनले. ५. संघ-प्रतिसंघ योजना : फ्रान्सच्या संभाव्य आक्रपणापासूनच जर्मनीचे संरक्षण करण्यासाठी बिस्मर्ाकने सन १८८२ साली जर्मनी, ऑस्टि्रया-हंगेरी आणि इटली या तीन राष्ट्रांचा एक करार-त्रिराष्ट्र मित्रकरार(टरप्ल्एि अल्ल्ािन्च्ए)घडवून आणला होता. फ्रान्स. इंग्लंड व रशिया ही राष्ट्रे परस्परांमधील हेवेदावे व शत्रुत्व विसरून जर्मनीच्या आक्रमण धोरणाविरुध्द एक झाली आणि सन १९०७ साली या राष्ट्रांचा त्रिमित्रसंघ(टरप्ल्एि श्र्न्त्एन्त्ए)अस्तित्वात आला. युरोपात हे संघ-प्रतिसंघ निर्माण झाले होते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात दोन लष्करी गटच तयार झाले होते. हे गट परस्पांविषयी संशयी असल्याने त्याच्या समजूतदारपणा निर्माण होणे अशक्य होते. ६. अतिरेकी लष्करीकरण : राष्ट्रराष्ट्रांमधील भीती आणि संशय यामुळे युरोपात सर्वत्र लष्करीकरणाची जोरदार तयारी सुरू झाली होती. युरोपातील प्रत्येक राष्ट्र भूदल आणि आरमार यांची संख्या व सामर्थ्य वाढवू लागले होते. ७. युरोपातील लोकमत आणि वृत्तपत्रे : पहिल्या महायुध्दापूर्वी युरोपातील वृत्तपत्रे अतिरेकी राष्ट्रवादाच्या आहारी जाऊन आपापल्या देशातील लोकमत युध्दात अनुकूल बनवत होती. प्रतिस्पर्धी राष्ट्रासंबंधी विकृती व अतिरंजित बातम्या देऊन वृत्तपत्रांनी आपल्या वाचकांच्या भावना भडकविण्याचा केलेला मोठा प्रयत्न युध्दात वातावरणानिर्मितीसाठी पोषक ठरला. ८. बाल्कन समस्या : युरोपातील बाल्कन प्रदेशात अनेक राष्ट्रांचे गुंतागुंतीचे हितसंबंध निर्माण झाले होते. प्रामुख्याने ऑस्टि्रया व रशिया या दोन राष्ट्रांचे बाल्कन प्रदेशात आपापले वर्चस्व निर्माण करण्याची स्पर्धा सुरू होती. ऑस्ट्रियाने सन १९०८ साली हे दोन्ही प्रांत आपल्या साम्राज्यात विलीन करून टाकले, तेव्हा बाल्कनमधील समस्या अधिकच गंभीर बनली. हे दोन प्रांत स्लाव वांशिक असल्याने सर्बियाला ते हवे होते. या प्रकरणावरून ऑस्टि्रया व सर्बिया यांच्यातील वैमनस्य वाढत गेले आणि त्याचा स्फोट युध्दाच्या रूपाने झाला. ९. जर्मनी व फ्रान्स यांच्यामधील वितुष्ट : सन १८७०-७१ च्या फ्रॅको-जर्मन युध्दात फ्रान्स पराभूत होऊन जर्मनीने त्याच्या कडून अल्सेस व लोरेने हे दोन फ्रेंच हिसकावून घेतले. त्यामुळे भावनावश फ्रेंच व्यथित व संतप्त झाले होते. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी त्यांनी जर्मनीविरोधी सूडाची भावना सतत प्रज्वलित ठेवली होती. १० . कैसर विल्यमची महत्त्वांकाक्षा : जर्मनीच्या सम्राटाची, कैसर विल्यम दुसरा याची महत्त्वाकांक्षा पहिल्या महायुध्दास बर्‍यास प्रमाणात कारणीभुत ठरली. इंग्लंडच्या श्रेष्ठ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या त्याला हेवा वाटत होता. असा दर्जा मिळवून सर्व जगात जर्मन राष्ट्र श्रेष्ठ आंतरराष्ट्रीय दर्जाचा त्याला हेवा वाटत होता. असा दर्जा मिळवून सर्व जगात जर्मन राष्ट्र. श्रेष्ठ व प्रबळ व्हावे ही त्याची महत्त्वाकांक्षा होती. ही महत्त्वाकांक्षा पुरी करायची तर इंग्लंडशी संघर्ष अपरिहार्य आहे, मग त्या संघर्षात जर्मनीचा पराभव झाला तरी चालेल, असे त्याचे मत होते. ११. तात्कालिन कारण : २८ जून १९१४ रोजी ऑस्ट्रियाचा युवराज व युवराज्ञम्प्;म्प्;ााी यांच्या बोस्नियाच्या राजधानीत एका सर्बियन राष्ट्रवाद्याने केलेला खून हे पहिल्या महायुध्दाला निमित्त ठरले. हा खून सर्बियाच्या चिथावणीनेच झाला, अशी ऑस्ट्रियाने भुमिका घेऊन त्याने ४८ तासांच्या मुदतीचा एक निर्वानीचा खलिता सर्बियाकडे पाठविला. सर्बियाने सबुरीने वागण्याचा खूप प्रयत्न केला. पंरतु ऑस्ट्रियाच्या ताठर भूमिकेमुळे शेवटी सर्बियाशी त्याचे युध्द सुरू झाले (२८ जुलै १९१४). युध्दाचा वणवा सर्वत्र पसरला : बाल्कनमध्ये पडलेल्या या ठिणगीने फक्त ऑस्टि्रया-हंगेरी आणि सर्बिया यांच्या मध्येच युध्द न भडकता ते सर्व युरोपभर, नव्हे सर्व जगभर, पसरले. रशिया बाल्कनमधील स्लावांचा पाठीराखा व ऑस्ट्रियाचा कट्ट्र शत्रू होता. त्याने लष्करी हालचाली सुरू करता व ऑस्ट्रियाचा पाठीराखा जर्मनी याने रशियाविरुध्द युध्द पुकारले. फ्रान्स हा रशियाशी कराराने बध्द झाल्यामुळे जर्मनीने त्याच्याशीही युध्द पुकारले (३ ऑगस्ट १९१४). दरम्यान जर्मंनीने फ्रान्सवर हल्ला करण्यासाठी बेल्जियम या तटस्थ राष्ट्राच्या प्रदेशातून आपल्या फौजा घुसविल्या. जर्मनीने आंतरराष्ट्रीय कराराचा अशा प्रकारे भंग केल्याचे पाहून इंग्लंडने त्याच दिवशी त्याच्या विरुध्द युध्दात उडी घेतली (४ ऑगस्ट १९१४). इंग्लंडच्या सुरक्षितेसाठी बेल्जियमचे स्वातंत्र्य अबाधित राहणे आवश्यक आहे, असे ब्रिटिशांना वाटत होते. त्रिराष्ट्र मैत्री - करारान्वये इटली हा ऑस्टि्रया व जर्मनी यांच्या सहाय्यास जावयास हवा होता. परंतु तो स्वार्थी हेतूने वागला. प्रथम तटस्थ राहून शेवटी आपल्या जुन्या मित्रांविरुध्द फ्रान्स-इंग्लंड यांना तो मिळाला (सन १९१५). पश्चिम ऑस्ट्रियामधील इटालियन भाषिक प्रदेश प्राप्त करून घ्यायचा इटलीचा उद्देश होता. जपान हा इंग्लंडचा दोस्त त्याने पूर्वेकडे जर्मनी विरुध्द युध्द पुकारून जर्मन वसाहती ताब्यात घेण्याचा सपाटा लावला. युध्द चालू असताना युरोपातील व युरोपाबाहेरील अनेक देश या युध्दात ओढले गेले. जर्मन पाण्यबुडयांनी अमेरिकन जहाजांवर केलेल्या बेदरकार हल्ल्यांमुळे अमेरिकेनेही जर्मनीविरुध्द युध्द पुकारले (एप्रिल १९१७). अमेरिकेसारखी प्रबळ लष्करी शक्ती दोस्तांच्या बाजूने उभी राहिल्यामुळे युध्दामधील त्यांचे पारडे जड झाले. पहिल्या महायुध्दाचे परिणाम : १. जिवीत आणि वित्त यांची हानी : या युध्दात पृथ्वीवरील मानवाची जीवित व वित्त हानी प्रचंड प्रमाणावर झाली. १० दशलक्ष सैनिक ठार झाले. युध्द चालू असताना रोज ६ हजार सैनिक ठार होत होते. या शिवाय २० दशलक्ष सैनिक अपंग अथवा जबर जखमी झाले. युध्द चालू असता दर तासाला १० दशलक्ष डॉलर्स संपत्तीचा चुराडा होत होता. २. शस्त्रास्त्रांची वाढ : या महायुध्दाच्या काळात जगातील युध्दखोर राष्ट्रांनी आपापल्या देशांतील शास्त्रज्ञम्प्;ांना व संशोधकांना युध्दसाहित्याच्या संशोधनाच्या कामाला जुपंले. अधिकाधिक मनुष्यसंहार करणारी शस्त्रे संशोधक तयार करू लागले. ३. सर्व समाज ढवळून निघाला : या युध्दासारखे युध्द पूर्वी पृथ्वीतलावर केव्हाच खेळले गेले नव्हते. सतत पाच वर्षे जगातील अनेक युध्द- आघाडयांवर मनुष्यसंहार होत राहिला. लक्षावधी सैनिक ठार झालेच, परंतु त्यांच्या कुटुंबियाचे जीवनाही उद्ध्वस्त झाले. लाखोंच्या कपाळी अपंगत्व आले. लाखो घरांत निराशेचा अंधार पसरला. असे फक्त पराभूत राष्ट्रांतच झाले असे नाही, तर विजयी राष्ट्रांचे नागरिकही असेच होरपळून निघाले. हे युध्द सर्वस्पर्शी झाले. ४. युध्दप्रचार तंत्रचा विकास : आपल्या बाजूच्या राष्ट्रांतील व जगातील लोकमत सतत आपल्या बाजूने राहावे यासाठी उभय पक्षांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यामुळे युध्दप्रचार हे एक तंत्र म्हणून उद्यास आले. या तंत्राचा वापर दोन्ही पक्षांनी बेजबाबदारपणे केला. ५. जर्मनीला मिळालेली शिक्षा आणि तिचे परिणाम : व्हर्साचा तह दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवर लादलेला होता. तह स्वीकारा अन्यथा जर्मनीवर पुन्हा आक्रमण करण्यात येईल, अशी धमकी दिल्यावरच जर्मन सरकारने तो स्वीकारला होता. व्हर्सायच्या तहाने जर्मनीचा १|१० प्रदेश हिरावून घेण्यात आला. जर्मनीची अशी लांडगेतोड केल्यामुळे या तहाने फ्रान्सपेक्षाही छोटा देश बनला. तसेच जर्मनीचे जवळ जवळ सर्व व्यापारी व लष्करी आरमार विजयी राष्ट्रांनी हिसकावून घेतले. या अपमानास्पद अटीमुळे जर्मनांची जगात मोठी अवहेलना झाली. त्यांच्या अर्थव्यवस्थेवे कंबरडे मोडले. त्यांचा लोकशाहिचा प्रयोग अयशस्वी झाला आणि जर्मन लोकशाहीच्या नाशातून हीटलरसारखा हुकुमशहा उद्यास आला. ६. इटलीची निराशा व तिचे परिणाम : इटलीने जर्मनी-ऑस्टि्रया यांच्या गोटाचा त्याग करून दोस्तांच्या बाजूने या युध्दात उडी टाकली होती. इतर राष्ट्रांप्रमाणेच इटलीची मोठी जीवित व वित्त हानी झाली होती. पराभूत राष्ट्रांच्या वसाहतीपैकी इटलीला काहीही देण्यात आले नाही. पॅरिस परिषदेत इंग्लंड, फ्रान्स व अमेरिका या बडया राष्ट्रांच्या नेत्यांनी इटलीचा पंतप्रधान ऑरलॅंडो याची अवहेलनाच केली. परिणामी तो परिषदेतून मधूनच उठून गेला. या सर्वाचा परिणाम इटालियन समाजावर झाला. दोस्तांनी आपणास फसविले, ही भावना इटलीमध्ये दिवसेंदिवस वाढीस लागली. पॅरिस परिषदेमधील इटलीच्या अपयशाचे खापर इटालियन लोकांनी आपल्या सरकारवर फोडले व पुढे हे लोकशाहीवादी सरकार गडगडून त्याच्या जागी मुसोलिनी हा हुकुमशहा उद्यास आला. जर्मनीमधील हीटलर व इटली मधील मुसोलिनी यांचा उद्य म्हणजे पहिल्या महायुध्दाचे सर्वांत वाईट परिणाम होत. ७. एक बलाढय शक्ती म्हणून अमेरिकेचा उद्य : पहिल्या महायुध्दाचा एक मोठा परिणाम म्हणजे जागतिक राजकारणात अमेरिकेचा एक बलाढय शक्ती म्हणून झालेला उद्य हा होय. ८. राष्ट्रसंघाची निर्मिती : प्रचंड मनुष्यसंहार व वित्ताचा नाश हे महायुध्दाचे भयंकर परिणाम होत. अशा प्रकारचे युध्द पुन्हा खेळले जाऊ नये, राष्ट्राराष्ट्रांमधील मतभेद सामोपचाराने मिटविले जावेत व जग हे सुरक्षित राहावे, यासाठी प्रे. विल्सनच्या राजकीय तत्त्वज्ञानानुसार बडया राष्ट्रांनी राष्ट्रसंघाची निर्मिती केली.

अश्मयुग

मानवाच्या उत्क्रांतीत मानवाने त्याच्या सर्वत्र पसरलेल्या अश्माचा तंत्रज्ञान म्हणुन उपयोग केला. यानंतर अखेरीस शेतीचा विकास, माणसाळलेले प्राणी पाळले व तांब्याची निर्मिती होईल अशा मातीचा शोध लावला. या अश्मयुगात फार मोठया प्रमाणावर हवामानाचा व अन्य गोष्टींचा बदल होत गेला, आणि त्याचा परीणाम मानवाच्या उत्क्रांतीवर झाला, आणि काळाबरोबर मानवाने शिकारी साठी कुत्रे सोबत घेतले, शेतीची सुरुवात : पर्यावरणाच्या बदलामुळे मानवाला नविन अन्नाची गरज भासु लागली. अश्म युगाचा उत्तरार्ध : अश्मयुगाच्या उत्तरार्धात शेतीला खर्‍या अर्थाने सुरुवात केली, त्याला अश्मयुग उत्तरार्ध क्रांती असे म्हणतात. या नंतर यात मांतीची भांडी व अन्य साहित्य बनविण्याचा विकास करण्यात आला. अश्मयुगातील उत्तरार्ध संस्कृतीची सुरुवात ख्रिस्तपुर्व ८००० मध्ये झाली. पिकावर प्रकि्रया व ते वाहुन नेण्याची गरज मानवाला भासु लागली. यात भरडणे, तासणे, तोडणे, कापणे याला लागणार्‍या साहित्याचा समावेश करण्यात आला. अन्न आणि पेय : अश्म युगात मानव हा अन्न म्हणुन प्राण्यांचे अवयव खात असे, त्यात मांस, यकृत, मुत्रपिंड, मेंदु यांचा समावेश होता, १८००० ते ९००० या काळात आशिया, उत्तर अमेरीका, ऑस्ट्रेलिया व युरोप येथे मोठया प्रमाणावर सस्तन प्राण्यांचा नाश झाला. राष्ट्रीय भौगोलिक आशयानुसार मानवाने अश्मयुगाच्या उत्तरार्धात जंगली द्राक्षापासुन पहिले मद्य बनविले. ते मद्य हे प्राण्यांच्या कातडीत किंवा लाकडापासुन ओबडधोबड बनविलेल्या कपात पित असत.

महाराष्ट्र राज्याची स्थापना

१ नोव्हेंबर १९५६ च्या राज्य पुर्नरचना कायद्यानुसार तत्कालीन मुंबई राज्याची पुर्नरचना करण्यात येऊन द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये कच्छ आणि सौराष्ट्र यांचा समावेश करण्यात येऊन हैदराबाद संस्थानच्या अखत्यारीतील मराठी भाषिकांचा मराठवाडा हा भाग आणि मध्यप्रदेश राज्यातील विदर्भ हा भाग अंतर्भूत करण्यात आले. याच वेळी बेळगाव, विजापूर, कानडा आणि धारवाड जिल्हयांतील कन्नड भाषिक प्रदेश मुंबई राज्यातून वेगळा करुन तत्कालीन म्हैसूर राज्यात अंतर्भूत करण्यात आले व बनासकांठा हा तालुका राजस्थान राज्यात समाविष्ट करण्यात आला. महाराष्ट्र्र राज्य १ मे १९६० रोजी अस्तित्वात आले. त्यापुर्वी १ नोव्हेंबर १९५६ रोजी व्दैभाषिक राज्य अस्तित्वात आले होते. त्यादिवशी महाराष्ट्र्रास मध्यप्रांतातुन विदर्भ व हैदराबाद राज्यातुन मराठवाडा हे जोडले गेले. आणि दक्षिण महाराष्ट्र्रातील बेळगाव, धारवाड, कारवार व कानडा हे चार जिल्हे म्हैसुर कर्नाटक राज्यास जोडले गेले. १९६० मध्ये महाराष्ट्र्र राज्य स्थापन होत असतानां कच्छ, सौराष्ट्र, गुजरात अलग होऊन गुजरात हे राज्य बनले. पण बेळगाव, धारवाड, कारवार हे बहुसंख्य मराठी भाषिक विभाग कर्नाटकातच राहीले. आजच्या महाराष्ट्र्रात पश्चिम किनारपट्टी, कोकण, कोकण, मध्य महाराष्ट्र्र, मराठवाडा व विदर्भ असे भाग येतात. मुंबई ही महाराष्ट्र्राची राजधानी आहे. भारतीय संघराज्यातील हे एक घटक राज्य असून राष्ट्रपतींनी नेमलेला राज्यपाल विधिमंडळाला जबाबदार असलेल्या मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्याद्वारे सल्ल्यानुसार शासनव्यवस्था पाहतो. विधिमंडळ द्विसदनी असून त्याची विधानसभा व विधानपरिषद अशी दोन स्वतंत्र गृहे आहेत. विधानसभेत २८८ निर्वाचित सभासद असून अॅंग्लो -इंडियन समाजातील आणखी एक सभासद राज्यपालांतर्फे नियुक्त करण्यात येतो. विधानपरिषदेत एकूण ७८ सभासद असतात. राज्यातून लोकसभेत ४८ सभासद निवडून दिले जातात व राज्यसभेत १९ सभासद महाराष्ट्र्रातून निवडले जातात. संकीर्ण महाराष्ट्र्र राज्याची स्थापना १ मे १९६०. महाराट्राचे स्थान पश्चिम भारत महाराष्ट्र्राचे अक्षांश १५.८० उत्तर ते २२.१० उत्तर महाराष्ट्र्राचे रेखांश ७२.६० पूर्व ते ८०.९०पूर्व. महाराष्ट्र्राच्या सिमा पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस दादरा नगर हवेली व गुजरात, उत्तरेस मध्यप्रदेश, पूर्वेस छत्तीसगड, आग्नेयेस आंध्र प्रदेश, दक्षिणेस कर्नाटक व गोवा. प्रादेशिक विभाग १) कोकण, २) खानदेश, ३) मराठवाडा, ४) विदर्भ प्रशासकीय विभाग १) मुंबई, २) औरंगाबाद, ३) नासिक, ४) नागपुर ५) पुणे, ६) अमरावती राज्याच्या सीमा व सीमावर्ती प्रदेश महाराष्ट्र्राच्या पश्चिमेस अरबी समुद्राचा सुमारे ७२० कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. या किनार्‍याचे उत्तरेकडुन दक्षिणेकडुन क्रमाने ठाणे, वृहनमुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील तेरेखोलची खाडी हे किनारपट्टीचे व राज्याचे दक्षिण टोक आहे. उत्तर टोकास ठाणे, नासिक, धुळे, नंदुरबार या जिल्हयांना लागुन महाराष्ट्र्राची सीमा आहे. त्यापलीकडे गुजरात राज्याचा भाग आहे. महाराष्ट्र्रच्या उत्तरेस मध्यप्रदेश हे राज्य आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपुर, भंडारा व गोंदिया या उत्तरेकडील जिल्हयांना लागुन मध्यप्रदेशची हद्द आहे. तसेच गोंदिया व गडचिरोली या जिल्हयांना लागून पुर्वेकडे छत्तीसगड राज्याची हद्द आहे. वेंगुर्ला व राज्यातील दक्षिणेकडील टोकापासुन राज्याची सीमा सर्वसामान्यपणे ईशान्यकडे जाते. मात्र चंद्रपुर जिल्हयाची दक्षिण सीमा उत्तरदिशेने गोंदियापर्यंत जाते. राज्याच्या दक्षिणेस व अग्नेयेस सिंधुदुर्ग जिल्हयाला स्पर्शकरून गोवा हे राज्य आहे. नादेंड , यवतमाळ, चंद्रपुर व गडचिरोली हया जिल्हयांना स्पर्शकरून आंध्रप्रदेश आहे. उत्तरेकडील जिल्हा नंदुरबार दक्षिणेकडील जिल्हा कोल्हापुर पुर्वेकडील जिल्हे भंडारा, गडचिरोर्ली पश्चिमेकडील जिल्हे ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, मुंबई उपनगर. पश्चिमेकडील राज्य गुजरात, अरबी समुद्र. महाराष्ट्र्राच्या पुर्वेकडील राज्य मध्यप्रदेश. महाराष्ट्र्राच्या उत्तरेकडील राज्य मध्यप्रदेश, गुजरात, दादरा नगर हवेली. महाराष्ट्र्राच्या दक्षिणेकडील राज्य आंध्रप्रदेश, कर्नाटक, गोवा.

About panchyat

भारतातील ग्रामीण भागातील स्थानिक संस्थांचे वर्णन पंचायती राज असे केले जाते. ग्राम पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिंषद हे पंचायती राज व्यवस्थेचे घटक आहेत. भारतातील बहुसंख्य लोक खेडयांमध्ये राहतात आणि त्यांना त्यांच्यावर परिणाम करणार्‍या निर्णयांमध्ये सहभागी होण्याची आवश्यकता असते. भारताने लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे आणि ग्रामीण भागातील जनतेची उन्नती झाल्याशिवाय देशाला प्रगती करता येणार नाही. ग्रामीण भागातील दारिद्रय दूर करणे आणि ग्रामीण जनतेचे शिक्षा, रोजगार आणि निर्णयप्रकियेत सहभाग याद्वारे त्यांचे सक्षमीकरण करणे अत्यंत महत्वाचे आहे. स्वातंत्र्याच्या लढयाच्या काळातच महात्मा गांधीनी ग्रामीण जनतेची अज्ञान व वंचितता यांपासून मुक्तता करण्याची आपली तीव्र इच्छा व्यक्त केली होती. भारताच्या राज्यघटनेने ग्रामपंचायती संघटित करून त्यांना लोकशाहीचे मूलभूत घटक बनविण्यासाठी पुरेशी सज्ञ्ल्त्;ाा देण्याचे बंधन राज्यावर घातले आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळात ग्रामीण विकासाचे विविध कार्यक्रम राबविण्यास शासनाने सुरूवात केली. त्यासाठी ग्रामीण स्थानिक संस्थांच्या पुर्नरचनेच्या संदर्भात शिफारस करण्यासाठी बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. तत्कालीन स्थानिक शासनाचा व कारभाराचा आढावा घेतल्यानंतर या समितीने त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्थेची शिफारस केली. महाराष्ट्र्र राज्य १ में १९६० रोजी अस्तित्वात आले. त्यानंतर महाराष्ट्र्रात पंचायती राज्याच्या संदर्भात वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. समितीच्या शिफारशींनुसार शासनाने महाराष्ट्र्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा मंजूर केला व १ में १९६२ पासून महाराष्ट्र्रात पंचायती राज पदधती सुरू झाली. महाराष्ट्र्रातील पंचायती राज्यव्यवस्था अनेक दृष्टीने वैशिष्टयपूर्ण आहे. उदा. जिल्हा हा नियोजन व विकासाचा महत्वाचा घटक मानण्यात आला. म्हणून जिल्हयाच्या पातळीवर असणार्‍या जिल्हा परिषदेला एकूण व्यवस्थेत महत्वाचे स्थान देण्यात आले. पंचायत समिती हा जिल्हा व ग्राम पंचायत यांना जोडणारा दुवा मानला आहे. ग्रामसभेला म्हणजेच स्थानिक पातळीवरील लोकांच्या मूलभूत संघटनेला, लोकशाही विकेंद्रीकरणाचे उददिष्ट साधण्यासाठी पुरेसे अधिकार देण्यात आले आहेत. स्थानिक संस्थांच्या प्रशासनावर राज्यशासनाचे नियंत्रण हे सुदधा महाराष्ट्र्रातील पंचायती राज व्यवस्थेचे आणखी एक वैशिष्ट मानले जाते.

महाराष्ट्रातील महापुरुष व समाजसुधारक


महाराष्ट्रातील महापुरुष व समाजसुधारक
शाहू राजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. शाहूंचे बालपणीचे नाव यशवंतराव होते. १७ मार्च १८८४ रोजी शाहूंचे दत्तकविधान व राज्यारोहण झाले. यशवंतरावाचे दत्तकविधानानंतर ‘शाहू महाराज’ असे नामकरण झाले. शाहूंनी आपल्या आयुष्यात जातीभेद निर्मुलन, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उद्धार, बहुजनांचा शैक्षणिक विकास, औद्योगिक प्रगती, शेतीचा विकास, धरणे, रस्ते ई. क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने उपेक्षित, वंचित समाजासाठी वापरली. त्यामुळे शाहू हे लोकांचे राजे झाले.


आरक्षणाचे प्रणेते-
मागासलेल्या वर्गाना प्रगतीच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे, अशी कल्पना महात्मा जोतिबा फुले यांनी मांडली.राजर्षी शाहूंनी आपल्या अधिकारांचा वापर करून ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली. ६ जुलै १९०२ रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० % जागा राखीव राहतील अशी घोषणा केली. त्याची त्वरित अंमलबजावणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेव्हा सामाजिक कार्यकर्ते म्हणवणाऱ्या अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. शाहुंवर अनेक प्रकारचे आरोप केले. परंतु वंचितांच्या विकासाचे व्रत घेतलेल्या शाहूंनी कशाचीही पर्वा न करता आपले धोरण चालू ठेवले.

तथाकथित गुन्हेगार जातींविषयी भूमिका-
जातव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला. परिणामी त्यांची सर्वच क्षेत्रात अधोगती झाली. त्यांचा सामाजिक दर्जा खालावला. समाजाकडून मिळणारी अन्याय्य वागणूक व उत्पन्नाचे काहीच साधन नाही अशा दुहेरी संकटात सापडलेल्या मागास, भटक्या जमातीतील अनेक लोकांनी पोटापाण्यासाठी चोऱ्या, दरोडे अशा गोष्टींचा आधार घेतला. तत्कालीन ब्रिटीश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहुराजांना या लोकांची कणव होती. शाहू खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी ही हजेरी पद्धत बंद केली. या जाती-जमातीतील लोकांना संघटीत करून गुन्हेगारी कृत्यांपासून परावृत्त केले. त्यांना नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार नेमले, रथावर वाहक नेमले. त्यांना घरे बांधून दिली. राहण्याची व पोटापाण्याची सोय झाली. शाहुराजांचे प्रेम मिळाले. त्यामुळे या लोकांनी गुन्हेगारी कारवाया सोडून देवून ‘माणूस’ म्हणून जगायला सुरुवात केली. गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करून समान सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच.

राजर्षी शाहू आणि स्त्रियांची स्थिती-
धर्मव्यवस्थेने स्त्रियांनाही अतिशय उपेक्षित ठेवले. त्यांचे हक्क-अधिकार नाकारले. स्त्रियांवर अनेक बंधने लादली.त्यामुळे स्त्रियांची एकंदर सामाजिक अधोगती झाली होती. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागे. स्त्रियांना कुणीही वाली उरला नव्हता. स्त्रियांची ही अवनती जाणून शाहू राजांनी त्यांच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न केले. स्त्रियांसाठी अनेक चांगले कायदे केले. धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची अनैतिक पद्धत संस्थानात चालू होती. महाराजांनी जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही अमानुष पद्धत बंद केली. जातीभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून संस्थानात आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. तसा कायदा केला. आपल्या चुलत बहिणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. तसेच त्या काळात संस्थानात शंभर मराठा-धनगर विवाह घडवून आणले. विधवांची दारूण परिस्थिती लक्षात घेवून पुनर्विवाह नोंदणीसंबंधी कायदा केला. त्यामुळे विधवांच्या परिस्थितीत बराच फरक पडला. त्यांना कायद्याने पुनर्विवाह करता येवू लागला. संस्थानातील अनेक समाजात ‘काडीमोड’संबंधी त्या-त्या जात-पंचायतींचे आपापले कायदे असत. हे कायदे पुरुषप्रधान संस्कृतीला साजेसे म्हणजेच पुरुषांना अनुकूल तर स्त्रियांना प्रतिकूल असत. त्यामुळे स्त्रियांवर नेहमी अन्याय होई. स्त्रियांच्या मतांना आणि भावनांना फारशी किंमत नव्हती. त्यामुळे स्त्रियांची कुचंबना होई. हे ओळखून शाहू महाराजांनी संस्थानात ‘काडीमोड’संबंधी कायदा केला. अशा प्रकारचे खटले रीतसर कोर्टात चालवण्याचे आदेश दिले. स्त्रियांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांनाही ‘काडीमोड’ घेण्याचे अधिकार दिले. स्त्रियांना क्रूरपणे वागवण्याच्या पद्धतीविरुद्धही शाहू राजांनी कायदा केला.स्त्रियांचा शारीरिक व मानसिक छळ करणे, त्यांना उपाशी ठेवणे, मारहाण करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी कडक शिक्षा केल्या. त्यामुळे स्त्रियांना मोठा आधार मिळाला. राजर्षी शाहूंनी केलेल्या या अनेक स्त्री-उद्धारक कायद्यांमुळे स्त्रियांना सामाजिक प्रवाहात येण्यासाठी खूप मदत झाली.

राजर्षी शाहूंचे शैक्षणिक कार्य-
तत्कालीन वर्ण-व्यवस्थेने शूद्र आणि सर्व स्त्रिया यांना शिक्षणाचा अधिकार नाकारून त्यांच्यावर अन्याय केला. महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीमाई यांनी दलित-बहुजनांसाठी आणि स्त्रियांसाठी शाळा काढल्या. तोच वारसा जपत शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात बहुजन समाजाच्या शैक्षणिक विकासाच्या अनुषंगाने मोलाची कामगिरी बजावली. महाराजांनी १९१७ साली कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. हा कायदा करताना महाराजांनी पालकांनाही दंड ठेवला. जर एखाद्या पालकाचा मुलगा शाळेत आला नाही तर दरमहा १ रु. दंड ठेवला. शाहूंनी प्राथमिक शिक्षणावर भर दिला. कारण पाया पक्का असेल तरच माणसाची भावी शैक्षणिक प्रगती होऊ शकेल असे महाराजांचे मत होते.ते म्हणत, “शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहे असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही, असे इतिहास सांगतो.” शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अनेक अडचणी समजावून घेवून महाराजांनी त्यावर उपाय केले. मागास, गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप व इतर सवलती दिल्या. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतीगृहे बांधली. कोल्हापुरात हायस्कूल व कॉलेजची स्थापना केली. राजाराम कॉलेज मध्ये मुलींची फी माफ केली. त्याकाळी काही शिक्षक अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजातील काही मुलांना व्हरांड्यात बसवत असत. ही गोष्ट महाराजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिक्षकांना जरब बसेल असे उपाय केले. सरकारी शाळेत शिवाशिव पळू नये व सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवावे असा वटहुकूम काढला. ज्या शाळा या हुकुमाचे पालन करणार नाहीत त्यांची ग्रांट व इतर सवलती बंद करण्याची तंबी दिली.

वेदोक्त प्रकरण-
शाहू महाराजांच्या जीवनाला कलाटणी देणारा सर्वात महत्वाचा प्रसंग म्हणजे वेदोक्त प्रकरण होय. शाहू महाराजांचा भटजी राजोपाध्ये यांनी महाराजांना शूद्र मानून त्यांचे विधी वैदिक मंत्राने न करता पुराणोक्त मंत्राने करणार अशी भूमिका घेतली. त्यामुळे महाराज दुखावले गेले. अनेक प्रकारे समाज देवूनही भटजी त्याची भूमिका सोडत नाही असे दिसताच महाराजांनी त्याचे इनाम जप्त केले. परिणामी वाद अधिकच चिघळला. टिळकांनीही केसरीमध्ये अग्रलेख लिहून सामाजिक न्यायाची बाजू न घेता भटजीची बाजू घेतली. आधीच महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीमुळे ब्राम्हण-ब्राम्हणेतर वाद धुमसत होता.त्यात टिळक आणि महाराष्ट्रातील बहुतांशी ब्राम्हण महाराजांच्या विरोधात एकवटल्यामुळे ब्राम्हणेतर समाजही महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. परिणामी महाराष्ट्रात ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर असे दोन गट पडले. ब्राम्हणांचे नेतृत्व टिळकांकडे तर ब्राम्हणेतरांचे नेते शाहू महाराज. परिणामी टिळक आणि शाहू राजे यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. खरेतर शाहू महाराजांचे भांडण ब्राम्हणांविरुद्ध नव्हते तर त्यांच्या वर्चस्ववादी मानसिकतेविरुद्ध होते.विधी वैदिक मंत्राने केले काय किंवा पुराणोक्त मंत्राने केले काय ? काहीच फरक पडत नाही हे शाहू राजे जाणत होते. परंतु बहुजनांचे विधी वैदिक पद्धतीने न करण्यामागे ब्राम्हणांचा वर्णवर्चस्ववाद असल्याने शाहुनीही आपली भूमिका सोडली नाही. या घटनेनंतर शाहू राजांनी सामाजिक न्यायाच्या लढाईला अधिक बळकटी मिळवून दिली.

कलाकारांना प्रोत्साहन
शाहूंनी कलाकार मंडळींना राजाश्रय देऊन कलेचा सन्मान केला.बालगंधर्व, केशवराव भोसले यासारखे कलावंत, हैदरबक्षखॉं, केसरबाई, अल्लादियाखॉं यासारखे गायक, बाबूराव पेंटर,आबालाल रहिमान यासारखे चित्रकार शाहूंनी घडविले.मल्लांना उदार हस्ते प्रोत्साहन दिल्यामुळे कोल्हापूर हे भारतातील कुस्तीचे माहेरघर बनले.कुस्तीगिरांसाठी त्यांनी कोल्हापूरात खासबाग येथे भव्य मैदान बांधले.स्वत: शाहूराजे उत्कृष्ट मल्ल होते.
शाहू महाराजांचे आर्थिक धोरण-
शाहू महाराजांनी उद्योगधंदे उभारण्याच्या दृष्टीने खास प्रयत्न केले.कारागिरांना आश्रय दिला. आपल्या संस्थानात सुत गिरणी चालू केली.त्यासाठी मोठी जमीन मोफत दिली. इचलकरंजी येथे जिनिंग कारखाना सुरु केला. त्यानंतर इतर ठिकाणी अशा प्रकारचे कारखाने सुरु केले. उद्योगधंदे आणि व्यापार वाढीसाठी शाहूंनी कारागिरांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या. त्यांना राहण्यासाठी जमिनी दिल्या. बिनव्याजी कर्जे दिली. पाणीपुरवठ्याची मोफत सोय केली. रस्ते बांधले, रेल्वेच्या विकासास गती दिली. १८९५ साली शाहूपुरी ही व्यापारपेठ वसवण्यात आली.

रयतेचा राजा
आपल्या आयुष्यात त्यांनी सदैव रयतेचा विचार केला.त्यामुळे रयतेने त्यांना राजर्षी ही पदवी दिली.द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनामुळे ते खचले.अशातच मधुमेहाचा विकार बळावल्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली.ता.६ मे १९२२ रोजी मुंबईला त्यांचे वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसव्या वर्षी ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या निधनाने गोरगरिबांचा वाली काळाच्या पडद्याआड गेला.त्यांच्यानंतर त्यांचे थोरले पुत्र राजाराम गादीवर आले.
राजर्षी शाहूंचा वारसा-
आज शाहू महाराजांचे काम बहुतांशी लोकांपर्यंत पोहचले आहे. शाहुराजांच्या या अद्वितीय कामगिरीमुळे सर्वसामान्य बहुजनांच्या हृदयात शाहूंना आदराचे स्थान आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषांच्या जोडीला शाहू राजांचे नाव घेतले जाते. पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा फार मोठा वाटा आहे.
आज शाहू महाराजांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या सर्वत्र साजऱ्या केल्या जातात. परंतु फक्त एवढे करून त्यांच्या विचार-कार्याचे चीज होणार नाही. शाहूंचा लढा हा समतेसाठी होता. आत्मसन्मानासाठी होता. वर्णवर्चस्वाच्या अहंकारी प्रवृत्तीविरुद्ध होता. आज शाहू राजांच्या पश्चात त्यांचाच जयजयकार करणारे, त्यांच्या नावाने सत्ता भोगणारे राज्यकर्ते गरीब प्रजेला छळत आहेत. भ्रष्टाचार, गुंडगिरी या प्रवृत्ती फोफावल्या आहेत. शाहूराजे फक्त पुजण्यापुरतेच राहिले आहेत. त्यांचा वारसा, त्यांचे विचार, कार्य आपण विसरलो आहोत. राजर्षी शाहूंनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या संस्थानात जनहितार्थ अनेक कायदे केले. प्रसंगी टीका, अपमान, बदनामी यांची पर्वा केली नाही. पण आजच्या राज्यकर्त्यांना ‘जादूटोणा व अघोरी प्रथाविरुद्ध कायदा’ करता येत नाही. राज्यकर्ते शाहूंच्या नावाने राजकारण करतात मात्र त्यांचा विचार जपताना कुणीच दिसत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.

शाहूंच्या कार्याचे खरे चीज व्हावे असे वाटत असेल तर शिक्षण घेवून उच्च पदे हस्तगत केली पाहिजेत. आपल्या अधिकाराचा, पदाचा वापर सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाकरता केला पाहिजे. उपेक्षित, वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, जातीभेद नष्ट करणे, सामाजिक समता प्रस्थापित करणे ही शाहू राजांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करुया, हीच शाहुराजांना आदरांजली ठरेल.

तुकडोजी महाराज
तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन यासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांत काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. ख्नंजिरी भजन हे त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.
तुकडोजी महाराज आधुनिक काळातील महान संत होऊन गेले. अडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते अध्यात्मिक सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचं प्रबोधन करीत होते. एवढंच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला.
अमरावती जिल्ह्यातील यावली हे लहानसं गाव. ह्या गावात ३० एप्रिल १९०९ ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. जन्मताज घरावरचे छप्पर सोसाट्यच्या वा-याने उडवून नेले आणि वरचे आकाश हेच घराचे छप्पर बनून राहिले. त्यांच्या आईचे नाव मंजुळामाय व वडिलांचे नाव बंडोजीबुवा होते. घरात अत्यंत गरिबी. माधानच्या अंध संत गुलाबराव महाराजांनी त्यांचे बालपणीचे नाव माणिक असे ठेवले. मराठी शाळेचे दोन चार वर्ग शिकलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरु आडकोजी बाबांच्या कृपा प्रसादाने तुकड्यादास नावाने भजन लिहायचे. त्याचे भजन जनसामान्यांच्या मनाचा ठाव घ्यायचे. त्यांनी मांडलेलं तत्त्वज्ञान फक्त देवभक्ती नव्हती तर समाजातील दुःख , वेदना विषमता , त्यांच्या भजनातून प्रतीत व्हायची. एक सुजलाम्सुफलाम् देशाचे स्वप्न त्यांनी बघितले होते.


झाड झडुले शस्त्र बनेंगे , भक्त बनेगी सेना

पत्थर सारे बॉम्ब बनेंगे नाव लगेगी किनारे

१९४२ चे स्वातंत्र्य जनआंदोलनाचे विदर्भातील प्रेरणास्थान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. चिमूर , आष्टी ,यावली , बेनोडा येथील स्वातंत्र्य संग्राम यांच्याच प्रेरणेने घडला. त्यांनी जनजागृतीचे कार्य केले. मग ते चीन युद्ध असो वा पाकिस्तानचे. त्यांच्या लोकपयोगी कामांकडे पाहून महात्मा गांधी आकर्षित झाले होते. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी मोठ्या आदरातिथ्याने दिल्लीला बोलावून राष्ट्रपती भवनात त्यांच्या खंजरी भजनाचा कार्यक्रम झाला. त्याभजनाने प्रभावित होऊन राजेंद्रबाबू म्हणाले , आप संत नही , राष्ट्रसंत है. मग सा-या जगाने त्यांना राष्ट्रसंत म्हणून संबोधले.

महाराजांच्यी खंजरी भजन ही भजन पद्धती एक स्वतंत्र निर्मिती होती. त्यातून उठणारे झंकार थेट हृदयालाच जाऊन भीडत. ही पद्धत एवढी प्रभावी होती की त्यांची खड्या आवाजातील भजने क्षणात जनमनाचा पगडा घेत. त्यांची भजन सर्वसामान्यांपर्यंत विचार पोहोचवण्यात यशस्वी झाली.

१९५५ ला जपानमध्ये भरलेल्या विश्वशांती व विश्वधर्म परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधित्त्व करण्याचा बहुमान राष्ट्रसंतांना मिळाला. तिथे परिषदेच्या आयोजकांनी त्यांना जपानमधे राहून काम करण्यासाठी मोठी प्रलोभन दाखवली. पण आपल्याला भारतातच काम करायचंय सागून ते परतले. ग्रीन कार्ड आणि एच वन व्हिसा हेच सर्वस्वमानणा-यांसाठी हा मोठाच धडा आहे

ग्रामीण भागातील अशिक्षित जनतेला धर्माच्या नावाखाली फसविणा-या बुवाबाजीविरुद्ध व अंधश्रद्धेविरुध्द संत तुकडोजी महाराजांनी केलेले कार्य अनन्यसाधारण आहे. त्यांनी आपल्या ग्रामगीतेतून लोकांना भोंदु बुवांपासून दूरनेण्याचा प्रयत्न केला. तसेच खुळ्या कल्पनांवर कडक ताशेरेही ओढले आहेत. ग्रामीण , आदिवासी भागात आजही अंधश्रद्धा कमी झालेली नाही. त्यांनी केलेल्या जनजागृती कार्याला गावोगावी पोहचविण्याची आज खरी गरज आहे. तिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

ग्रामगीता ही राष्ट्रसंतांच्या तत्त्वज्ञानाचं सार. अनेक संतांनी आजवर अनेक ग्रंथ लिहिले. पण अशी गावाच्या विकासाचा मार्ग सांगणारी ही गीता केवळ अद्वितिय आहे. आजही त्यातलं प्रॅक्टिकल तत्त्वज्ञान भुरळ पाडणारं आहे.' ग्रामगीता नाही पारायणासी ', असं राष्ट्रसंत कठोरपणे सांगतात.
देशातले तरूण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचं व राष्ट्राचं संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचं उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन त्यांनी केलं. व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध राष्ट्रसंतांनी आपल्या लेखनातून केला.
ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय राष्ट्रसंतांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणंच हिंदी भाषेतही विपुल लेखन केलं. आजही त्यांचं हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरुन त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्यं कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिलं होतं.
ग्रामगीता या काव्यात तुकडोजी महाराज म्हणतात :
संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती।

साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी।।


संत तुकडोजी महाराज यांनी अनेक भजने/कविता लिहिल्या. त्यातीलच ही एक :
मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव
देव अशानं भेटायचा नाही रे
देव बाजारचा भाजीपाला नाही रे

दगडाचा देव त्याला वडराचं भेव
लाकडाचा देव त्याला अग्निचं भेव
मातीचा देव त्याला पाण्याचं भेव
सोन्याचांदीचा देव त्याला चोरांचं भेव
देव बाजारचा भाजीपाला नाही रे

देवाचं देवत्व नाही दगडात
देवाचं देवत्व नाही लाकडात
सोन्याचांदीत नाही देवाची मात
देव बाजारचा भाजीपाला नाही रे

भाव तिथं देव ही संतांची वाणी
आचारावाचून पाहिला का कोणी
शब्दाच्या बोलांनं शांती नाही मनी
देव बाजारचा भाजीपाला नाही रे

देवाचं देवत्व आहे ठाई ठाई
मी-तू मेल्याविण अनुभव नाही
तुकड्या दास म्हणे ऐका ही द्वाही
देव बाजारचा भाजीपाला नाही रे
                  ११ ऑक्टोबर १९६८ रोजी संध्याकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे देहावसान झाले. १२ ऑक्टोबर सकाळी ध्यानाचा कार्यक्रम झाला. एका सुशोभित ट्रकवर राष्ट्रसंतांचा चिरनिद्रा घेत असलेला देह ठेवला गेला आणि भजनाच्या निनादात दास टेकडीचं दर्शन घेण्यासाठी दिंडी निघाली. आयुष्यभर राष्ट्रसंतानी दिलेला मानवतेचा संदेश ह्या अंत्ययात्रेत दिसत होता. सर्व धर्म , पंथ , संप्रदायाचे लोक यात सहभागी होते. गुरुदेव सत्संग मंडळ देशभर त्यांचा विचारांचा प्रसार करण्याचे काम करते.

गाडगे महाराज
"देव माणूस आणि संत माणूस होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणूनच मानवतेची आयुष्यभर सेवा करण्यात धन्यता मानणारे व गावातील तसेच माणसांच्या मेंदूतील घाण साफ करून त्यांचे प्रबोधन करणारे कर्ते समाजसुधारक कृतीशील राष्ट्रसंत गाडगे महाराज."
गाडगे महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात शेणगाव येथे २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. त्यांचे मूळचे नाव डेबूजी होते. पण त्यांच्या विचारांमुळे आणि अतिशय साध्या रहाणीमुळे त्यांना ‘गोधडी महाराज’, ‘चिंधेबुवा’, ‘बट्टीसाधू’ इत्यादी विविध नावांनी ओळखले जायचे. १ फेब्रुवारी १९०५ रोजी बाबांनी सर्वसंग परित्याग केला. तेव्हापासून कमरेला गुंडालेलं एक वस्त्र, वर ठिगळ लावलेला शर्ट आणि बरोबर पाण्यासाठी एक गाडगं याच रूपात बाबा सर्वत्र वावरत असत. तेव्हापासून त्यांना लोक ‘गाडगे बाबा’ म्हणून लागले. सर्वसंग परित्यागानंतर पुढे जवळजवळ बारा वर्षे बाबांनी भारतभ्रमण केले. या भटकंतीतून त्यांच्यात एका समाजक्रांतीकारकाचा जन्म झाला. आणि खेड्यापाड्यातून समाजाची सेवा करत लोकजागृती करणे हेच पुढील आयुष्याचे ध्येय त्यांनी मानले. मला कुणी गुरु नाही आणि मी कोणाचाही गुरु नाही हीच भावना ठेवून त्यांनी समाजाला प्रबोधन केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता या समाजाच्या विरूद्ध गतीतून बहुजन समाज बाहेर पडावा म्हणून त्यांची सतत धडपड असे. त्यासाठी बाबा समज असणार्यांना शब्दाने फटकारित तर कधी कधी हातातल्या काठीचा फटका मारूनही शहाणं करीत आणि हे वागणं फक्त शब्दांपुरतं मर्यादित नव्हतं तर हातात खराटा घेऊन बाबा स्वतः गावाची स्वच्छता करून लोकांना धडा घालून देत असत. लोकांकडून मिळालेला पैसा ते समाजालाच अर्पण करीत. कर्मवीर भाऊरावांच्या शैक्षणिक कार्यासाठी बाबांनी अनेकवेळा आपली ओंजळ रिकामी केली होती. त्यांनी स्वतःचे आयुष्य म्हणजेच ‘लोकसंस्कारपीठ’ बनविले होते.
सामाजिक सुधारणा

१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकविला.
दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वैदर्भीय बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.
त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.
महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणाऱ्या,कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.
संक्षिप्त चरित्र

गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले.
ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे'मंदिर बांधले.
१९०८ मध्ये पुर्णा नदीवर घाटाचे निर्माण केले.
१९२५- मुर्तीजापूर येथे गोरक्षण , धर्मशाळा व विद्यालयाचे निर्माण केले.
१९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळेचे निर्माण गाडगेमहाराजांनी केले.
"मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.
गाडगे महाराज जातीने परिट व गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.
१९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.
गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.
"गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.
आचार्य अत्रे गाडगेबाबां बद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात'
१९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.
१९५४- जे.जे. हॉस्पिटल धर्मशाळा (मुंबई) बांधली.
गाडगे बाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.
डॉ आंबेडकर सुद्धा त्यांना गुरू स्थानी मानत असत.
२० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू.
गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे.


पंजाबराव देशमुख


  शेतकऱ्यांचे हक्कांसाठी लढणारे महान नेतृत्व!

भारताचे माजी कृषिमंत्री! बहुजनांच्या स्वाभिमानासाठी लढणारे स्वाभिमानी काळीज! शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुविधा निर्माण करणारे महान शिक्षणतज्ञ!
         
          पंजाबराव देशमुख यांचा जन्म पापळ या गावचा आणि उच्च शिक्षण घेऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात ते सहभागी झाले. इ.स. १९३६ च्या निवडणुकीच्या नंतर शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. स्वतंत्र भारतात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजेअमरावती विभागात अंदाजे १,००० च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये , अभियांत्रिकी पदवी , तसेच पदविका तंत्रनिकेतन , कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय असे अनेक महाविद्यालये सुरू करून आज शिक्षण क्षेत्रात फार मोठं योगदान देत आहे.

संक्षिप्त चरित्र


डॉ. पंजाबराव देशमुख ( भाऊसाहेब देशमुख) मूळ आडनाव - कदम
१९२७- शेतकरी संघाच्या प्रचारासाठी 'महाराष्ट्र केसरी' हे वर्तमानपत्र चालविले.
वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास' या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट.
१९३३ - शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारीत करण्यात मोठा वाटा. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात.
१९२६ - मुष्ठीफंड या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय काढले.
१९२७ - शेतकरी संघाची स्थापना.
१९३२ - श्री. ए. डब्ल्यु. पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना .
ग्रामोध्दार मंडळाची स्थापना.
१९५० - लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे), त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रुपांतर करण्यात आले.
१९५५ - भारत कृषक समाजाची स्थापना व त्याच्याच विद्यमाने 'राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना.
१९५६ - अखिल भारतीय दलित संघाची स्थापना.
'भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा'.
१८ ऑगस्ट १९२८ - अमरावती अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह .
१९३० - प्रांतिक कायदे मंडळावर निवड. शिक्षण, कृषी, सहकार खात्याचे मंत्री
लोकसभेवर १९५२, १९५७, १९६२ तीन वेळा निवड.
१९५२ ते ६२ केंद्रीय मंत्रिमंडळात कृषीमंत्री. भारताचे पहिले कृषीमंत्री.
देवस्थानची संपत्ती सरकाराने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देश्याने १९३२ मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले.
प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना.
१९६० - दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले.


डॉ. भीमराव रामजी आंबेडकर

शिका! संघटीत व्हा! संघर्ष करा ! असा संदेश देणारे व  धम्मचक्र प्रवर्तन यांच्या साहाय्याने हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या लाखो दलित - पीडितांचे पुनरुत्थान करणारे भारतीय राज्याघात्नेचे शिल्पकार व आधुनिक युगातील महामानव!   डॉ. बाबासाहेब आंबेडकर

       कोणतीही एखादी मोठी व्यक्ती सार्वजनिक जीवन कोणत्याही कारणाने सोडून गेली तर त्या व्यक्तीचे केवळ विचार मागे राहतात आणि हे विचारदेखील त्या त्या ठरावीक काळापुरतेच मर्यादित राहू शकतात. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार , कार्य  मात्र त्याला अपवाद आहे. त्यांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक व स्फूर्तिदायी ठरते.

            डॉ. भीमराव रामजी आंबेडकर  हे मराठी, भारतीय कायदेतज्ज्ञ व राजकारणी होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताची राज्यघटना बनवणार्‍या मसुदासमितीचे ते अध्यक्ष होते. दलितांच्या उद्धारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. इ.स. १९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले.
            मोलोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. सुभेदार रामजी हे मालोजीरावांचे सुपुत्र आणि डा. बाबासाहेब आंबेडकर याचे आदर्श वडील होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेचा सॆन्यात शिपाई म्हणुन भरती झाले होते. सॆन्यातील नोकरीमुळे सॆनिकी शाळेत म्हणजेच ’नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले. शिक्षण घेऊन ते सुशिक्षीत, संस्कारसंपन्न व द्न्यानी होऊ शकले. मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुध्द विचाराला आणि शुध्द आचाराला महत्त्वाचे स्थान होते.
             डॉ. आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली महू या मध्यप्रदेशातील लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. सुभेदार रामजी सकपाळ आणि भीमाबाई मुरबाडकर यांचे ते १४ वे अपत्य होते. हे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे या गावचे. त्यांचे पूर्वज ब्रिटिश सैन्यात नोकरी करत होते. त्यांच्या वडिलांना मराठी व इंग्रजी भाषांमध्ये थोडे शिक्षण मिळाले होते व त्यांनी आपल्या मुलांना शिकण्याची प्रेरणा दिली.
कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू धर्मातील साहित्याची ओळख करून दिली. इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. जरी शाळेत प्रवेश मिळाला तरी आंबेडकरांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे.
                  भीमराव वयाने लहान असल्यामुळे ’कॅम्प दापोली’ येथील शाळेत त्यास प्रवेश देता आला नाही. यामुळे घरीच लहानग्या भीमरावास अक्षरओळख आपोआप होऊ लागली. इ.स. १८९६ मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली. ते सातारा येथे सुरुवातीला साधारण घरात राहीले आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आपल्या परिवारासह राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. सुभेदार रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात आपल्या दृष्टीने सुयोग्य अशा तारखेला सातारा येथील ’कॅम्प स्कूल’ मध्ये आपल्या लाडक्या भीमरावाचे नाव दाखल केले. भीमरावाचे नाव दाखल केले. अशा प्रकारे भीमरावांच्या शिक्षणाचा आरंभ झाला!
                 इ.स. १८९६ मध्ये भीमरावांची आई भीमाबाईंचा मस्तक शुळ या आजाराने दु:खद निधन झाले. त्यावेळी मातृविहीन भीमरावांचा ममतायुक्त आधार बनण्याचे महत्त्वाचे कार्य आत्या मीराबाईंनी केले. त्या वयाने भाऊ रामजीपेक्षा मोठया आणि स्वभावाने प्रेमळ व समजूतदार होत्या. म्हणून रामजींसह सर्वजण त्यांचा आदर करीत असत.
                 रामजींनी इ.स. १८९८ साली दुसरे लग्न केले आणि कुटुब मुंबईला नेले. तेथे आंबेडकर एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले. इ.स. १९०७ साली त्यांनी मॅट्रिक परीक्षा यशस्वीरीत्या पार केली व इ.स. १९०८ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. हा प्रसंग त्यांच्या समाजातील लोकांनी अभिमानाने साजरा केला. याआधी इ.स. १९०६ मध्ये त्यांचे लग्न दापोलीच्या रमाबाई (वय ९ वर्षे) यांच्याबरोबर ठरले. यानंतर अमेरिकेतील शिक्षणासाठी त्यांना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी २५ रूपये प्रति महिना शिष्यवृत्ती दिली. इ.स. १९१२ साली त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांमध्ये पदवी मिळवली परदेशात असतांनाच त्यांना कोलंबिया विद्यापीठाने पीएच.डी. ची पदवी बहाल केली. १९२५ मध्ये त्यांनी मिळवलेल्या या डॉक्टरेटचा विषय होता, ‘नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया - ए हिस्टॉरिकल अँड अनॅलिटिकल स्टडी'. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांचे अध्ययन केले. पुढे त्यांनी लंडन येथील विद्यापीठात ‘दी प्रॉब्लेम ऑफ रूपी’ हा प्रबंध सादर केला आणि डी. एस्सी. ही पदवी मिळवली. व बडोदा संस्थानाच्या सरकारात नोकरीची तयारी केली. याच वर्षी त्यांचा मुलगा यशवंत याचा जन्म झाला. २ फेब्रुवारी, इ.स. १९१३ मध्ये त्यांचे आजारी वडील रामजी यांचा मुंबईमध्ये मृत्यू झाला.
                 भारतात आल्यावर सामाजिक विषमता दूर करण्याच्या हेतूने, अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाची कैफियत समाजासमोर मांडण्यासाठी,  त्यांनी ‘मूकनायक (१९२०), ‘बहिष्कृत भारत’ (१९२७), ‘जनता’ (१९३०)  आणि ‘प्रबुध्द भारत’ (१९५६)  अशी वृत्तपत्रे  चालवली. या काळात जी काही वृत्तपत्रे महाराष्ट्रात होती, त्यातून अस्पृश्यांचे प्रश्न मांडले जात नव्हते. त्यामुळे (तत्कालीन) अस्पृश्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्रांची गरज होतीच. सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडी तसेच नवीन समाजाची निर्मिती या अनुषगांने त्यांनी त्यातून लिखाण केले. वृत्तपत्रांचा वापर त्यांनी कधीच केवळ आपल्या पक्षाची राजकीय ध्येयधोरणे राबविण्यासाठी केला नाही. स्पृश्य आणि तथाकथित अस्पृश्य अशा दोन्ही समाजांच्या लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करणे हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्टय होय. केवळ वृत्तपत्रांमधूनच नाही तर त्यांनी ‘दी अनटचेबल्स,’ ‘शूद्र पूर्वीचे कोण होते?’,  ‘बुध्दा अँड हिज धम्म,’ असे ग्रंथ लिहिले. याशिवाय ‘थॉटस् ऑन पाकिस्तान’ हा जागतिक राजकारणावरील ग्रंथदेखील लिहिला. साहित्याला त्यांनी मनोरंजनाचे साधन म्हणून कधीच वापरले नाही. उत्तम समाजसमीक्षक  असण्याबरोबरच स्वत: एक  वाङ् मय-समीक्षक असणार्‍या डॉ. आंबेडकरांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, मुक्तेश्वर यांच्या भाषेचा गौरव केला आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘खरा ब्राम्हण’, यशवंत टिपणीस यांच्या ‘दख्खनचा दिवा’ या नाटकांवरदेखील त्यांनी विस्तृत स्वरूपात अभिप्राय दिलेले आहेत. बटर्‌रान्ड रसेल यांच्या ‘प्रिन्सिपल्स ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शन’ या नाटकावर त्यांनी आपले मत नोंदवले आहे. ‘रिडल्स इन हिंदुइझम’, ‘महाराष्ट्र अॅ ज अ लिंग्विस्टिक स्टेट’, ‘स्टेट्स अँड मायनॉरिटिज’, ‘भारतातील जाती’ या ग्रंथांचीही त्यांनी निर्मिती केली.
                डॉ. आंबेडकर यांच्यावर संत कबीर, महात्मा जोतिराव फुले व राजर्षी शाहू महाराज या व्यक्तिमत्त्वांचा, त्यांच्या विचारांचा व कार्याचा मोठा प्रभाव होता.

डॉ. आंबेडकर हे कर्ते सुधारक होते. सर्व माणसे समान आहेत, कोणीही उच्च किंवा नीच नाही अशी त्यांची ठाम धारणा  होती. जातीय उतरंड, चातुर्वर्ण्य व्यवस्था, या व्यवस्थेत शूद्र मानल्या गेलेल्या जातींवर होणारे अत्याचार यांबाबत त्यांच्या मनात विलक्षण चीड होती. आपल्या प्रत्येक कृतीतून त्यांनी समानतेचे धडे दिले. ते जेव्हा लंडनहून भारतात परत आले, तेव्हा परिचित लोकांनी, बाबासाहेबांनी मोटारीने घरी जावे असा आग्रह धरला. पण त्यास बाबासाहेबांनी नकार दिला. मग  लोकल रेल्वेच्या प्रथम वर्गातून तरी बाबासाहेबांनी प्रवास करावा असा आग्रह लोकांनी धरला. पण तोही आग्रह मोडत त्यांनी आपल्या रेल्वेच्या तिसर्‍या वर्गातून प्रवास केला. जेव्हा ते घरी गेले, तेव्हा त्यांच्या भावाने त्यांना बसण्यासाठी टेबल खुर्ची आणण्यासाठी धावपळ सुरू केली. पण इथेही बाबासाहेबांनी घरातील घोंगडीवर बसणेच पसंत केले. या कृतीतून त्यांनी  समानतेचे तत्त्व बिंबवले. त्यांनी या कृतीतून स्पष्ट केले की शिक्षण घेऊन ते ‘सुशिक्षित’ झाले असले, तरी समाजबांधवांना ते विसरलेले नाहीत, त्यांची दु:खे त्यांच्या स्मरणात आहेत.
डॉ. आंबेडकरांचे धर्म विषयक दृष्टीकोण

           डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीकोणातून धर्मही मानवी संस्कृतीतून न टाळता येणारी बाब होती त्याच वेळी बऱ्याचशा सामाजिक असमानतानां धार्मिक परंपरा, रूढी आणि विचारधारा जबाबदार आहेत किमान पक्षी बऱ्याच वेळी विविध धर्म संस्था समतेचे पाठही देत असल्या तरी खर्‍या अर्थाने त्या धर्मातील समाज समतेची पाठराखण करण्यास अयशस्वी झाला.

           भारतातील दलित समाजास जाती व्यवस्थेने निर्माण केलेल्या विषमतेस हिंदू धर्म जबाबदार असून आपण हिंदू म्हणून जन्माला आलोतरी हिंदू म्हणून मरणार नाही असा दृष्टीकोण घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी विविध धर्मव्यवस्थांचा अभ्यास केला.
           भारतात हिंदू धर्माशिवाय इतर बरेच इत्यादी धर्मियांची भारतात दीर्घ काळ सत्ता मोठ्या कालखंडात असूनसुद्धा जातीव्यवस्थेत होणार्‍या दलित शोषणास थांबवण्यासारखे बाजू घेण्यास इस्लामी राजवटी आणि समुदाय कमी पडला, अशीच काहीशी परिस्थिती इतरही समतावादी समजणार्‍या धर्म समुदायांची होती. त्याशिवाय इस्लाम आणि इतर बऱ्याच धर्मातील स्त्रियांना समतेची वागणूक न मिळण्याबद्दलही डॉ.बाबासाहेबांचे आक्षेप होते. सरते शेवटी बाबासाहेबांनी बुद्धधर्माचा स्वीकार करून त्यांच्या अनुयायांनाही तसे करण्याचा सल्ला दिला.
अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष

             बाबासाहेबांनी एक आघाडीचे भारतीय विद्वान या नात्याने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट १९१९ च्याबाबत साऊथबरो कमिटीसमोर आपले विचार मांडले. यावेळी आंबेडकरांनी दलित व इतर मागासलेल्या समाजांसाठी वेगळे मतदान विभाग व आरक्षण यांची मागणी केली. इ.स. १९२० साली त्यांनी मुंबईत मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन त्यांनी सनातनी हिंदू नेत्यांवर आणि जातिभेदाविरुद्ध काहीही करत नसलेल्या भारतीय राजकारण्यांवर टीका केली.कोल्हापुरातील मागासवर्गीयांच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या भाषणामुळे छत्रपती शाहू महाराज खूश झाले व त्यांनी आंबेडकरांबरोबर जेवण करून हिंदू समाजाला धक्का दिला. आंबेडकरांनी यानंतर वकिलीचा व्यवसाय सुरू केला आणि मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी बहिष्कृत हितकारिणी सभा सुरू केली.
           इ.स. १९२६ साली ते मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले. इ.स. १९२७ च्या सुमारास त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी सार्वजनिक चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली. महाड येथे चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी सुरू करण्यासाठी यशस्वी सत्याग्रह केला.
          इ.स. १९२८ मध्ये बाँबे प्रेसिडेन्सी कमिटीवर त्यांची नेमणूक करण्यात आली व त्यांनी सायमन कमिशनाबरोबर काम केले. निवडणुकींमधील सुधारणांसाठी त्यांनी काही नवीन मुद्दे सुचवले.

पुणे करार

                       इ.स. १९२० च्या दशकाच्या अखेरीस आंबेडकर दलितांचे एक नामवंत राजकीय नेते बनले होते. जातिसंस्थेविरुद्ध काहीही न करणर्‍या पक्षांना त्यांनी आपल्या टीकेचे लक्ष बनवले. महात्मा गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस यांच्यावर दलितांना दयनीय परिस्थितीत ढकलल्याचा आरोप केला. ब्रिटिश सरकारावरही ते नाराज होते व त्यांनी दलितांसाठी एक नवीन राजकीय आघाडी काढली. ८ ऑगस्ट १९३० साली मागासवर्गीयांच्या सभेमध्ये आंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर जाहीर केला, मागासवर्गीयांनी काँग्रेस व ब्रिटिश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत असे त्यानी सांगितले. या भाषणात त्यांनी मिठाच्या सत्याग्रहाचा समाचार घेतला. या टीकेमुळे सनातनी हिंदू संतापले.
          इ.स. १९३२ साली राव बहाद्दूर राजा यांनी दोन उजव्या विचारसरणीच्या काँग्रेस नेते बी. एस. मुंजे व जाधव यांबरोबर एक करार केला. या करारानुसार मुंज्यांनी राजांना पाठिंब्याच्या बदल्यात काही आरक्षित जागा अनुसूचित जातीमधील लोकांना देण्याचे ठरविले. या घटनेमुळे आंबेडकरांनी संपूर्ण भारतात दलितांसाठी विभक्त मतदारसंघांची मागणी केली. आंबेडकरांचे महत्त्व आणि दलितांमधील जनाधार वाढला आणि त्यांना इ.स. १९३१ साली लंडन येथील दुसर्‍या गोलमेज परिषदेचे निमंत्रण आले. या परिषदेत त्यांचे गांधीजींबरोबर विभक्त दलित मतदारसंघावरून मतभेद झाले. गांधीजींना धार्मिक वा जातीय आधारावर विभक्त मतदारसंघ मान्य नव्हते, त्यांना यामुळे भविष्यात हिंदू समाज दुभंगण्याची भीती वाटत होती.
          जेव्हा ब्रिटिशांनी आंबेडकरांची मागणी मान्य केली, तेव्हा गांधीजींनी येरवडा तुरूंगात उपोषण सुरू केले. सनातनी हिंदू समाजाला अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्यास सांगून हिंदूंमध्ये राजकीय आणि सामाजिक एकी आणण्याचे आव्हान केले. गांधीजींच्या उपोषणाला लोकांकडून मोठा पाठिंबा मिळाला आणि हिंदू नेत्यांनी आंबेडकरांबरोबर येरवडा येथे बैठका घेतल्या. गांधीजींच्या मृत्यूनंतर दलित समाजाविरुद्ध दंगली होऊन विनाकारण त्रास होईल असे वाटून आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी आरक्षित मतदारसंघांसाठी मान्यता दिली. यामुळे स्वतंत्र मतदारसंघ मिळाले नसले, तरी दलितांना जास्त जागा मिळाल्या. दलितांच्या राजकीय अधिकारांना बगल देण्यासाठी गांधीजींनी खेळलेली राजकीय चाल असे आंबेडकरांनी या उपोषणाचे नंतर वर्णन केले.
राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष
                 एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. प्रांतिक कायदेमंडळांना एक महत्त्वाचे काम करावयाचे होते. ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य देऊ केले होते आणि स्वतंत्र होणार्‍या भारताचा राज्यकारभार राज्यघटनेनुसार होत राहावा, म्हणून निवडून आलेल्या मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी काही प्रतिनिधी निवडून घटना समिती तयार करावी आणि त्या घटना समितीने राज्य घटना तयार करण्याचे काम सुरू करावे, असे त्यांनी सुचविले होते. त्याप्रमाणे मध्यवर्ती आणि प्रांतिक कायदेमंडळांनी घटना समितीचे प्रतिनिधी सभासद निवडण्याचे काम केले.
             मुंबई कायदेमंडळात डा. आंबेडकरांच्या शेडयुल्ड कास्ट्स फेडरेशनचे निवडून आलेले सभासद नव्हते. त्यामुळे काग्रेस पक्षाच्या सहकार्याशिवाय ते मुंबई कायदेमंडळातून घटना समितीचे प्रतिनिधी सभासद होऊ शकत नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांना अस्पृश्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी घटना समितीचे सभासद होण्याची आवश्यकता वाटू लागली होती. तोपर्यंत मुंबई कायदेमंडळांच्या काग्रेसच्या सभासदांनी घटना समितीचे सभासद म्हणून ब. मुकुंद जयकर आणि के. एम. मुन्शी या दोघांची निवडही केली. त्यामुळे मुंबई कायदेमंडळाकडून डॉ. आंबेडकरांना निवडून देण्याचा प्रश्नच राहिला नाही.
            पण बंगाल प्रांताचे कायदेमंडळ डॉ. आंबेडकरांना सहकार्य करण्यास तयार झाले. ब. जोगेन्द्रनाथ मंडल आणि बंगाल प्रांताच्या कायदेमंडळाच्या मुस्लिम लीगच्या सभासदांच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे सभासद म्हणून निवडून येण्यास यशस्वी झाले. ते प्रथम पसंतीची ७ मते मिळवून काग्रेसचे उमेदवार सरतचंद्र बोस यांचा पराभव करून विजयी झाले. अखेर डॉ. बाबासाहेब आबेडकर अस्पॄश्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी घटना समितीचे सभासद होण्यात यशस्वी झालेच.
             २० अगस्ट १९४७ रोजी घटना समितीच्या अध्यक्षांनी स्वतंत्र भारताचा कायदा आणि त्या संबंधीच्या सर्व कायदेशीर गोष्टी यांचा विचार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आल्याचे जाहीर केले आणि त्या समितीच्या सभासदांची नावेही जाहीर केली - डॉ. बी. आर. आंबेडकर, जी. व्ही. मावळणकर, पुरुषोत्तमदास टंडन, गोपालस्वामी अय्यंगार इत्यादी.
            २९ अगस्ट १९४७ रोजी घटना समितीने एक ठराव पास करून स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी डॉ. आंबेडकर यांच्यासह सात सभासदाची ’मसुदा समिती’ नियुक्ती केली आणि विधिमंत्री डॉ. बी. आर. आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले.
‘राज्यघटनेचे शिल्पकार,’ ‘अस्पृश्योध्दारक’ असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ६ डिसेंबर, १९५६ ला हे जग सोडून गेले.
        आज भारतीय लोकशाहीच्या कसोटीचा काळ सुरू आहे. आजुबाजूची परिस्थिती पाहिली तर असे वाटते, की भारतीय लोकशाहीला भारतीय जनताच तर नाकारणार नाही ना?  स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी चिंतन करतांना डॉ. आंबेडकर म्हणतात की, ‘जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावरच टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे.’

              अद्वितीय बुद्धिमत्ता, त्या आधारे स्वत: घेतलेले अतिउच्च दर्जाचे शिक्षण; जागतिक दर्जाची विद्वत्ता, बंडखोरी व क्रांतिकार्य करण्याची प्रवृत्ती, संघटन कौशल्य; शिस्तबद्धता व नीटनेटकेपणा; वक्तृत्व; इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व; प्रचंड वाचन; संशोधनात्मक अभ्यास, अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी लेखन... अशा अनेक गुणविशेषांसह ‘भीमजी रामजी आंबेडकर’ यांचा प्रवास हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करणारे ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ येथपर्यंत झाला.निकोप चारित्र्याला जपणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे हे विलक्षण हिमालयाच्या उत्तुंग उंचीचे व्यक्तिमत्व होते!